ADVERTISEMENT
home / फॅशन
amazon-great-indian-festival-fashion-and-beauty-bonanza-in-marathi

परफेक्ट फेस्टिव्हल लुकसाठी अमेझॉन ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मध्ये फॅशन आणि ब्युटीचा धमाका

ऑनलाईन शॉपिंग म्हटलं सर्वात पहिली साईट डोळ्यासमोर येते ती म्हणजे Amazon.in. ऑनलाईन शॉपिंग हे खरं आता खूपच कॉमन झालंय पण सणासुदीच्या वेळेला वेळ नसेल तर ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करणे कधीही उत्तम ठरते आणि त्यासाठी विश्वासार्ह नाव असेल तर अमेझॉनचे. कोरोना काळात सर्वात सुरक्षित असा हा पर्याय आहे. यावर्षी खास सणांसाठी तुम्हाला लुक हवा असेल तर तुम्ही अमेझॉनसह फॅशन आणि ब्युटी ऑफर्स पाहून खरेदी करू शकता. अमेझॉनवर फॅशन, ब्युटीपासून ते अगदी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, होमडेकॉर सगळ्याच वस्तू उत्तम मिळतात आणि मुळात ज्याप्रमाणे दाखवल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मिळतात.  यावर्षी सणासुदीला अमेझॉन फॅशन आणि ब्युटीचा वापर करून करा तुमचा फेस्टिव्हल लुक परफेक्ट (Perfect your look this festive season with Amazon fashion and beauty). 3 ऑक्टोबरपासून अमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची (The Great Indian Festival) सुरूवात झाली असून संपूर्ण महिनाभर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. 

काय आहे ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’

सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि त्यामुळेच अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सुरू झाला आहे. तुम्ही तुमच्या फेस्टिव्हल लुकसाठी आणि घरबसल्या सौंदर्य वाढविण्यासाठी अमेझॉनवर ऑर्डर करू शकता. 3 ऑक्टोबरपासून हा फेस्टिव्हल सुरू झाला असून संपूर्ण महिनाभर अर्थात दिवाळीपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. यामध्ये तुम्हाला अनेक खास ऑफर्स अमेझॉनवर दिसून येतील. त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ईएमआयसह अनेक ऑफर्स तुम्हाला या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मध्ये मिळतील आणि तुम्ही पैशांची बचतही करू शकता. कोणत्या गोष्टीतुम्हाला विकत घेता येतील पाहूया. 

एथनिक वेअर (Ethnic Wear)

तुम्हाला या दिवाळीसाठी जर एथनिक वेअरचा पर्याय हवा असेल तर अमेझॉनवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला ही उत्तम संधी आहे. कारण आता करवा चौथ, दिवाळी असे अनेक सण असल्यामुळे ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मध्ये विविध ब्रँड्सच्या एथनिक वेअरची खरेदी तुम्ही करू शकता. दिवाळीच्या सणासाठी खास तुमच्याकडे एथनिक वेअर (Ethnic Wear) असायलाच हवे. W, BIBA, Aurelia असे अनेक ब्रँड्सचे कपडे तुम्ही अमेझॉनवरून मिळवू शकता. तसंच याची किंमतही तुमच्या खिशाला परवडणारी अशी आहे. 

काझो ड्रेस (Kazo Dress)

फेस्टिव्हल असो अथवा कोणताही दिवस असो काही महिलांना आपल्याला हवे तसेच कपडे खरेदी करायला आवडतात. तुम्हालाही जर काझो ड्रेस आवडत असतील. तुम्हाला सणाच्या दिवशीही ऑफिसमध्ये काही कामानिमित्त जावे लागणार असेल आणि कॉर्पोरेट लुक हवा असेल तर तुम्ही काझो ड्रेसचा पर्याय नक्कीच निवडू शकता. तुमच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुम्ही अमेझॉनवरून वेगवेगळे पर्याय निवडू शकता. यामध्ये अनेक रंगांचे पर्यायही उपलब्ध आहेत. 

ADVERTISEMENT

दागिन्यांसाठी आहेत उत्तम पर्याय (Jewellery)

कोणत्याही सणांसाठी अगदी भरजरी दागिनेच हवे असे नाही. सध्या दागिन्यांचे अनेक वेगवेगळे ट्रेंड्स बाजारात पाहायला मिळतात. तुम्हाला जर डेलिकेट दागिने आवडत असतील तर तुम्ही ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मधून वेगवेगळ्या ब्रँड्सचे असे दागिने नक्कीच निवडू शकता. तुमच्या फेस्टिव्हल लुकसाठी खास नाजूक असे दागिने इथे तुम्हाला पाहयाला मिळतात. तसंच अगदी कमी रेंजपासून ते अधिक किमतीपर्यंत तुम्हाला पर्याय इथे सापडतात. 

मेन्स कुरता (Men’s Kurta)

केवळ मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही अगदी भारंभार व्हरायटी इथे मिळते. मुलांसाठी सणाला खास कुरते ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मध्ये उपलब्ध आहेत. मान्यवर (Manyavar) मोहे सारखे अनेक ब्रँड्सचे पर्याय तुमच्या खिशाला परवडतील अशा किमतीमध्ये अमेझॉनवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तुम्हाला तुमची योग्य साईज माहीत असली की, ऑनलाईन शॉपिंग करणे अत्यंत सोपे होते. तसंच कामाच्या गडबडीत तुम्ही बाहेर खरेदी करायला जाणार नसलात तर घरबसल्या उत्तम पर्याय तुम्हाला उपलब्ध होतात. 

मेन्स व्हाईट स्निकर्स (Men’s White Sneakers)

कोणत्याही मुलासाठी व्हाईट स्निकर्स हा नक्कीच जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्हाला अमेझॉनवर व्हाईट स्निकर्सचे विविध पर्याय उपलब्ध आहेत आणि तेदेखील अगदी वाजवी किमतीमध्ये. वेगवेगळ्या ब्रँड्सचे व्हाईट स्निकर्स तुम्ही पाहू शकता आणि खास फेस्टिव्हल लुकसाठी तुम्ही मेन्स व्हाईट स्निकर्स अगदी भावाला भाऊबीजेसाठी गिफ्ट म्हणूनही देऊ शकता. 

आयशॅडो पॅलेट (Eyeshadow Palette)

सणासुदीला मेकअप होणार नाही असं शक्यच नाही. तुम्हाला स्वतःसाठी अथवा भावांना जर बहिणाला काय गिफ्ट द्यायचे असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही आयशॅडो पॅलेटची निवड करा. हे एक उत्तम गिफ्ट ठरू शकतं. तुम्हाला यासाठी विविध पर्याय अमेझॉनवर उपलब्ध आहेत. तसंच याच्या रंगाबाबत संपूर्ण माहितीसह तुम्हाला रिव्ह्यूदेखील वाचता येतात. याशिवाय तुम्हाला अगदी याची दोन दिवसात डिलिव्हरी मिळू शकते. 

ADVERTISEMENT

स्मजप्रूफ लिपस्टिक्स (Smudge Proof Lipsticks)

लिपस्टिक या प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. पण लिपस्टिक पसरते अथवा ती लवकर निघून जाते अशाही तक्रारी असतात. पण आता या तक्रारींना जागा राहणार नाही. कारण तुम्हाला अमेझॉनच्या  ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मध्ये स्मजप्रूफ लिपस्टिक्सचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. Lakme, Maybelline, Myglamm अनेक नावाजलेल्या उत्पादनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. 

हेअर कलर (Hair Colour)

तुम्ही स्वतःच्या त्याच लुकला कंटाळला असाल आणि तुम्हाला स्वतःमध्ये या फेस्टिव्हलदरम्यान काही बदल हवा असेल तर तुम्ही हेअर कलरचा पर्याय नक्कीच निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला अमेझॉनवर अनेक रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. तसंच तुम्ही हेअर कलर घरच्या घरीही करू शकता. तुम्हाला हव्या त्या ब्रँडचा हेअर कलर तुम्ही निवडा आणि तुम्हाला सूट होईल असाच रंग तुमच्या केसांसाठी वापरा आणि दिसा या दिवाळीला अधिक आकर्षक!

बॉडी पॉलिशिंग किट (Body Polishing Kit)

दिवाळी म्हटलं की उटणं आणि इतर सुगंधी गोष्टींचा आपण वापर करतो. चेहऱ्यासह आपण आपल्या शरीराच्या सौंदर्याचीही काळजी घ्यायला हवी. कॉफी स्क्रब अथवा अन्य स्क्रबमुळे आपण आपल्या शरीरावरील डेड स्किन घालवून अधिक काळजी घेऊ शकतो. असंच या सणासुदीसाठी तुम्ही बॉडी पॉलिशिंग किटचा उपयोग करून  अमेझॉनवरून याची खरेदी करू शकता.

भारतासह 22 पेक्षा अधिक देशांमध्ये अमेझॉनवरून खरेदी करण्यात येते. तुम्ही अमेझॉनची प्राईम मेंबरशिपदेखील मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. फास्ट डिलिव्हरी, अनलिमिटेड व्हिडिओ, अॅड फ्री म्युझिक याचाही तुम्हाला लाभ घेता येतो. तसंच अनेक वस्तूंवर तुम्हाला सूटही मिळते. वाट कसली बघताय लवकरच अमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’चा लाभ घ्या!

ADVERTISEMENT
21 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT