आदित्य नारायण गेले अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. गायक, निवदेक आणि अभिनेता म्हणून त्याने आपली वेगळी ओळख बनवली आहे. सध्या एका रियालिटी शो चे सूत्रसंचालन आदित्य नारायण (Aditya Narayan) करत आहे. मात्र 2022 हे आपल्या सूत्रसंचालनाचे शेवटचे वर्ष असून आपण ब्रेक घेणार असल्याचे एका मुलाखतीमध्ये नुकतेच आदित्यने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो लवकरच बाबा होणार आहे की काय असा अंदाज आता चाहत्यांनी लावयला सुरूवात केली आहे. कारण या मुलाखतीमध्ये आदित्याने आपण ब्रेक घेणार असलो तरीही लवकरच आपण बाबा होणार असल्याची हिंट अर्थात इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या आदित्य आणि श्वेतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अगदी अधिकृत घोषणा केली नसली तरीही लवकरच आदित्य बाबा होणार आणि आदित्यकडे नवा पाहुणा येणार असल्याची कुणकुण आता निर्माण झाली आहे.
रितेश देशमुख पुन्हा मराठीत , पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस “अदृश्य”साठी एकत्र
अप्रतिम सूत्रसंचालक
आदित्य नारायण गेले अनेक वर्ष गाण्याच्या रियालिटी शो चे सूत्रसंचालन करत आहे. त्याला गाण्यापेक्षाही निवेदक म्हणून अधिक जास्त प्रसिद्धी मिळालेली दिसून येते. त्याचे कॉमेडी टायमिंग उत्तम असून तो अनेकांच्या उत्तम मिमिक्रीही करताना दिसून येतो. त्यामुळेच त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. आदित्य नेहमी त्याच्या कामासाठीच चर्चेत असतो. फारच कमी वेळा व्यक्तीगत गोष्टींसाठी त्याची चर्चा झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसह आदित्यने लग्नगाठ बांधली. दहा वर्ष डेटिंग केल्यानंतर श्वेताशी आदित्य विवाहबद्ध झाला. मात्र याबाबत कोणालाही त्याने सांगितले नव्हते. श्वेताबरोबर असणारे त्याचे नाते हे नेहमीच गुलदस्त्यात राहिल्यामुळे आदित्यने लग्नाची घोषणा करताच सर्वांना आश्चर्य वाटले होते. दरम्यान आता आपण लवकरच पिता होणार असल्याचा इशारा आदित्यने मुलाखतीमध्ये दिल्यामुळे आता त्याच्या चाहत्यांना सूत्रसंचालन करताना त्याला पाहता येणार नाही. मात्र हा ब्रेक किती काळापुरता असेल हे आदित्यने सांगितलेले नाही.
मालिकांमध्ये नायिकांना सक्षम दाखविण्यासाठी नायकांना बाहेरख्याली दाखविण्याची काय गरज
काय म्हणाला आदित्य
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल लवकरच आई वडिल होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. आदित्यने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये तसं सूचक वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे. ‘2022 हे सूत्रसंचालक म्हणून माझे शेवटचे वर्ष असेल. त्यानंतर मला मोठ्या जबाबदाऱ्या पेलायच्या असून नंतर मी सूत्रसंचालन करणार नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हाच मी सूत्रसंचालन सुरू केले होते. पुढील वर्षी मी हे काम थांबवेन. कदाचित मी लवकरच बाबा होणार आहे. या इंडस्ट्रीने मला नाव, पैसा, यश सर्व काही दिले. माझं निवेदन करण्याच्या कामावर अत्यंत प्रेम आहे. पण मला आता अधिक काहीतरी मोठं करायचं आहे. यामध्ये मला कोणत्याही अडचणी येऊ द्यायच्या नाहीत’ असे आदित्यने या मुलाखतीमध्ये सांगतिलं आहे. त्यामुळे नक्की आदित्य आणि श्वेता आई – वडील लवकरच होणार असून आता आदित्यचे पुढचे प्लॅन्स काय आहेत याचा अंदाज चाहते लावत आहेत. आदित्य सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. पण सध्या बरेच दिवस त्याने आपल्या पत्नीसह फोटो पोस्ट केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे श्वेता खरंच गोड बातमी सांगणार आहे का असा चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. आता आदित्य कधी अधिकृत घोषणा करतो याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.