‘कहो ना प्यार है’ फेम अमिषा पटेल अडचणीत येण्याची शक्यता आहे. रांचीमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तिला या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणासंदर्भात तिला कोर्टाने समन्स बजावला असून तिने आता कोर्टात हजर होणे महत्वाचे आहे नाहीतर तिला अटक होण्याची शक्यता सांगितली जात आहे. दरम्यान अमिषा पटेल सध्या कोणत्याही चित्रपटात काम करत नसल्यामुळे ती लाईमलाईटमध्ये असण्याचा काहीच प्रश्न येत नाही.
काय केला घोटाळा,कोणी केली तक्रार
अमिषा पटेल हिच्या विरोधात रांचीमधील चित्रपट निर्माता अजय कुमार यांनी तक्रार दाखल केली. अमिषा पटेल हिने 2.5 कोटीचा चुना लावल्याचे अजय कुमार यांना लक्षात आले. त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या विरोधात कोर्टात केस उभी करण्यात आली. पण सुनावणीच्यावेळी अमिषा कोर्टात हजर राहिली नाही. त्यामुळे त्यावेळीही तिला समन्स बजावण्यात आला. पण आता अमीषा पटेलच्या वकिलांनी तिची बाजू मांडण्याचीही पूर्वतयारी केली असून सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी तिची बाजू मांडली आहे.
आजी आणि नातवाचा हा tiktok व्हिडिओ पाहिलात का?
नेमकं प्रकरण काय?
आता आपल्याला माहीतच आहे की, अमिषा पटेल चित्रपटात फार काही दिसत नाही. या जूनमध्ये तिचा एक चित्रपट रिलीज होणे अपेक्षित होते. ‘देसी मैजिक’ असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटाच्या शुटींगचे बहुतांशी काम झाले होते. पण चित्रपट रिलीज करण्यासाठी काही पैशांचा अडथळा येत होता. एका कार्यक्रमादरम्यान अमिषा आणि अजय कुमार सिंह यांची भेट झाली. यावेळी अमिषाने चित्रपट प्रदर्शनाची अडचण सांगितली आणि अजय कुमार यांच्याकडून 2.5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. अजय कुमार यांच्या तक्रारीनुसार घेतलेले पैसे व्याजाने देण्यासाठी अमिषा तयार झाली. जून मध्ये चित्रपट रिलीज झाला नाही. शिवाय दिलेला चेकही बाऊन्स झाला. त्यामुळे झालेला प्रकार लक्षात येत त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली.
अटकेची केली होती मागणी
अजय कुमार यांनी जून महिन्यात अमिषा विरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या अटकेचा वॉरंट काढा असे देखील म्हटले होते. पण कोर्टाने तिला समन्स बजावला. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नाही. तर तिने तिच्या वकिलाला पुढे केले. आता जर ती कोर्टात हजर राहिली नाही तर तिच्या विरोधात अटक वॉरंट निघेल असे सांगितले आहे. अमिषाच्या या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सप्टेंबरला होणार आहे. अमिषाला पैसे देणे किंवा गुन्हा स्विकारुन अटकेत जाणे या शिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.
नीना गुप्ताने कोणाशी घेतला पंगा की, व्हिडिओत झाला व्हायरल
अमिषा सध्या काय करते
अमिषा पटेल सध्या चित्रपट वगळता सगळे काही करत आहे. देसी मॅजिक या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत झायेद खानसुद्धा दिसणार आहे. हो हा तोच अभिनेता जो ‘मैं हूँ ना’ मध्ये शाहरुख खानचा भाऊ होता.आता हे सगळे प्रकरण मिटून चित्रपट फ्लोअरवर कधी येईल याची प्रतिक्षा आहे. या शिवाय अमिषा सध्या मॉडेलिंग करताना जास्त दिसते. कहोना प्यार है मध्ये गोड- गोड दिसलेली अमिषा आता तशी राहिलेली नाही. तर सध्या ती हॉट आणि सीझलिंग अवतारातच जास्त पाहायला मिळत आहे.
प्रियांका चोप्राच्या व्हेकेशन फोटोसाठी नीक बनला फोटोग्राफर