सध्या नक्कीच संपूर्ण जग एका कठीण परिस्थितीतून जात आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) तर दुसरीकडे रशिया – युक्रेन युद्ध (Russia – Ukraine War). आजूबाजूला इतके नकारात्मक वातावरण असताना स्वतःला सकारात्मक ठेवणे खूपच गरजेचे आहे. पण 1 एप्रिल (1 April) हा असा दिवस आहे ज्यादिवशी तुम्ही मजा केलीच पाहीजे. ‘एप्रिल फूल’ (April Fool Day) अर्थात मूर्खांचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करतो. दरवर्षी अगदी छोटेमोठे प्रेँक करून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना एप्रिल फूल बनवतो अथवा आपल्या जवळच्या व्यक्तींना एप्रिल फूल जोक्स अथवा एसएमएस (April Fool Jokes In Marathi) पाठवून मजा घेतो. तसं तर आपल्याकडे या दिवशी नवे वित्तीय वर्ष (Financial Year) सुरू होते. तर उन्हाळाही या दिवसामध्ये डोकं अधिक गरम करू लागतो. पण तरीही या दिवसाची मजा मात्र सगळेच घेतात. यादिवशी कितीही मोठा जोक अथवा प्रँक केला तरीही मजेत आणि मस्करीत घेण्याची पद्धत आहे. पण एप्रिल फूल केव्हा सुरू झाला अथवा एप्रिल फुलचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात हा दिवस साजरा करण्यात येतो. याबाबत काही महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती.
एप्रिल फूलचा इतिहास, कधी झाला सुरू

‘एप्रिल फूल दिन’ साजरा करण्याची प्रथा ही खूपच जुनी आहे आणि देशभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. पण पहिल्यांदा नक्की एप्रिल फूल कधी साजरा करण्यात आला याची योग्य आणि अचूक अशी माहिती नाही. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे फ्रेंच कॅलेंडर (French Calendar) मध्ये होणाऱ्या बदलामुळे एप्रिल फूल हा दिन साजरा करण्यात यायला लागला. पण याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. तर काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे इंग्लंडचा राजा रिचर्डच्या द्वितीयच्या राणी एनीच्या साखरपुड्यामुळे एप्रिल फूल दिवस साजरा करण्यात येतो. पण या दिवसाला ‘मूर्ख दिवस’ असे स्वरूप नक्की का प्राप्त झाले असा प्रश्नही पडतो.
April Fool Day History in Hindi
किंग रिचर्ड द्वितीय आणि एनीच्या साखरपुड्याची गोष्ट
इंग्रजी लेख जॉफ्री सॉसर्सने पहिल्यांदा ‘एप्रिल फूल दिन’ उल्लेख सन 1392 मध्ये आपले पुस्तक ‘केंटरबरी टेल्स’मध्ये केला होता. या पुस्तकात लिहिले होते की, इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी एनी यांचा साखरपुडा 32 मार्च, 1381 रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आणि अनेकांना याबाबत खरे वाटले. पण साखरपुड्याची तारीख काहीतरी वेगळीच होती. अशापद्धतीने लोक मूर्क बनले आणि तेव्हापासूनच 1 एप्रिल हा मूर्खांचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
फ्रेंच कॅलेंडरच्या बदलाची गोष्ट
‘एप्रिल फूल दिन’ साजरा करण्याच्या गोष्टीत हीदेखील गोष्ट आहे. दुसऱ्या गोष्टीनुसार सन 1582 मध्ये पोप ग्रेगोरी XIII ने 1 जानेवारीपासून नव्या कॅलेंडरची सुरूवात केली होती. यासह मार्चच्या शेवटी साजरा करण्यात येणाऱ्या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशन तारखेत बदल झाला. कॅलेंडरची ही तारीख सर्वात पहिले फ्रान्समध्ये समाविष्ट करून घेण्यात आली असं सांगण्यात येतं. वास्तविक युरोपमध्ये राहिलेल्या लोकांनी जुलियन कॅलेंडरच योग्य मानले होते. त्यामुळे ज्यांनी नवे कॅलेंडर स्वीकारले त्यांना लोकांनी मूर्ख म्हणण्यास सुरूवात केली. त्यामुळे या दिवसाला ‘एप्रिल फूल दिन’ असे म्हणण्यात येते आणि या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो असं सांगण्यात येते.
हिलारिया फेस्टिव्हलची कहाणी
‘एप्रिल फूल दिन’संबंधित अजून एक कहाणी आहे आणि ती म्हणजे हिलायरिची गोष्ट. हा एक सण आहे, जो प्राचीन काळी रोम या शहरात साजरा करण्यात येत होता. या सणाला अत्तिस या देवतेची पूजा करण्यात येत होती. हिलारिया सणाच्या दिवशी उत्सवांचे आयोजन करण्यात यायचे. या उत्सवादरम्यान लोक अतरंगी कपडे घालायचे. तसंच अगदी मजेशीर मास्क लाऊन एकमेकांची मस्करी करायचे. या अशा स्वरूपाच्या उत्सवामुळेच या दिवसाला ‘एप्रिल फूल दिन’ असे इतिहासकारांनी नाव दिले असं सांगण्यात येते.
वेगवेगळ्या देशात कसा साजरा होतो ‘एप्रिल फूल दिन’

तसं तर ‘एप्रिल फूल दिन’ वेगवेगळ्या देशात विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. भारतात (India) या दिवशी एकमेकांसह वेगवेगळे प्रँक करून हा दिवस साजरा करण्यात येतो तर ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझीलंड (New Zealand), साऊथ आफ्रिका (South Africa), ब्रिटेन (Britain) या ठिकाणी दुपारपर्यंतच हा दिवस साजरा करण्यात येतो. कारण या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेचे वृत्तपत्र हे वेगवेगळे असते. त्यामुळे सकाळच्या वृत्तपत्राच्या वेळीच ‘एप्रिल फूल दिन’ साजरा करण्यात येतो. तर काही देशात जसे जपान, रूस, आयर्लंड, इटली आणि ब्राझिल येथे संपूर्ण दिवस ‘एप्रिल फूल दिन’ साजरा करण्यात येतो.
विविध देशांमध्ये जगभरात ‘एप्रिल फूल दिन’ साजरा करण्यात येतो. तर अजून एक दिवस आहे जो मूर्खता दिवस म्हणून साजरा होतो. डेनमार्कमध्ये 1 मे हा दिवस माज-काट अर्थात ‘एप्रिल फूल दिन’ प्रमाणे साजरा करण्यात येतो. तर पोलंडमध्ये ‘एप्रिल फूल दिन’ हा प्राईमा एप्रिलिस नावाने साजरा होतो. यादिवशी पोलंडमधअये मीडिया आणि सरकारी संस्थान हॉक्स तयार करतात.
तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडली असेल तर ‘एप्रिल फूल दिन’ साजरा करताना नक्की शेअर करा. हा दिवस साजरा नक्की करा. पण कोणाच्याही भावना दुखावल्या जातील इतक्या हीन दर्जाला जाऊन साजरा होणार नाही याची नक्की काळजी घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक