सुंदर त्वचा आणि केस हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी आहारात चांगल्या गोष्टी असणे हे फारच गरजेचे असते. कोरफड अर्थात अॅलोवेरा हा फारच बहुगुणी अशी वनस्पती आहे. जिचा समावेश केल्यामुळे त्वचा आणि केस हे चांगले होतात. कोरफड वरवर लावण्याचा सल्ला आतापर्यंत अनेकांनी दिला असेल तुम्ही कोरफडीचा गर लावला ही असेल पण तुम्हाला माहीत आहे का कोरफडीचा गर हा खाल्ला जातो. कोरफडीचा गर हा ज्यूस स्वरुपात प्यायला जातो. हा ज्यूस चवीला कसा लागतो असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर आणि अॅलोवेरा ज्यूसचे फायदे जाणून घेऊया. म्हणजे तुम्ही लगेचच त्याचे सेवन सुरु करु शकाल.
कमी वजनामुळेही त्वचा दिसू शकते वयस्क, अशी घ्या काळजी
असे बनवा अॅलोवेरा ज्यूस
हल्ली बाजारात तयार अॅलोवेराचा गर मिळतो. हा गर सरळ पाण्यात घेऊन तुम्ही त्याचे तसेच्या तसे सेवन करु शकता. पण या ज्यूसला चव अशी काही लागत नाही. अॅलोवेरा ज्यूस हा थोडा बुळबुळीत असतो. जर तुम्ही ताज्या कोरफडीचा गर काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फुलं आलेल्या कोरफडीचा गर हा जास्त फायद्याचा ठरतो. छान मोठे वाढलेले कोरफड काढून ते पाण्यात भिजवत ठेवले जातात. त्यांची सालं काढून त्याचा गर काढला जातो. हा गर बुळबुळीत असतो.तो दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुतला जातो. त्यानंतर मिक्सरमधून वाटला जातो. हा ज्यूस छान चविष्ट लागण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस, चाट मसाला घातला जातो. त्यामुळे हा रस अधिक चविष्ट लागतो.
अॅलोवेरा ज्यूसचे फायदे
- अॅलोवेरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते जे त्वचेसाठी फारच फायद्याचे असते. ज्यामुळे त्वचेचा तजेला कायम राहण्यास मदत मिळते. जर तुमची त्वचा कोरडी आणि शुष्क असेल तर तुम्ही या ज्यूसचे सेवन केल्यानंतर तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागेल.
- उत्तम आरोग्यासाठी शरीरात पाणी जाणे फारच गरजेचे असते. उन्हाची काहिली झाल्यावर आपण अनेकदा सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर काही रसाचे सेवन करतो. पण त्यामुळे शरीरात कॅलरीज वाढण्याची शक्यता असते.पण अॅलोवेराज ज्यूसमध्ये फार कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यताही कमी होते
- पिंपल्सचा त्रास असेल तर तुमच्यासाठी अॅलोवेरा ज्यूस हा फारच फायद्याचा असतो. कारण पिंपल्सला आतून बरे करण्याचे काम अॅलोवेरा ज्यूस करते. त्यामुळे पिंपल्सचा त्रास कमी होतो. शिवाय त्वचेवर डागही राहात नाहीत.
- अॅलोवेरामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात. हे घटक तुमच्या त्वचेवर आणि केसावर प्रोटेक्शन कवच तयार करतात. त्यामुळे उनाचा किंवा त्यांच्या किरणांचा त्रास होत नाही.
- केसांना चमक देण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी अॅलोवेरा ज्यूस फायद्याचे असते. हा ज्यूस प्यायल्यामुळे केस खूप चांगले दिसू लागतात.
त्यामुळे उत्तम केसांसाठी आणि त्वचेसाठी अॅलोवेरा ज्यूसचा नक्की वापर करा.
हे नाईट केअर रूटीन ठरेल ओपन पोर्ससाठी परिणामकारक