अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या घरी एका तान्हुल्याचं आगमन झालं आहे. अमृताने नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांनी फॅमिली प्लॅनिंग करत आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. घरात बाळाचं आगमन झाल्यामुळे दोघांच्याही घरात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृता रावने रविवारी सकाळी बाळाला जन्म दिला आहे. बाळंतपणानंतर अमृता आणि तिचे बाळ दोन्ही सुखरूप आहेत. अमृता आणि अनमोलने त्यांच्या बाळाचं या जगात अगदी उत्साहात स्वागत केलं. आई-बाबा होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोड बातमी पोहचली असून सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अमृता आणि अनमोलमध्ये सर्व काही आलबेल
आरजे अनमोल आणि अमृता राव यांनी लग्नाआधी एकमेकांना खूप वर्ष डेट केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एकमेकांसोबत सुखाने संसार सुरू केला. त्यांनी अगदी साध्या पद्धतीने आणि गुपचूप विवाह केला होता. मध्यंतरी त्यांच्यात काहीतरी बिनसलं आहे अशी अफवा पसरली होती. मात्र एका शोच्या माध्यामातून त्यांनी त्यांच्यात सर्वकाही आलबेल सुरू असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. काही महिन्यांपूर्वीच अमृता आई होणार आहे हे सोशल मीडियावरून त्यांनी जाहीर केलं. मात्र त्यांची गूडन्युज त्यांनी अमृताला नववा महिना सुरू झाल्यावर चाहत्यांसोबत शेअर केली. नऊ महिने अमृताने तिचे बेबी बंम्प आणि फोटो व्हायरल होऊ दिले नाहीत. यासाठी तिने चाहत्यांची रितसर माफीदेखील मागितली. तिने या फोटोंसोबत शेअर केलं होतं की, “मला खूप आनंद होत आहे की मी ही गुडन्युज आमच्या हितचिंतक आणि मित्रमंडळींसोबत शेअर करत आहे. शिवाय ही बातमी उशीरा सांगितल्याबद्दल मी सर्वांची माफीदेखील मागते. मात्र हे खरं आहे की आमचं बाळ लवकरच या जगात येणार आहे” मुंबईतील खार हॉस्पिटलमध्ये घेतलेला एक सुंदर फोटो तिने या कॅप्शनसोबत शेअर केला होता. अमृता आणि अनमोलला त्यांच्या खाजगी जीवनातील गोष्टी पटकन जाहीर करायला फारसं आवडत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लग्नाची आणि आईबाबा होणार असल्याची बातमी गुप्त ठेवली होती. ज्यासाठी त्यांनी नंतर चाहत्यांची माफी देखील मागितली.
अमृताने ‘इश्कविश्क’ मधून केलं होतं बॉलीवूडमध्ये पदार्पण
अमृता रावने 2003 इश्कविश्क या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती विवाह, मे हूं ना, जॉली एलएलबी अशा अनेक चित्रपटात झळकली होती. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमध्ये अमृताने मीना ठाकरे यांची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये तिच्या अभिनयाची खूपच प्रशंसा झाली. पण त्यानंतर मात्र अमृता पुन्हा कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. अमृताचा पती अनमोल हा एक प्रसिद्ध आरजे असून तो सध्या एका टीव्ही चॅनेलवरील ‘जॅमइन’ या शोच्या निवेदकाचे काम करत आहे.लग्नाच्या चार वर्षानंतर बाळाच्या आगमनाने आता त्यांच्या संसारिक जीवनात आणखीन आनंदाची भर पडली आहे. घरात आलेल्या या नव्या पाहुण्याचे दोघांच्या घरातील मंडळींनी आनंद आणि उत्साहात स्वागत केलं आहे.
फोटोसौजन्य –
अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचे हे आहे रहस्य, चिरतरूण दिसण्यासाठी करते हे उपाय
प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन