पानमसाल्याची जाहिरात केली म्हणून बॉलिवूडस्टार अक्षय कुमार आणि अजय देवगण ट्रोल होत असताना साऊथ स्टार अल्लू अर्जुन याने एक तंबाखूची जाहिरात नाकारली आहे. त्यामुळे त्याचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे. अल्लूसाठी एका चांगल्या मोठ्या ब्रँडची आणि मोठ्या मानधनाची ही जाहिरात होती. पण याच्या मानधनाचा विचार न करता त्याने समाजहितासाठी ही जाहिरात नाही करणार असल्याचे सांगून सगळ्या प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मने जिंकली आहेत. अल्लूसाठी आलेली ही तंबाखूची जाहिरात नेमकी होती तरी काय चला घेऊया जाणून
अल्लूने या कारणासाठी नाकारली जाहिरात
काम कोणतेही लहान नसते. पण आपल्या कामातून कोणताही चुकीचा संदेश चाहत्यांपर्यंत जाऊ नये याची काळजी घेणे हे खऱ्या कलाकाराचे लक्षण आहे. अल्लूचा नुकताच एक सुपर हिट चित्रपट येऊन गेला. त्यानंतर त्याच्याकडे कामाची बरीच रांग लागलेली आहे. त्याच्यासाठी एका मोठ्या तगड्या ब्रँडच्या तंबाखूची जाहिरात आली होती. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अल्लूला एका तंबाखूच्या ब्रँडने मोठी रक्कम ही देऊ केली होती. पण त्या ब्रँडला नकार देताना त्याने एक स्पष्टीकरणे दिले आहे. त्याने सांगितले की, माझ्या चाहत्यांनी माझ्या जाहिराती पाहून तंबाखूचे सेवन करावे असे मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे मला ही जाहिरात करायची नाही. असे स्पष्टीकरणही त्याने दिले. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.
स्वत: ही या सवयीपासून आहे दूर
अल्लू अर्जुन स्वत: कोणत्याही प्रकारचे सेवन करत नाही. त्याला कोणतेही व्यसन नाही. चित्रपटात रोलचा भाग म्हणून तो सिगरेट फुंगत असेल पण तो प्रत्यक्षात या गोष्टीला दुजोरा देत नाही. असे असताना त्याला त्याच्या कोणत्याही जाहिरातीतून लोकांना चुकीचा संदेश मिळू नये यासाठी तो जाहिराती निवडताना खूप चौकस असतो. त्याच्या या गोष्टीच त्याच्या फॅन्सना अधिक भावतात.
रॉयल तरी ही सर्वसामान्य
अल्लू अर्जुन हा एक सुपरस्टार आहे. त्याच्या पायाशी अनेक गोष्टी लोळण घालतात. पण असे असले तरीदेखील तो सर्वसामान्य नागरिकांसारखे आयुष्य जगणे अधिक पसंत करतो. काही दिवसांपूर्वी त्याला काळ्या काचांसाठी पोलिसांनी अडवले होते. त्यावेळी त्याने या काचांवरील काळी फ्रेम काढून टाकली आणि जो दंड होता तो भरला. त्यामुळेही त्याचे सगळ्यांनी कौतुक केले होते. त्यामुळे तो कितीही रॉयल शौक ठेवत असला तरी देखील काही बाबतीत तो एक कॉमन फॅमिली मॅनच आहे.
अक्षय आणि अजय झाले ट्रोल
अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत अनेक जाहिराती या समाजपयोगी नाहीत म्हणून नाकारल्या आहेत. त्यात अक्षय कुमार, साई पल्लवी, विराट कोहली या सारख्या कलाकारांचा समावेश होता. पण आता अक्षय कुमारने पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे तो ट्रोल होऊ लागला आहे. इतकेच नाही. तर अजय देवगणही ट्रोल झाला.
आता अल्लूचे हे असे वागणे तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा.