ADVERTISEMENT
home / मनोरंजन
anupama-fame-actress-anagha-bhosale-officially-quitting-entertainment-industry-for-spiritual-path-in-marathi

‘अनुपमा’तील मराठमोळ्या अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीला केला रामराम

मालिका, टीव्ही, मनोरंजन ही इंडस्ट्री अनेकांना खेचून घेते. हे फेम सर्वांनाच हवंहवंसं वाटतं. लहान पडद्यावरील हिंदी मालिका ‘अनुपमा’ (Anupma) ही नेहमीच टीआरपी (TRP) मध्ये पहिल्या नंबरवर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आणि भूमिका करणारे अभिनेता आणि अभिनेत्री यांची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ आहे. पण या मालिकेतील प्रसिद्ध अशा मराठमोळ्या अभिनेत्रीने मालिकाच नाही तर अगदी टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. सोशल मीडियावरून घोषणा करत अभिनेत्री अनघा भोसले हिने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले आहे. यापुढे अनुपमा मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी अनघा भोसले (Anagha Bhosale) आता प्रेक्षकांना पुन्हा पडद्यावर दिसणार नाही. अनघा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसून आली आहे. पण आता तिने कायमचा मनोरंजन इंडस्ट्रीला रामराम ठोकल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच आपण असे का केले याबाबतही तिने माहिती दिली आहे. अनघाच्या चाहत्यांसाठी हे धक्कादायक असले तरीही अनघाने मात्र आपला निर्णय जाहीर केला आहे. 

का घेतला अनघाने असा निर्णय?

अनघाने आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत आपण मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा नक्की का निर्णय घेत आहोत ते सांगितले आहे. “हरे कृष्ण. मी शो मध्ये का दिसत नाही याबाबत तुम्हाला सर्वांनाच काळजी वाटत असल्याचे मला समजले आहे. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे. पण ज्यांना माझ्याबाबत माहीत नाही, त्यांना मला सांगायचे आहे की, मी अधिकृतपणे चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला रामराम केला आहे. या निर्णयाचा तुम्ही सर्वांना आदर करावा आणि मला पाठिंबा द्यावा अशीच माझी इच्छा आहे. हा निर्णय मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी घेतला आहे” यानंतर अनघाने पुढे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

अनघा पुढे म्हणाली की, “आपण सर्वच देवाची मुले आहोत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपल्या सर्वांची इच्छा एकच असली तरीही मार्ग वेगळे आहेत. यावर आपण सर्वांनीच विश्वास ठेवायला हवा. देव आतापर्यंत माझ्याशी नेहमीच दयाळूपणे वागला आहे. ज्या उद्देशाने आपण या आयुष्यात आलो आहोत, तो उद्देश पूर्ण करणे आपलीच जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी त्याची इच्छा आणि प्रेम जाणून घ्यायला हवं. त्यामुळे आपल्याला हवी असणारी उत्तरे ही आपल्याला भगवद्गीतेद्वारे मिळतील. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी माझ्या आयुष्यातील नव्या गोष्टींबाबत नक्कीच नेहमी सांगत राहीन. सर्व धर्म आणि सर्वांच्या प्रवासाचा मला आदर आहे.” अनघाने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

अनघाला मिळाले अनुपमातील भूमिकेमुळे यश 

अनघाने याआधी दादी अम्मा…दादी अम्मा मान जाओ या मालिकेतून काम केले होते. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती अनुपमा या मालिकेतील नंदिनी या भूमिकेमुळे. पण आता हे सर्व फेम सोडून अध्यात्माच्या मार्गाने अनघा जात असल्याचे तिने घोषित केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. अचानक तिने हा निर्णय घेतला अशीही चर्चा आता होत आहे. याआधी तिने ब्रेक घेतल्याचे सांगिण्यात येत होते. मात्र अनघाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT