ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अनुपम खेर यांच्या आईनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका, व्हिडिओ झाला व्हायरल

अनुपम खेर यांच्या आईनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका, व्हिडिओ झाला व्हायरल

अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटातील संवाद आणि गाण्यांनी सर्वाना अक्षरशः वेडच लावलं. चित्रपट प्रदर्शित होऊन आता दोन महिने झाले तरी त्याची क्रेझ काही संपताना दिसत नाही. सोशल मीडियावर तर या चित्रपटाचे संवाद आणि गाण्यांची हुक स्टेप्स करण्याचा ट्रेंडच आहे. सोशल मीडियावरील पोस्ट आणि रिल्समध्ये सर्वात आधी श्रीवल्लीची गाणी ऐकू येतात. पुष्पा चित्रपटातील सामी, ओ अंटावा आणि श्रीवल्ली ही गाणी सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहेत. यातील श्रीवल्ली गाण्यावर ठेका धरण्याचा मोह अभिनेते अनुपम खेर यांच्या आईलाहा आवरता आलेला नाही.

रणबीर आणि आलियाचं आधीच झालं आहे लग्न, आलिया भटने दिली कबुली

अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडिओ

अनुपम खेर यांची आई दुलारी देवी सतत अनुपम यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिसत असते. अनुपम खेर यांचे त्यांच्या आईवर प्रंचड प्रेम आहे. त्यामुळे पोस्टमधून ते तिच्याविषयी चाहत्यांना नेहमी सांगत असतात. त्यामुळे आता एव्हाना दुलारी देवी यांचा एक खास चाहता वर्ग निर्माण झाला आहे. दुलारी देवी दैनंदिन जीवनातघडणाऱ्या गोष्टी, किस्से सहज बोलत असताना अनुपम खेर शूट करतात आणि सोशल मीडियावर जसं च्या तसं पोस्ट करतात. या व्हिडिओजमधून दुलारी देवीचं मुलांवरील प्रेम, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि उतार वयातही असलेला उत्साह नेहमीच दिसून येतो. आता तर त्यांनी चक्क पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर ताल धरला आहे. दुलारी देवींनी या गाण्यातील अल्लू अर्जुनची श्रीवल्ली हुक स्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. वयोमानानुसार त्यांनी या गाण्यावर धरलेला ताल पाहून तरूणांनाही आश्चर्य वाटू शकतं इतका हा डान्स गोड आहे. अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शेअर करत पोस्ट केलं आहे की,”हे एपिक आहे… धन्यवाद वृंदा आईसाठी तू हा व्हिडिओ बनवलास. सोबत त्यांनी #dularirocks असं शेअर केलं आहे. 

अभिजीत आमकर आणि कयादू यांची जोडी ‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून भरणार प्रेमाचे रंग

ADVERTISEMENT

पुष्पाचं तोंडभरून केलं कौतुक

काही दिवसांपूर्वीच अल्लु अर्जुनचा सुपरहिट चित्रपट पुष्पाचं अनुपम खेर यांनी कौतुक केलं होतं. हा चित्रपट त्यांनी बघितला आणि त्यांना अल्लु अर्जूनला कौतुकाची थाप दिल्याशिवाय राहवलं नाही. एवढंच नाही तर आता अनुपम खेर यांना अल्लु अर्जुनसोबत कामदेखील करण्याची इच्छा आहे. याआधी आलिया भटनेही अशीच इच्छा व्यक्त केली होती. थोडक्यात आता सर्व बॉलीवूडलाच पुष्पा आणि अल्लु अर्जूनचं वेड लागलं आहे असंच दिसून येत आहे. त्यात त्यांच्या घरतील मंडळीही कुठेच मागे नाहीत.

तुम्हाला अनुपम खेर यांची आई दुलारी देवीचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. 

‘रॉकेट बॉईज’ आधुनिक भारत घडवणाऱ्या शास्त्रज्ञांना मानवंदना – सिद्धार्थ रॉय कपूर 

15 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT