बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. अनन्या सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यात बिझी आहे व चर्चेत असते पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातही ती तिच्या नात्याबद्दल खूप चर्चेत असते. नुकतीच तिच्याबद्दल आणखी एक चर्चा कानांवर पडली आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एक वेगळेच पर्व पाहायला मिळत आहे.काही जोडपी आई-वडील बनून आपल्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू करत आहेत.तर काही जोडपी मात्र ब्रेकअप करून वेगवेगळ्या मार्गांना जात आहेत. आता या यादीत ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचीही नावे आली आहेत. अनन्या पांडे आणि ईशान खट्टरच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. अनन्या पांडे आणि ईशान खट्टर पार्टी, व्हेकेशन आणि डिनर डेटमध्ये अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र, या दोघांनी कधीही आपले नाते सार्वजनिक केले नव्हते. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर आता ते वेगळे झाले आहेत. बी-टाऊनचे हे क्यूट कपल आता वेगळे झाले आहे. सध्या सोशल मीडियावर ईशान खट्टर आणि अनन्या पांडेचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. हे दोघेही एका पॉझिटिव्ह नोटवर विभक्त झाले आहेत.
शाहिदच्या वाढदिवसाच्या पार्टीतही दिसली होती अनन्या
ईशान-अनन्याचे ब्रेकअप ही त्यांच्या चाहत्यांसाठी ही देखील एक धक्कादायक बातमी होती कारण काहीच दिवसांपूर्वी ईशान खट्टरच्या आईने म्हणजेच नीलिमा अजीम यांनी ईशान आणि अनन्या पांडे यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. एका मुलाखतीत त्यांनी या दोघांबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. त्याने सांगितले होते की केवळ ईशानच्या आयुष्याचाच नाही तर अनन्या त्यांच्या कुटुंबाचाही एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी अनन्या पांडेच्या देहरियानचेही कौतुक केले होते. इतकंच नाही तर नीलिमा अजीम यांनी अनन्या पांडे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्याही खूप क्लोज असल्याचे मान्य केले होते. शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही अनन्या दिसली होती. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय दोघांनी मालदीवमध्ये न्यू इयर एकत्र सेलिब्रेट केले होते.अशा परिस्थितीत अचानक आलेली ही ब्रेकअपची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
खाली-पीलीच्या शूटिंगदरम्यान वाढली जवळीक
‘खाली पीली’च्या सेटवर ईशान आणि अनन्या या दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग झाले आणि त्यातून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली. मात्र, 3 वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेर त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सामंजस्याने गोष्टी सकारात्मक नोटवर संपवल्या. दोघेही भविष्यात मैत्रीचे नाते टिकवून ठेवतील. पण या बातमीने अनन्या आणि ईशानच्या चाहत्यांचा मात्र विरस झाला आहे.
चित्रपटात एकत्र काम करू शकतात
अनन्या पांडे आणि ईशान खट्टरच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करू शकतात. कारण त्यांचे ब्रेकअप एका चांगल्या नोटवर झाले आहे. त्यामुळे मैत्रीच्या आघाडीवर सर्व काही ठीक आहे. अनन्या आणि ईशानला वाटते की दोघांचीही दृष्टिकोन वेगवेगळा आहे. अशा परिस्थितीत दोघांनी हा निर्णय घेतला आहे.
या ब्रेकअपचा त्यांच्या कामावर परिणाम होणार नाही अशी चाहत्यांना आशा आहे. अनन्या पांडे विजय देवरकोंडासोबत साऊथच्या लिगर या चित्रपटात दिसणार आहे. तर ईशान खट्टर कतरीना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत फोन बूथ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो पिप्पा या चित्रपटातही काम करत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक