अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला आणि सैराट फेम नागराज मजुंळे यांचे दिग्दर्शन असलेला ‘झुंड’ चित्रपट अडचणीत सापडला आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तेलंगणा हायकोर्टाने पूर्णपणे बंदी आणली आहे. ज्यामुळे आता झुंड चित्रपट भारतात, परदेशात अथवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकणार नाही.या चित्रपटाकडून चाहत्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. मात्र आता या सर्व अपेक्षावर पाणी फिरलं आहे.
झुंड चित्रपटावर का घालण्यात आली आहे बंदी
झुंड चित्रपट फुटबॉलवर आधारित आहे. नंदी कुमार यांनी या चित्रपटासाठी दिग्दर्शक नागराज मजुंळे, महानायक अमिताभ बच्चन आणि निर्माते कृष्णन कुमार यांच्यावर नोटीस बजावली होती. त्यांच्यामते या चित्रटपटात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. कारण काही वर्षांपूर्वीच फुटबॉलर अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचे हक्क त्यांनी विकत घेतले होते. अखिलेश पॉल हा 2010 साली झालेल्या फुलबॉल वर्ल्ड कपसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन होता. त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करण्याचा अधिकार नंदी कुमार यांनी विकत घेतला होता. मात्र आता झुंडमधून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ही कथा दाखवण्यात आल्यामुळे कॉपीराईट हक्काचा भंग झाला आहे. नंदी कुमार त्यांच्याबाबत झालेल्या या धोक्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता झुंडच्या प्रर्दशनावरच बंदी घालण्यात आली आहे.
झुंडने केली चाहत्यांची निराशा
झुंड चित्रपट वीस सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. झुंड चित्रपट प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांची कथा मांडण्यात आली होती. झोपडपट्टीत राहण्या-या गरीब मुलांनी खेळातून करियर घडावं यासाठी विजय बारसे यांनी आयुष्यभर प्रयत्न केले होते. समाजाकडून वाईट वागणूक मिळाल्याने वाममार्गाला गेलेल्या काही मुलांना विजय बारसे यांनी फुटबॉलपटू बनवलं होतं. त्यातील काही मुलांनी परदेशातील होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती. अखिलेश पॉल हा त्यापैकीच एक फुटबॉल खेळाडू आहे.झोपडपट्टीत फुटबॉल खेळ रुजवण्याचा बारसे यांचा संघर्ष या सिनेमामधून पाहायला मिळणार होता. शिवाय झुंड हा नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार होता. नागराजने आतापर्यंत मराठीतून फॅन्ड्री, सैराट, नाळ असे लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.त्यामुळे चाहत्यांना या हिंदी चित्रपटामधून अनेक अपेक्षा होत्या. या चित्रपटात महानायकासोबतच नागराजची लकी जोडी ‘आर्शी-परश्या’ अर्थात रिंकू राजगूरू आणि आकाश ठोसर देखील झळकणार होते. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये झुंड चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. या चित्रपटाचं शूटिंग नागपूर मध्ये सुरू करण्यात आलं. खूद्द बिग-बी नेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती शेअर केली होती “झुंडच्या शूटिंगसाठी नागपूरात आहे.मराठी ब्लॉक बस्टर सैराट फेम नागराजचा पहिला हिंदी सिनेमा..आकर्षणाचा केंद्रबिंदू…भौगोलिकदृष्टा नागपूर भारताचा केंद्रबिंदू…दोन केंद्राचे मिलन.” असं म्हणत बिग बी ने नागराजसोबतचा एक फोटो देखील शेअर केला होता.या पोस्टमधून अख्खं नागपूर ‘सैराट’मय झालेलं पाहायला मिळालं होतं. मात्र आता हा चित्रपटच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने चाहत्यांची नक्कीच निराशा झाली आहे. हा चित्रपट केवळ वादात सापडला नसून आता त्याच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
आमिर अलीपासून वेगळं झाल्यानंतर संजीदा झाली आहे जास्तच ‘बोल्ड’
तेलुगु अभिनेत्री श्रावणी आत्महत्या प्रकरणात दोघांना अटक
‘शुभो महालया’साठी रिताभरी चक्रवर्तीने धारण केली दुर्गेची ही विविध रूपं