ADVERTISEMENT
home / Recipes
aluwadi-recipe-in-marathi

श्रावणातच आहे खमंग, कुरकुरीत अळूवडीचा खरा स्वाद, रेसिपी खुमासदार!

आपल्यासाठी श्रावण म्हटलं की पर्वणीच असते. विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांकडे. श्रावणामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. त्या उत्सवांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचीही रेचलेच असते. त्यात सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अळूवडी. अळूवडी खरं तर बारा महिने करता येते. पण खमंग, कुरकुरीत अळूवडीचा खरा स्वाद येतो तो श्रावणामध्येच. अळूची ताजी पाने आणि बाहेर पडणारा मंद पाऊस आणि कुरकुरीत – खुमासदार अळूवडी. आहाहा! नुसतं वाचलं तरीही तोंडाला पाणी सुटतं बघा. पण अळवडीला गोड-आंबट-तिखट चव नसेल आणि ती कुरकुरीत नसेल तर मग महाराष्ट्रीय पद्धतीच्या अळूवडीला मजा नाही. श्रावणात आलेल्या जाडसर मोठ्या पानाच्या अळूची अळूवडी करणे म्हणजे नक्कीच खायचं काम नाही. कारण त्याचा मसाला आणि त्याचे कसब खरं तर जमून यायलं हवं. भाजीचे आणि वडीचे असे दोन्ही अळू वेगळे असते हे तुम्हाआम्हाला सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अळूवडी करताना वडीचे अळू निवडण्यापासूनच कसब सुरू होते. उत्तम अळूवडी तुम्हाला घरच्या घरी जमवायची असेल तर त्याची खास रेसिपी आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. मग वाट कसली पाहताय…श्रावण झालाय सुरू..चला लागा अळूवडीच्या तयारीला!

अधिक वाचा – महाराष्ट्रीयन पदार्थ जे पुरवतात तुमच्या जिभेचे चोचले (Maharashtrian Recipes In Marathi)

अळूवडीसाठी लागणारे साहित्य आणि बनविण्याची पद्धत 

अधिक वाचा – उपवासाची रेसिपी बनवा घरी, खमंग पदार्थ रेसिपी (Upvasache Recipes In Marathi)

साहित्य 

ADVERTISEMENT
  • वडीच्या अळूची 5-6 पाने 
  • 1 कप बेसन 
  • 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ 
  • अर्धा कप चिंचेचा घट्ट कोळ 
  • 2 चमचा किसलेला गूळ 
  • अर्धा चमचा हळद 
  • 2 चमचे लाल तिखट 
  • 1 चमचा धणे पावडर 
  • 1 चमचा जिरे पावडर 
  • आवश्यकतेनुसार मीठ 
  • तळण्यासाठी तेल 

बनविण्याची पद्धत 

  • एका भांड्यामध्ये बेसन, तांदळाचे पिठ, चिंचेचा कोळ, गूळ, हळद, तिखठ, धणे – जिरे पूड, एक चमचा तेल, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • थोडेसे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या. हे अगदी पातळ करू नका आणि एकदम घट्ट गोळाही करून नका. अगदी मध्यम स्वरूपाचे मिश्रण तयार करावे. मिश्रण जरा चिकटसर ठेवा आणि अळूच्या पानावर त्याचा व्यवस्थित थर लावता येईल इतपत दाट ठेवा  
  • अळूची पाने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर स्वच्छ फडक्याने पुसा आणि त्याचे देठ कापून टाका
  • त्यानंतर अळूचे पान उलटे ठेवा आणि त्यावर लाटणे फिरवून घ्या. त्या पानावर वर तयार केलेले मिश्रण हाताने लावा. त्यावर दुसरे पान उलटे ठेवा आणि त्यावरही मिश्रण लावा
  • त्यानंतर खालच्या बाजूने गुंडाळी करत आणावी आणि गुंडाळी करतानाही हाताने वरील मिश्रण पानाला लावावे. तुमचे अळूचे उंडे तयार होतील
  • हे उंडे तयार झाले की, तुम्ही मोदकपात्रात ते उकडवून घ्या. साधारण उकडून घेतल्यावर त्याच्या चकत्या करा
  • दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल तापवा. या अळूवड्या तेलात तळा. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर, ओले खोबरे आणि भाजलेले पांढरे तीळ घाला अधिक चविष्ट लागते. तुमच्या कुरकुरीत आणि खमंग अळूवड्या तयार. 

महत्त्वाच्या टीप्स – 

  • उकडलेल्या अळूवडीवर जर तुम्ही तेल, हिंग आणि मोहरीची फोडणी घातली तर अळूवडी अधिक चविष्ट होते 
  • तुम्ही जर डीपफ्रायपेक्षा शॅलो फ्राय अळूवड्या केल्या तर त्या जास्त कुरकुरीत आणि खमंग लागतात 
  • शक्यतो तीन पानापेक्षा अधिक पाने रोल करण्यासाठी वापरू नका. अन्यथा रोल घट्ट वळला जात नाही आणि मग तळताना अळूवडी फुटण्याची शक्यता असते. रोल घट्ट बांधला गेला तरच अळूवडी नीट तळून बाहेर काढू शकतो

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT