दिवसाची सुरूवात तुम्ही कशी करता यावर तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार का ते ठरत असतं. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी, चिरतरूण राहण्यासाठी खूप व्यायाम करतात, डाएट करतात. मात्र आहार अपुरा असेल तर व्यायामाचा काहीच उपयोग होत नाही. कारण शरीराला व्यायामासोबत योग्य पोषणाची तितकीच गरज असते. जर तुम्हाला आहारातून सर्व पोषक घटक मिळत नसतील तर कमीत कमी सकाळी काही शेक अथवा स्मूदी तर नक्कीच प्यायला हवे. जर तुम्हाला कायम चिरतरूण राहायचं असेल तर दिवसाची सुरूवात करा या अॅंटि एजिंग शेकने….यासोबतच वाचा घरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Anti Aging Face Packs In Marathi)
अॅंटि एजिंग शेकचे फायदे
वाढत्या वयासोबत तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. जसं की चाळीशीनंतर हाडांची झीज होते, त्वचा निस्तेज आणि सैल पडते अथवा केस पांढरे होतात. आजकाल वातावरणातील बदलांमुळे वयाआधीच एजिंगच्या खुणा शरीरावर दिसतात. मात्र जर तुम्ही तुमच्या शरीराची योग्य काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच चिरतरूण राहू शकता.शरीर निरोगी आणि टवटवीत राहण्यासाठी व्यायामासोबत योग्य पोषणाची शरीराला गरज असते. यासाठी नियमित प्या हा अॅंटि एजिंग शेक
कसा बनवावा अॅंटि एजिंग शेक
या शेकसाठी वापरण्यात येणारे घटक अॅंटि एजिंग तर आहेतच शिवाय यामध्ये अॅंटि ऑक्सिडंट्सही भरपूर आहेत. नियमित हा शेक पिण्यामुळे तुमचे वजन कमी होत आणि त्वचा टवटवीत राहते. या शेकमध्ये मखाणा वापरण्यात आलेला आहे वाचा मखाना खाण्याचे फायदे (Makhana Benefits In Marathi)
साहित्य
- एक कप मखाणा
- दोन चमचे अळशीच्या बिया
- दोन चमचे भोपळ्याच्या बिया
- एक चमचा सूर्यफुलाच्या बिया
- शंभर ग्रॅम अंजीर अथवा खजूर
- अर्धा लीटर दूध
शेक बनवण्याची पद्धत
- एक भांड्यात अळशी, मखाणा, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया रोस्ट करा
- सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या
- अंजीर अथवा खजूर काही तास भिजत ठेवा
- मऊ झाल्यावर कोमट दुधात सर्व साहित्य मिसळा आणि मिक्सरमध्ये शेक तयार करा.
- फ्रीजमध्ये ठेवून थंडगार शेक तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकता. मात्र हा शेक सकाळी पिणं जास्त फायद्याचं ठरेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक