बीग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे हे अनेकांना माहीत असेलच. या कलेक्शनमधील एक आलिशान गाडी अमिताभ बच्चन यांनी विकली आहे. ही गाडी रोल्स रॉयसमधील असून तिची मूळ किंमत ३.५ कोटी असल्याचे कळत आहे. अमिताभ बच्चन यांनी ही गाडी म्हैसूरच्या एका बिझनेसमनला विकली आहे. ती कितीला विकली या संदर्भातील कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण ही गाडी अमिताभ यांच्यासाठी खास होती, असे देखील कळत आहे. पांढऱ्या रंगाची ही रोल्स रॉयस कार त्यांच्या ताफ्यात या पुढे दिसली नाही. तरी त्यांच्याकडे रॉयल गाड्यांचा खजिना आहे.
जयडीची अनोखी सुरुवात, सुरु होतोय राजकन्येचा नवा प्रवास
अमिताभ यांच्या गाडीची वैशिष्टय
अमिताभ यांच्याकडे एकापेक्षा एक सरस अशा लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलेच. त्यापैकीच एक ही गाडी होती. रोल्स रॉयल फँटम ही ती गाडी असून अमिताभ बच्चन यांचे या गाडीसोबत अनेक फोटो सुद्धा आहेत. सफेद रंगाची ही कार अमिताभ बच्चन यांच्या गाडीच्या कलेक्शनमधील सर्वात महागडी कार होती. विशेष म्हणजे त्यांना ती भेट म्हणून देण्यात आली होती. त्यांनी ही कार अनेक वर्षे वापरली.
जॉनच्या RAW चा ट्रेलर पाहिलात का?
अमिताभ यांना गाडी केली होती गिफ्ट
चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना ही कार भेट म्हणून दिली होती. एकलव्य या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान त्यांनी ही कार त्यांना गिफ्ट दिली होती. साधारण २००७ साली या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले. त्यावेळी रॉयल कारमध्ये मोडणारी ही गाडी होती.रोल्स रॉयलने फँटमची सहावी सीरिज २००३ मध्ये लॉन्च केली. २०१७ साली कंपनीने ती बंद केली. ही गाडी त्या काळातील इतकी महागडी गाडी होती की,या मॉडेलच्या १० हजार गाड्याच विकण्यात आल्या. अमिताभ यांना विधू विनोद चोप्रा यांनी दिलेली ही गाडी त्यांनी खूप वापरली.
रॉयल कारचा खजिना
बीग बी यांना रॉयल गाडयांची आवड आहे. त्यांच्याकडे सध्या मर्सिडीज एस क्लास, रेंज रोवर, बेंटले जीटी, मिनी कूपर,लेक्सस एक्युव्ही अशा आलिशान गाड्या आहेत. त्यांच्या गाड्यांबद्दल अधिक सांगायचे तर त्यांच्यासाठी २ हा क्रमांक लकी आहे. त्यांच्या जन्मतारखेची बेरीजही दोन होते. म्हणून त्यांच्या गाडी क्रमांकामध्ये २ नंबर असणे गरजेचाच आहे.
शुटींगमध्ये व्यग्र
अमिताभ बच्चन आता सरसकट चित्रपटात काम करत नसले तरी त्यांचे अनेक प्रोजेक्ट सध्या सुरु आहेत. नुकतेच ते आमिरसोबत ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यामुळे त्यांच्या रोलची फार काही चर्चा झाली नाही. पण आता ‘बदला’ या चित्रपटातून अमिताभ यांच्या अभिनयाची एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. तापसी पन्नू या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आहे. याशिवाय २०१९ डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातही आलिया-रणबीर कपूरसोबत अमिताभ यांची महत्वपूर्ण भूमिका आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
अमिताभ बच्चन फारसे दिसत नसले तरी ते सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. नवोदितांची पाठ नेहमीच थोपटत असतात. नव्या गोष्टी शिकण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये नेहमीच असते. त्यामुळेच त्यांचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.
(फोटो सौजन्य-Instagram)