ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Allu Arjun started Pushpa 2 preparation in Marathi

अल्लू अर्जुनने सुरू केली ‘पुष्पा 2’ ची तयारी, यावेळी लुक असणार हटके

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा दी राइझ’ मधील संवाद लहान मोठ्या सर्वच चाहत्यांना पाठ आहेत. या चित्रपटाने सर्वच भाषांमध्ये धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील गाणी आणि संवाद सर्वात जास्त हिट ठरले. चित्रपट पाहतानाच प्रेक्षकांना पुष्पाच्या सीक्वलची हिंट मिळाली होती. त्यामुळे पुष्पा 2 कधी येणार यासाठी चाहते आतुर झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुनने पुष्पाच्या सीक्वलची तयारी सुरू केली आहे. नुकताच त्याचा सेटवरचा लुक व्हायरल झाला असून या चित्रपटात तो एका हटके अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर येणास सज्ज झाला आहे. पुष्पा पेक्षा पुष्पा 2 मधील लुक थोडा वेगळा आणि हटके असल्यामुळे आता या कथानकात काय वळण असणार हे पाहणं रंजक ठरेल असं वाटतंय.

रश्मिका मंदानीने दिली अशी कंमेट

अल्लू अर्जुनचा पुष्पाच्या सीक्वलमधील लुक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाहते खूप खूश झाले आहेत. या फोटोत अल्लू अर्जुन एका खास अंदाजमध्ये दिसत आहे. कानात इअर रिंग्ज, गळ्यात चैन, शर्ट आणि लेदर जॅकेट आणि हातात सिगार असा त्याचा लुक आहे. विशेष म्हणजे या फोटोतील सिगार जळेलेली नसून अल्लूने फोटोसोबत शेअर केलं आहे की, “सिगार आरोग्यासाठी हानिकारक असते” ज्यामुळे चाहते नेहमीप्रमाणे अल्लू अर्जुनच्या प्रेमात पडले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची हिरॉइन अभिनेत्री रश्मिका मंदानीनेही या फोटोवर ” माय गॉड अल्लू अर्जुन मी तुम्हाला ओळखूच शकले नाही सर ” अशी कंमेट केली आहे. 

अल्लू अर्जुनचे चित्रपट

थोडक्यात अल्लू अर्जुनच्या नव्या लुकने चाहत्यांमध्ये फायर निर्माण केलं आहे. काही चाहत्यांनी तर यावेळी डबल फायर आहे अशी कंमेटही केली आहे. अर्जुनचा पुष्पा 2 कधी प्रदर्शित होणार आणि यावेळी नेमकं काय कथानक असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अल्लु अर्जुन पुष्पा 2 सोबतच एए21 या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT