बिग बॉसच्या स्पर्धेत प्रेम, ब्रेकअप होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण सीझन 12 मध्ये अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांच्या जोडीने मात्र खळबळ माजवली. प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्याहून अर्ध्यावयाची जसलीन ही त्यांची गर्लफ्रेंड म्हणून या सीझनमध्ये वावरली. त्यामुळे या विचित्र लव्हस्टोरीला तशीच बरीच प्रसिद्ध मिळाली. आता पुन्हा एकदा जसलीन मथारु चर्चेत आली आहे तिने नव्याने शेअर केलेले होते. हे अनेकांना बुचकाळ्यात पाडणारे आहे. डोक्यावर सिंदूर, हातात चुडा असलेल्या या फोटोमुळे जसलीनने लग्न केल्याची चर्चा होत असल्याच्या चर्चा होत आहेत. तिने अखेर अनुप जलोटा यांच्याशी लग्न केले का ?असे प्रश्न देखील तिला विचारले जात आहे.
साजिदसोबतच्या लग्नाला दिव्याभारतीच्या पालकांचा होता विरोध
जसलीन मथारुने शेअर केले फोटो
जसलीन मथारु तिच्या हॉट अंदाजासाठी बिग बॉसच्या घरातही प्रसिद्ध होती. लोकांचे लक्ष कायम तिच्यावर राहावे म्हणून तिने बिग बॉसमध्येही अनुप जलोटा यांच्याशी जवळीक साधली. त्यापद्धतीची खेळी या दोघांनी या रिअॅलिटी शोमध्ये रंगवली. त्याचा फायदा अनुप जलोटा यांना झाला नाही. पण तिच्या या वागणुकीमुळे जसलीन मथारु घराघरात जाऊन पोहोचली. जसलीन मथारुचे नवे फोटोशूटही आता तितकेच ट्रेंडिग आहे. या फोटोंमध्ये तिचा एक फोटो असा आहे.ज्यामुळे अनेक जण बुचकाळ्यात सापडले आहे. या फोटोमध्ये जसलीनने डोक्यावर सिंदूर आणि हातात चुडा घातला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तिला कमेंट करुन नको नको ते प्रश्न विचारले आहेत. काहींनी तिला अनुप जलोटासोबत लग्न केलं का ? असा खोचक प्रश्नही विचारला आहे. या फोटोमुळेच पुन्हा एकदा अनुप जलोटा आणि जसलीन मथारुबद्दल लोक अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण यामध्ये लोकांचीच निराशा झाली आहे. कारण जसलीनने एका फोटोशूटसाठी हे सगळे घातले असून तिने हा फोटो शेअर केला आहे. चार दिवसांपूर्वी तिने हा फोटो शेअर केला असून तो आता वेगवेगळ्या गॉसिप घेऊन ट्रेंड होऊ लागला आहे.
बिपाशा बासूने साजरा केला लग्नाचा चौथा वाढदिवस,शेअर केला फोटो
आरोप-प्रत्यारोप रिलेशनशीप बदलली मैत्रीमध्ये
अनुप जलोटा एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांनी बिग बॉसमध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्या दोघांनी एकत्र असण्याचे काही दिवस नाटक केले होते. पण नंतर याच कार्यक्रमात त्यांनी गुरु-शिष्य असल्याचा तमाशा केला होता. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी हे नाटक केले होते हे स्पष्ट केले. त्यामुळे अनेकांना त्यांच्या या प्रसिद्धीसाठी केलेल्या ढोंगीपणाचा रागही आला होता.
तिखट स्वभावाचा ’गोड’माणूस ऋषी कपूर
जसलीन सध्या काय करते?
बिग बॉसनंतर जसलीन मथारु प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. कधी तिच्या फोटोंमुळे तरी कधी तिच्या हॉट अंदाजामुळे ती कायमच लक्षात राहिली. तिने अनेक अल्बममध्ये काम केलेले आहे. ती अनुप जलोटा यांची शिष्य असून तिने संगीताचे धडे त्यांच्याकडून घेतलेले आहेत. त्यामुळे ती अनेक शोज देखील करते. याशिवाय ती तिच्या इन्स्टाग्रामवर सतत अॅक्टीव्ह असते. बिग बॉसनंतर ती ‘मुझसे शादी करोगी’ .या शोमध्ये दिसली.
सध्या तरी जसलीन मथारुचे हे फोटो चर्चेत आले आहेत.