अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमीच काहीना काही शेअर करत असते. उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगणा अशी अंकिताची ओळख आहे. अनेकदा ती तिच्या अकाऊंटवरुन डान्स व्हिडिओज शेअर करते. तिचे डान्स व्हिडिओज इतके खास असतात. तिच्या फॅन्सनी तिच्या डान्सची भरपूर स्तुती केली आहे. त्यामुळेच सध्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर अंकिताचे हे डान्स व्हिडिओज भरपूर व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नाही अंकिता ही माधुरी दीक्षितची चाहती आहे. त्यामुळेच माधुरीच्या काही खास गाण्यावरही ती या व्हिडिओजमध्ये थिरकताना दिसत आहे.
हा मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, लॉकडाऊनमध्ये केले होते लग्न
अंकिता उत्तम नृत्यांगणा
‘पवित्र रिश्ता’या मालिकेमुळे नावारुपाला आलेली ही अभिनेत्री उत्तम डान्सर आहे हे तिने केलेल्या रिअॅलिटी शोजमुळे एव्हाना अनेकांना माहीत असेल. इन्स्टाग्रामवर रिल्स आल्यापासून अनेकांनी त्याचे व्हिडिओज शेअर केले आहेत. पण अंकिताने हल्लीच्या काळातच रिल्स बनवायला घेतले आहेत. तिने या आधी काही डान्स व्हिडिओज शेअर केले असले तरी देखील नव्याने शेअर केलेल डान्स व्हिडिओज हे अधिक चांगले आहेत. माधुरीची डाय हार्ट फॅन असलेल्या अंकिताने धक धक करने लगा या गाण्यावर अगदी तसाच हॉट डान्स केला आहे. पिवळ्या रंगाची साडी नेसून अंकिताने हा डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये ती माधुरी दीक्षितला टॅग करायला विसरली नाही. माधुरी दीक्षितच्या गाण्याव्यतिरिक्तही ट्रेडिंग गाण्यावरही ती थिरकताना दिसत आहे.
डॉक्टरनंतर राखी सावंतला व्हायचे आहे गायक
उत्तम ड्रेसेस
अंकिता ही इंडियन आणि वेस्टर्न दोन्हीही प्रकारच्या आऊटफिटवर अधिक सुंदर दिसते. पण तिला इंडियनवेअर जास्त आवडत असावेत हे तिच्या ड्रेसिंगमुळे अनेकदा दिसून येतं. पंजाबी ड्रेसेस, साड्यांमध्ये ती कायम दिसते. तिने डान्सदरम्यान घातलेले ड्रेसही तितकेच सुंदर आहेत. त्यामुळेच तिच्या या डान्सला अधिक चांगला आणि सुंदर न्याय मिळतो असे म्हणायला हवे. तिच्या ड्रेसिंगमुळे ती या व्हिडिओजमध्ये अधिक सुंदर दिसत आहे.
सुशांतच्या गाण्यावर केला डान्स
सुशांतच्या आत्महत्येनंतर खंबीरपणे उभी राहिलेली अंकिता लॉकडाऊन दरम्यान आपण सगळ्यांनी पाहिली. रिलेशनशीप तुटून कितीतरी वर्ष झालेली असतानाही तिने सर्वतोपरी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बरेच दिवस ती सोशल मीडियापासून दूर होती. पण पुन्हा आल्यानंतर तिने सुशांतसाठी एक मोहीम सुरु ठेवली. तिने सुशांतला न्यायम मिळवून देण्यााची विनंतीही केली. विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये असलेल्या अंकिताने भूतकाळातील नात्याला अत्यंत योग्य पद्धतीने हाताळले. सुशांतच्या अनेक आठवणी तिने या दरम्यान शेअर केल्या. तिने झी सिने पुरस्कारादरम्यान सुशांतवर चित्रित झालेल्या गाण्यावर डान्सही केला. पवित्र रिश्ता मालिकेतून सुरु झालेला मानव अर्थात सुशांतचा हा प्रवास फार खडतक होता. पण त्याने स्वत:ला सिद्ध केलं. यासंदर्भातील अनेक पोस्ट आतापर्यंत अंकिताने पोस्ट केल्या आहेत.
आता अभिज्ञा भावेच्या हटके मंगळसूत्राची चर्चा, खास आहे डिझाईन
विकी जैनसोबत करणार लग्न
अंकिता सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर तुटून गेली होती. पण तिच्या आयुष्यातील सुशांतची जागा विकी जैनने भरुन काढली आहे. सध्या ती विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये असून ती लवकरच लग्न करणार आहेत. सध्या ही दोघं त्यांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी बाहेर गेलेली आहेत. तेथील व्हिडिओही अंकिताने पोस्ट केला आहे.
दरम्यान, तुम्ही अंकिताचे हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा.