ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ankita-lokhande-weds-vicky-jain-photo-viral-in-marathi

राजेशाही थाटात केले अंकिता लोखंडेने लग्न, मराठी कलाकारांची हजेरी

लग्नाचा सीझन अगदी जोरात सुरू आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. नुकतेच #vickat चे लग्न पार पडले अर्थात विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची धुंदी अजून लोकांवरून उतरलेली नाही. रोज नवे फोटो आणि आता रिसेप्शनची वाट पाहणे सुरूच आहे. तर एका बाजूला टीव्हीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande). अंकिताने अत्यंत राजेशाही थाटात उद्योगपती विकी जैन (Vicky Jain) याच्याशी लग्नगाठ बांधली. आपल्या सोशल मीडियावरून अंकिताने हे डोळ्याचे पारडे फेडणारे फोटो शेअर केले आहेत. एखाद्या महाराणीप्रमाणे अंकिता लग्नात दिसत होती. तर लग्नामध्ये अनेक मराठी कलाकारांनीही हजेरी लावलेली दिसून आली. अनेक मराठी कलाकारांनी अंकितासह लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अधिक वाचा – कतरिनाच्या अंगठी आणि मंगळसूत्राची का आहे चर्चा, जाणून घ्या किंमत

ग्रँड हयातमध्ये केले लग्न 

गेल्या दोन तीन दिवसांपासून अंकिताच्या लग्नाचे विधी चालू होते. काही दिवसांपूर्वीच अंकिताच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे हे लग्न होणार की पुढे ढकलले जाणार अशी चर्चा होती. मात्र अंकिताने पायाला झालेल्या दुखापतीतही लग्न केले आहे. तर आपल्या मेंदी आणि संगीत सोहळ्यालाही तिने धमाल केली असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विकी आणि अंकिताने सांताक्रुझमधील ग्रँड हयातमध्ये लग्न केले. एखाद्या राजकुमारीला शोभावा असा विवाह सोहळा पार पाडलेला दिसून येत आहे. भव्य मंडप आणि जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत अंकिताचा हा विवाह सोहळा पार पाडला. कोणतीही लपवाछपवी नाही, सेलिब्रिटी असूनही मीडियापासून दूर हा जो ट्रेंड तयार झाला आहे याचा कोणताही अवाजवी वापर न करता अंकिताने लग्न केले असल्याने तिचे चाहतेही तिचे कौतुक करत आहेत. तर विकी आणि अंकिताच्या भावी आयुष्यासाठी अनेकांनी तिला सोशल मीडियावर शुभाशिर्वाद आणि लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अधिक वाचा – लग्नानंतर लेकीची पाठवणी करताना भावूक झाला तारक मेहताचा ‘जेठालाल’

ADVERTISEMENT

मराठमोळ्या कलाकारांची हजेरी

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले आणि चाहत्यांचे मन जिंकून घेतले. तर या मालिकेत अनेक मराठी कलाकारही होते. त्याशिवाय अंकिताचे अनेक मराठमोळे मित्रमैत्रिणी असून त्या सर्वांनी तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. यामध्ये अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, प्रिया मराठे, अभिज्ञा भावे यांनीही तिच्या सर्व सोहळ्यांना हजेरी लावत फोटो पोस्ट केले आहेत. तर अंकिता आपल्या लग्नात अत्यंत आनंदी दिसून येत आहे. गेले अनेक वर्ष विकी जैनला अंकिता डेट करत आहे आणि अखेर तिने लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे तिचे चाहतेही आनंदी आहे. यापूर्वी अंकिता आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या नात्यामुळे अनेकदा तिच्यावर वेगवेगळे आरोपही करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या सगळ्यातून बाहेर येत अंकिताने आपल्या आयुष्याला नवी सुरूवात केली आणि यामध्ये विकीने कायम तिला साथ दिली असल्याचेही दिसून आले आहे. विकीचे अंकितावर असणारे प्रेम नेहमीच दिसून आले आहे. त्यामुळे अंकिताचे भावी आयुष्य हे अप्रतिमच असेल असा विचार करून चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : फिनालेकडे घौडदौड सुरु,अनेक समीकरणे बदलली

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT