मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
अशा शब्दात महाराष्ट्राचं वर्णन करणारी गोविंदाग्रजांची कविता तुम्हाला माहीत असेलच. महाराष्ट हे राज्य भारताचं आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन हब आहे. जे भारताच्या पश्चिमी भागात वसलं असून इथे सुंदर समुद्रकिनारे, भल्यामोठ्या पर्वतरांगा आणि त्यातील कणखर आणि सर करायला अवघड असणारे गडकिल्ले, जागतिक वारसा असलेल्या अंजिठा लेणी अशी वैविध्यता आहे. आपण जितका महाराष्ट्र फिरू तितकी इथली सांस्कृतिक वाारस्याची ओळख आपल्याला होईल. पण यासोबतच महाराष्ट्र प्रगती आणि विकासामध्येही तेवढाच वेगवान आहे. जसं मुंबई, पुणे. जी आज देशातील विकसित शहरांमध्ये गणली जातात. एक मे ला येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही या राज्याबाबतच्या काही खास गोष्टी इथे शेअर करत आहोत. नक्की वाचा.
भारतातील पहिलं नौदल
थोर योद्धे आणि महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा नौदल ही संकल्पना भारतात साकारली. कान्होजी आंग्रे हे भारतीय नौदलाचे जनक मानले जातात.
महाराष्ट्रातील ‘महा’रस्ते
भारतापैकी महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त रस्त्याचं महाजाळं आहे. आपल्या राज्यातील रस्त्याची लांबी ही तब्ब्ल 2,57,500 किलोमीटर्स एवढी आहे.
आशियातील पहिली रेल्वे
आशियातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे
आशियातील पहिली रेल्वे धावली ती महाराष्ट्रात आणि तेही मुंबई आणि ठाणेदरम्यान 16 एप्रिल 1853 साली. आहे ना आश्चर्यजनक.
एक स्टेशन आणि दोन राज्य
तुम्ही असं स्टेशन पाहिलं आहे का, जे दोन राज्यात आहे. हो..महाराष्ट्रात असं स्टेशन आहे. जे एकाच महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात विभागल गेलं आहे. या स्टेनशचं नाव आहे नवापूर. याचा अर्धा भाग महाराष्ट्र आणि अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. आहे ना आश्चर्याची गोष्ट.
सर्वात मोठं नियोजित शहर
महाराष्ट्रातील सर्वात मोठं नियोजित शहर नवी मुंबई
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे. जे मुंबईच्या समस्या कमी करण्यासाठी वसवण्यात आलं.
जगातील दुसऱ्या नंबरची झोपटपट्टी
एकीकडे नियोजित शहर तर दुसरीकडे धारावीसारखी जगातील दुसऱ्या नंबरची झोपडपट्टीसुद्धा महाराष्ट्रातच आढळते. जी पृथ्वीवरील सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारी झोपडपट्टी आहे.
सच्ची आणि मेहनती जनता
महाराष्ट्रातील जनता ही सच्ची आणि मेहनती आहे, याचा दाखला म्हणजे भारताला आपल्या राज्याकडून टॅक्सरूपात सर्वात जास्त महसूल मिळतो. त्यामुळेच की काय इथे राज्येतर लोकांचे लोंढे रोजच्या रोज दाखल होत असतात.
अजबगजब लोणार सरोवर
पृथ्वीवरील हे असं सरोवर आहे जिथे धूमकेतू पडल्यानंतर सोड्यासारखं पाणी आढळतं. हा धूमकेतू तब्बल 52,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर धडकला होता.
दरवाजे नाहीत.. चिंता नाही
महाराष्ट्रातील आश्चर्यदायी शनी-शिंगणापूर
महाराष्ट्रातील शनी-शिंगणापूर येथील घरांना दरवाजेच नाहीत. कारण येथील लोकांची अशी धारणा आहे की, जर कोणी चोरी केली तर त्याच्यावर शनी देवाचा कोप होईल.
संत-महंताची परंपरा
महाराष्ट्रात अनेक संतांची परंपरा राहिली आहे. महाराष्ट्रात श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज आणि अनेक महान संत होऊन गेले. जे आजही त्यांच्या अनुयायींच्या रूपात महाराष्ट्रात वसतात.
जीवनाचे सार समजून देणारे कोट्स
रामायणाचा प्रारंभ महाराष्ट्रात
असं म्हणतात की, नाशिकमध्ये लक्ष्मणाने शृर्पणखाचं नाक कापल्याची रामायणातील घटना घडली होती. म्हणून या शहराला नाशिक असं म्हटलं जातं. ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये नाक असा आहे.
प्रवेशद्वाराचं शहर
महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर सिटी ऑफ गेट्स म्हणून ओळखलं जातं. या शहरात ऐतिहासिक वास्तूरचना असलेली तब्बल 52 प्रवेशद्वार बांधण्यात आली होती. ज्यापैकी आता फक्त 13 शिल्लक आहेत.
अशा या आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्वातंत्रसंग्रामाचा इतिहास असो वा कधीही न थांबणारी मुंबई असो. आपल्या राज्याची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. एवढं मात्र नक्की खरं. महाराष्ट्र राज्य दिन आणि कामगारदिनाच्या तुम्हालाही शुभेच्छा.