Advertisement

लग्नसराई

जेव्हा होणाऱ्या सूनेसोबत सासू-सासऱ्यांनीही धरला ठेका

Aaditi DatarAaditi Datar  |  Feb 27, 2019
जेव्हा होणाऱ्या सूनेसोबत सासू-सासऱ्यांनीही धरला ठेका

सध्या स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळतंय, हम आपके है कौन या चित्रपटासारखं कौटुंबिक दृश्य. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हीचं लग्न होऊन जास्त काळ झाला नाही. तोच त्यांच्या घरी पुन्हा एकदा लग्नसराईला सुरूवात झाली आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचं प्रि-वेडींग सेलिब्रेशन सध्या जोरदार सुरू आहे.

51463711 1977111782591380 7467187737459203733 n

ज्याचे व्हिडीओज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओजची खासियत म्हणजे मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अगदी होणारी सून श्लोका मेहतासुद्धा बॉलीवूड गाण्यांवर मस्त ठेका धरताना दिसत्येय.  

 

Ranbir Kapoor blesses the Couple Of The Hour – Akash & Shloka! 💜

A post shared by Akash Ambani Weds Shloka Mehta (@akashwedsshloka) on Feb 25, 2019 at 12:06pm PST

आकाश आणि श्लोकाचं प्रि-वेडींग सेलिब्रेशन सध्या जगातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू आहे. ज्यामध्ये अंबानी कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि बॉलीवूड सेलेब्सही सामील झाले आहेत.

प्रि-वेडींगमध्ये दिसली ‘हम आपके है कौन’ची झलक

या प्रि-वेडींग फंक्शनमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अगदी फिल्मी स्टाईलमध्ये ‘ए मेरी जोहरजबी’ या गाण्यावर डान्स केला.

एवढंच नाहीतर मुकेश अंबानी यांनी श्लोकाची आई मोना मेहता यांच्यासोबतही ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील ‘आज हमारे दिल में’ या गाण्यावर डान्स केला.

जेव्हा आमीर श्लोकाला म्हणाला ‘ए क्या बोलती तू’

या प्रि-वेडींग सेलिब्रेशनचा शो स्टॉपर होता आमीर खान आणि त्याने घोषणा केली की, तो यावेळी मेहता कुटुंबियांकडून म्हणजेच मुलीकडच्यांच्या बाजूने आला आहे. आमीरने असंही म्हटलं की, श्लोकाला मी माझ्या डोळ्यादेखत मोठं होताना पाहिलं आहे.

या फंक्शनमध्ये आमीरने अंबानी कुटुंबाची होणारी सून श्लोका मेहतासोबत  गुलाम चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘ऐ क्या बोलती तू’ वर डान्स केला.

स्टेजवरील या दोघांचा डान्स उपस्थित असलेल्या सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला.

तर दुसऱ्या व्हिडीओत सर्वजण ‘दिल धडकने दो’ या चित्रपटातील  ‘गल्ला गुडीया’ या गाण्यावर थिरकताना दिसले. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता, किरण खेर, करण जोहर, आमीर खान आणि शाहरुख खानही आहे.

pjimage-1-1544673977
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचं लग्न झालं होतं. ईशाचं प्रि-वेडींग सेलिब्रेशन उदयपूरमध्ये झालं होतं. ज्यामध्ये देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती सामील झाल्या होत्या.

उत्तराखंडमध्ये होऊ शकतं आकाश-श्लोकाचं लग्न
सूत्रानुसार, मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाशचं लग्न ईटली, पॅरीस नाहीतर उत्तराखंडातील रूद्रप्रयाग येथील त्रियुगीनारायण मंदिरात होणार आहे. असं मानलं जातं की, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच देवळात झाला होता. तसंच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मार्च 2018 मध्ये या जागेला वेडींग डेस्टीनेशन म्हणून घोषितही केलं आहे.  

जाणून घ्या कोण आहे श्लोका मेहता
आकाश अंबानीचं लग्न श्लोका मेहताशी होणार आहे, जी हिऱ्याचे व्यापारी आणि रोजी ब्लू चे मालक रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. श्लोका आणि आकाश हे एकत्रच शिकायला होते. दोघंही लहानपणापासूनचे मित्र आहेत. श्लोकाने आपलं शिक्षण लंडनमधून पूर्ण केलं असून सध्या श्लोका ही ब्ल्यू फाऊंडेशनची संचालक आहे. या दोघांचा काही महिन्यापूर्वीच साखरपुडा झाला होता. शिवाय ईशा आणि आनंदच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये  श्लोका सहभागी झाली होती.

फोटो सौजन्य – Instagram

हेही वाचा – 

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्रि-वेडिंग पार्टीमध्ये ‘रणबीर-आलिया’ लाईमलाईटमध्ये

आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाचं ‘मंगल पर्व’, पत्रिका व्हायरल

अनंत अंबानीही अडकणार लग्नाच्या बेडीत