तणाव मुक्त शरीर, निरोगी शरीर, त्वचेवरील तजेला, शांत झोप या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी काही चांगल्या सवयी अंगी असणे फार महत्वाच्या असतात. व्यायाम किंवा योगसाधना ही चांगल्या आरोग्यासाठी फारच गरजेची असते. प्राणायाम हे सध्याच्या निरोगी आरोग्यासाठीची एक गुरुकिल्ली आहे. त्यामुळे प्राणायाम हा नियमित करायला हवा. प्राणायामाची माहिती जाणून घेताना प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार हे देखील तुम्हाला माहीत हवे. प्राणायामाचे फायदे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. प्राणायामामध्ये कपालभारती, भस्त्रिका, शितली, नाडी शोधन प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, अनुलोम-विलोम याचा समावेश होतो. यामधील अनुलोम- विलोम म्हणजे काय? तो कसा करावा याची योग्य माहिती असायला हवी. त्यासाठीच अनुलोम विलोम प्राणायाम मराठी माहिती आणि अनुलोम विलोम फायदे (Anulom Vilom Benefits In Marathi) खास तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
अनुलोम विलोम प्राणायाम मराठी माहिती (What Is Anulom-Vilom)
अनुलोम-विलोम या प्राणायामाची माहिती घेताना अनुलोम- विलोम म्हणजे काय ते देखील जाणून घेऊया. अनुलोम- विलोम याचा शब्द: अर्थ सरळ आणि उल्टा हा प्राणायाम नाकाशी निगडीत असल्यामुळे नाकाची डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी यातून केलेला श्वासोच्छवास आहे. अनुलोम- विलोम करताना श्वास आत- बाहेर केला जातो. अनुलोम-विलोम या प्राणायाम प्रकाराला खूप जण नाडी शोधन प्राणायाम असे देखील म्हटले जाते. आपल्या नाकपुड्याची डावी बाजू ही आपल्या शरीरात चंद्राची उर्जा दाखवते. चंद्र हा शांतीचा प्रतिक मानला जातो. ज्यामुळे थंडावा मिळण्यास मदत मिळते. यामुळे शरीर थंड होण्यास आणि विविध नाड्या मोकळ्या होण्यास मदत मिळते. डाव्या नाकपुडीला बंद करुन उजव्या नाकपुडीने श्वास सोडल्यामुळे ते आरोग्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे अनुलोम- विलोम हा प्राणायामाचा प्रकार अगदी दररोज करायला हवा. त्यामुळे नक्कीच फायदा मिळतो.
अनुलोम-विलोम कसे करावे? (How To Do Anulom-Vilom)
अनुलोम विलोमची माहिती घेतल्यानंतर ते करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नेमकी कोणती स्टेप्स फॉलो करायला हवी आणि नेमकं कोणत्या पद्धतीने अनुलोम-विलोम करावे ते देखील जाणून घेऊया.
- अनुलोम-विलो करण्यासाठी तुम्हाला एक चांगली स्वच्छ आणि आरामदायी जागा निवडायची आहे. ही अशी जागा हवी ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम आल्हाददायी वाटेल.
- त्या जागेवर तुम्हाला बसण्यासाठी एखादे चांगले आसन निवडायचे आहे. प्राणायामाची वेळ ही देखील जाणून घेणे गरजेचे असते.
- सकाळच्या प्रहरी तुम्ही हा व्यायाम करत असाल तर हे फारच उत्तम. आता तुम्हाला आवडेल असा पद्मासन, बद्धपद्मासन किंवा मांडी घालून तुम्हाला बसायचे आहे.
- पाठीचा कणा ताठ करुन तुम्हाला आता अंगठा डाव्या नाकपुडीवर ठेवायचा आहे. डाव्या नाकपुडीवर अंगठा ठेवून तुम्हाला उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. असे तुम्हाला करत राहायचे आहे.
- ही प्रक्रिया तुम्हाला सुरुवातीला 5-10 वेळा करावे. त्यानंतर तुम्ही अगदी 15 मिनिटांपर्यत ही क्षमता वाढवायची आहे.
- ही प्रक्रिया तुम्ही खुर्चीत बसून देखील करु शकतात. त्यामुळे तुम्हाला जेवणानंतर साधारण चार तासांनी हे करायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही जास्त जेवले असाल तर तुम्ही अजिबात करु नका.
अनुलोम- विलोम फायदे मराठी (Anulom Vilom Benefits In Marathi)
अनुलोम- विलोम कसे करतात हे जाणून घेतल्यानंतर त्याचे नेमके फायदे काय हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. वैज्ञानिकांनीही प्राणायाम हे आरोग्यासाठी चांगले आहे असे म्हटले आहे. जाणून घेऊया अनुलोम-विलोम फायदे मराठी (Anulom Vilom Benefits In Marathi)
ताण-तणाव करते कमी (Reduces Stress)
अनुलोम-विलोम कसा करायचा किंवा अनुलोम विलोम म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणून आली असेल ती म्हणजे चंद्राची शांतता या प्राणायामामध्ये आहे. ताण-तणाव कमी करताना मन: शांती ही फारच महत्वाची असते. अनुलोम-विलोम केल्यामुळे मनाची शांती मिळण्यास मदत मिळते. शरीरावर आलेला ताण- थकवा यामुळे तुम्हाला जर चलबिचल होत असेल किंवा कुठेही लक्ष लागत नाही असे वाटत असेल तर तुम्ही नियमितपणे प्राणायाम करायला हवा. अनुलोम-विलोम केल्यामुळे शरीरावरील ताणतणाव कमी करण्यास मदत करते.
पचनक्रिया करतात सुरळीत (Improve Digestion)
पोटाच्या आरोग्यासाठीही अनुलोम-विलोम हा उत्तम व्यायाम आहे. श्वासोच्छवास घेताना पोटात अडकलेली हवा किवा पोटात असलेले अन्न पचण्याचे काम अगदी सुरळीत होण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहिली की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अनेकदा आरोग्य बिघडण्यास कारणीभूत हे पोटाचे आरोग्य असते. पोटाचे आरोग्य सुरळीत करण्यासाठी आणि पाचकर रसाची क्रिया ही अधिक चांगली करण्यासाठी अनुलोम- विलोम हा व्यायाम चांगला आहे.
श्वासोच्छवास करतो चांगला (Improves Respiratory System)
कोरोनाच्या काळात श्वासोच्छवासावर अधिक लक्ष देणे गरजेचे होते. श्वसानावर या आजाराचा चांगलाच परिणाम होत होता. अशा काळात योगा आणि प्राणायामने बरीच मदत केली. श्वसन क्रिया चांगली होण्यासाठी आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अगदी आवर्जून अनुलोम-विलोम हा व्यायाम करायला हवा. कारण अनुलोम- विलोम आवर्जुन करा. तुम्हाला श्वसनाचा त्रास असेल तर अगदी हमखास हा प्राणायाम करायला हवा.
निरोगी ह्रदय (Healthy Heart)
ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनुलोम-विलोम मदत करते. अनुलोम- विलोम केल्यामुळे ह्रदय चांगले राहते. शरीरात सकारात्मक उर्जा वाढते. शरीरात योग्य आणि अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा मिळाला तर शरीराला अगदी योग्य प्रमाणात रक्तपुरवठा मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही ह्रदयरोगापासून स्वत:ला दूर करण्यासाठी अनुलोम-विलोम (anulom vilom benefits in marathi) करायलाच हवे.
घोरण्याचा त्रास करते कमी (Reduces Snoring Issue)
बरेचदा अपुरी झोप यामुळे झोपेच्या अनेक तक्रारी उद्धभवतात. खूप जणांना शांत झोपही लागत नाही. खूप जणांना शांत झोप येत नसल्यामुळे घोरण्याचा त्रास होतो. अशा लोकांना छातीवर ताण येतो. त्यांचा श्वासोच्छवास नीट होत नाही. अशावेळी जर तुम्ही प्राणायामातील अनुलोम- विलोम (anulom vilom benefits in marathi) हा प्रकार केला तर तुम्हाला झोपताना श्वास घेण्याचा होणारा त्रास कमी होतो. तुमचा श्वास तुम्हाला अगदी सुलभ आणि योग्यपद्धतीने घेता येतो. त्यामुळे घोरण्याचा त्रास असणाऱ्यांनी अगदी न चुकता अनुलोम-विलोम करावे.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. अनुलोम- विलोम करण्यासाठी योग्य वेळ कोणती?
कोणताही योग करताना त्यासाठी योग्य वेळ जाणून घेणे गरजेची असते. अनुलोम- विलोमचे फायदे लक्षात घेता तुम्ही हा व्यायामप्रकार तुम्हाला हवा तेव्हा करु शकता. पण त्यासाठी तुमचे पोट रिकामी असायला हवे. जेवणानंतर साधारण 4 तासांनी तुम्ही अनुलोम-विलोम करायला हवे. रात्री झोपताना तुम्ही ते करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला किमान दोन तासांचे अंतर ठेवायला हवे.
2. अनुलोम हा प्राणायामाचा एक भाग आहे का?
हो. अनुलोम-विलोम हा प्राणायामाचा भाग आहे. हा प्रकार फारच प्रचलित असा प्राणायामाचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या फायद्यांसाठी अगदी हमखास प्राणायाम करु शकता.
3. कपालभारती आणि अनुलोम-विलोममध्ये काय फरक आहे?
कपालभारती आणि अनुलोम- विलोम हा प्राणायामाचा प्रकार आहे. कपालभारतीमध्ये पोटाची हालचाल केली जाते. यामध्ये उच्छवास हा बाहेर काढत अनेक विषारी घटक शरीरातून बाहेर काढले जातात. तर अनुलोम-विलोममध्ये एक एक नाकपुड्यांमधून विषारी घटक बाहेर काढले जातात.