ADVERTISEMENT
home / Recipes
Appe Recipes In Marathi

तुम्हालाही आवडतात आप्पे तर बनवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने (Appe Recipes In Marathi)

सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ पण त्याला आपण मराठमोळा कधी बनवला कळलंच नाही. अप्पमचे आप्पे करून त्यामध्ये अनेक विविधता आणली गेली. रवा आप्पे (rava appe recipe in marathi) ही मूळ खासियत. पण त्यामध्ये विविधता आणून तांदळाच्या पिठाचे आप्पे, कोल्हापुरी आप्पे (kolhapuri appe recipe in marathi), दुधीचे आप्पे असे अनेक प्रकार करता येऊ लागले. आप्पे कोणतेही असोत त्याची चव जिभेवर रेंगाळत राहतेच. अशाच विविध आप्पे रेसिपी (appe recipes in marathi) आम्ही या लेखातून खास तुम्हाला देणार आहोत. तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने सकाळची घाई असली तरीही काही शॉर्टकट्स वापरून तर कधी रविवारचा आळसाचा दिवस असल्यावर मस्त आप्पे मेजवानी नक्कीच करू शकता. तुमच्यासाठी आप्पे रेसिपी मराठीत खास. कधीही हवा असेल झटपट नाश्ता रेसिपी तर अनेक पदार्थाप्रमाणे तुम्ही आप्पेही करू शकता. 

तांदळाच्या पिठाचे आप्पे (Tandalache Appe Recipe In Marathi)

Tandalache Appe Recipe In Marathi

Instagram

सहसा रवा अथवा तांदळाच्या पिठाचे आप्पे आणि उडीद डाळ मिक्स करून आप्पे बनवले जातात. हा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. तसंच दुपारी जेवेपर्यंत पोट अगदी व्यवस्थित भरून राहते. त्यामुळे हे तांदळाच्या पिठाचे आप्पे बनवणं तसं सोपं आहे. पाहूया याची रेसिपी 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 1 वाटी उडीद डाळ
  • 3 वाट्या उकडीचा, किंवा साधा तांदूळ किंवा इडलीचा रवा असल्यास अडीच वाटी
  • पाव वाटी जाडे पोहे
  • चवीनुसार मीठ
  • तेल

बनविण्याची पद्धत 

  • सकाळी उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला. रात्री दोन्ही मिक्सरमध्ये वाटून एकत्र करुन एका पातेल्यात ठेऊन द्या. इडलीरवा वापरणार असाल तर सकाळी भिजत घालायची गरज नाही. रात्री उडीद डाळ वाटल्यावर त्यात रवा मिक्स करुन थोडे पाणी घालायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी हे मिश्रण वर आले असेल. या मिश्रणात अर्धा वाटी पोहे भिजवून मिक्सरमधून वाटून घ्या. पीठ इडलीच्या पिठाप्रमाणेच पातळ ठेवायचे असते. त्यात मीठ घाला आणि चांगले ढवळून घ्या.
  • आप्पेपात्र गॅसवर चांगले तापवा व त्यात तेल घालून (जर नॉनस्टीक भाडे असेल तर दोन थेंबही तेल चालते, बिडाच्या भांड्याला थोडे जास्त तेल लागते) 1-1 चमचा आप्पेपात्राच्या वाट्यात मिश्रण टाकून 4-5 मिनिट्स मध्यम आचेवर शिजू द्या
  • सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने आप्पे उलटे करा आणि परतल्यावर पुन्हा 4-5 मिनिटे ठेवा. तुमचे गरमागरम चविष्ट आप्पे तयार आहेत. खोबऱ्याच्या चटणीसह याचा स्वाद अप्रतिम लागतो. त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडेल तशा ओल्या नारळाच्या चटणीसह खायला द्या. यात हवं तर तुम्ही लसूणही घालू शकता.

कोल्हापुरी आप्पे (Kolhapuri Appe Recipe In Marathi)

Kolhapuri Appe Recipe In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

कोल्हापुरी आप्पे हे नेहमीच्या आप्प्यांपेक्षा थोडे वेगळे आणि झणझणीत असतात. पण याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते. कोल्हापुरी आप्पे कसे करायचे जाणून घेऊया 

साहित्य 

  • 1 वाटी उडीद डाळ
  • 3 वाट्या उकडीचा, किंवा साधा तांदूळ
  • पाव वाटी चणाडाळ 
  • थोडेसे मेथी दाणे 
  • एक वाटी जाडे पोहे
  • चवीनुसार मीठ
  • ओल्या खोबऱ्याचे तुकडे 
  • 3-4 हिरवी मिरची 
  • लसणीच्या 3-4 पाकळ्या
  • आल्याचे तुकडे 
  • चिरलेली कोथिंबीर
  • मीठ
  • साखर
  • तेल
  • जिरे 
  • मोहरी

बनविण्याची पद्धत 

  • उडीद डाळ, तांदूळ, चणाडाळ, मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवणे
  • पोहे धुऊन घेणे आणि वरील मिश्रण हे पोहे घालून मिक्सरमधून वाटून काढणे 
  • हे एका डब्यात बंद करून आठ तास ठेवणे 
  • दुसऱ्या दिवशी हे पीठ फुगून येते. ते मग व्यवस्थित ढवळून घेणे 
  • मिक्सरमध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे, हिरव्या मिरची, लसूण, चिरलेली कोथिंबीर, आल्याचे तुकडे, मीठ, साखर घालून मिक्सरमधून चटणी तयार करून घेणे. त्याला वरून तेलात जिरे मोहरी घालून फोडणी देणे 
  • आप्पेपात्रात तेल घालून त्यात वरील मिश्रण घालणे. एक बाजू झाल्यावर आप्पे परतणे आणि खरपूस आप्पे चटणीसह खायला देणे 

मिश्र डाळीचे आप्पे (Misra Appe Recipe In Marathi)

Misra Appe Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Instagram

बऱ्याचदा सगळीकडे स्वयंपाकघरात सगळ्या डाळींचा उपयोग होत नाही. पण तुम्ही मिश्र डाळींचा उपयोग करून आप्पे करू शकता. 

साहित्य 

  • 1 वाटी तांदूळ
  • 1 वाटी मूग डाळ
  • 1 वाटी उडीद डाळ
  • 2 मिरची
  • 1 इंच आले
  • 2 चमचे कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • 3 चमचे तेल

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुऊन पाण्यात 4 ते 5 तास भिजत घालाव्यात…
  • 4/5 तासानंतर मिक्सर मधून काढून घ्यावे…मिरची, आले आणि कोथिंबीर पण मिक्सरमधून काढून त्या पिठात टाकावी आणि मीठ घालावे.
  • आता आपले आप्याचे पीठ तयार आहे. आप्पे पत्रात थोडे तेल घालावे त्यात पीठ टाकावे. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे. आपले आप्पे तयार आहेत. चटणी सोबत सर्व्ह करावेत

पोहे आप्पे अर्थात पोह्याचे आप्पे (Poha Appe Recipe In Marathi)

Poha Appe Recipe In Marathi

Instagram

महाराष्ट्रीयन घरांमध्ये नाश्त्याला पोहे हे खूपच कॉमन आहेत. पण पोहे खायचा कंटाळा आला आसेल तर तुम्ही पोह्याचे आप्पे करून नक्कीच खाऊ शकता. जाणून घ्या पोह्याच्या आप्प्याची रेसिपी 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1 वाटी पोहे
  • 1/2 वाटी दही
  • 2 चमचे तांदळाचे पीठ
  • 1 सिमला मिरची
  • 1 गाजर
  • 1 कांदा
  • 1 टॉमॅटो
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 छोटा चमचा जिरे
  • 2 चमचा कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

बनविण्याची पद्धत 

  • पहिल्यांदा एका पातेल्यात एक वाटी पोहे घ्या आणि ते स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुऊन घ्या. दहा मिनिटे बाजूला ठेवा
  • दहा मिनिटा नंतर पोह्यामध्ये तांदळाचे पीठ घाला. त्यात चिरलेली सिमला मिरची, गाजर, जिरे, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
  • मग तयार झालेले मिश्रण फार घट्ट झाल्यास त्यात थोडे पाणी घालून मिश्रण व्यवस्थित करून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि  कोथिंबीर घालून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
  • नंतर तयार करून घेतलेले मिश्रण आप्पेपात्रात घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे, गरमागरम पोह्याचे आप्पे

उपवासाचे आप्पे (Upvasache Appe Recipe In Marathi)

Upvasache Appe Recipe In Marathi

Instagram

 

आप्पे तुम्ही उपवासासाठीही करू शकता. आपल्याकडे उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आहे. पण तेच तेच पदार्थ खाऊन कधीतरी कंटाळा येतो. मग अशावेळी तुम्ही उपवासाचे आप्पे नक्कीच करू शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 100 ग्रॅम साबुदाणा
  • 250 ग्राम भगर
  • इनो
  • 3 मिरची हिरवी
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • 1 वाटी दही
  • 2 टेबलस्पून तेल

बनविण्याची पद्धत 

  • साबुदाणा आणि भगर दोन्ही मिक्सरमधून बारीक रवाळ करून घ्या. दोन्ही एकत्र करून त्यामध्ये दही आणि पाणी घालून इडलीचे पॅटर्न भिजवतो आपण तसे भिजत घाला 2 तास झाकून ठेवा.
  • दोन तास झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, मिरची घाला. Eno एक चमचा घाला आणि चांगले फेटून घ्या.
  • आप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये एक मिश्रण घाला आणि तेल सोडून झाकून ठेवा एक मिनिटानंतर परतून घ्या. उपवासाचे आप्पे तयार आहेत
  • आप्प्यांसोबत तुम्ही ओल्या नारळाची उपवासाची चटणी खाऊ शकता

 

रवा आप्पे (Rava Appe Recipe In Marathi)

Rava Appe Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Instagram

अधिकाधिक घरांमध्ये रवा आप्पे बनवले जातात. पण जर तुम्हाला याची रेसिपी माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला याची सोपी रेसिपी इथे देत आहोत. 

साहित्य 

  • पाऊण वाटी जाडसर रवा 
  • पाऊण ते एक वाटी आंबट ताक (नसेल तर आंबट दही)
  • चवीपुरते मीठ 
  • जिरे 
  • 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे 
  • कढीपत्ता पाने 
  • कापलेला एक कांदा 
  • आलं – लसूण पेस्ट 1 चमचा 
  • खाण्याचा सोडा चिमूटभर 
  • तेल 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • रवा आणि ताक रात्रभर भिजवून ठेवावे. सकाळी त्यात जिरे, मिरची, कढीपत्ता, आले – लसूण पेस्ट, कांदा, मीठ सर्व मिक्स करावे. त्यात खाण्याचा सोडादेखील मिक्स करून घ्यावा 
  • अगदी पातळ आणि अगदी जाड असेल ठेऊ नये. नंतर हे मिश्रण आप्पेपात्रात तेल सोडून त्यात घालावे 
    वरून झाकण ठेवा आणि 4-5 मिनिट्स खरपूस भाजून घ्या. 
  • काट्याने पलटून दुसऱ्या बाजूला भाजा
  • नारळाच्या चटणीसह गरमागरम खा

दुधीचे आप्पे (Dudhiche Appe Recipe In Marathi)

Dudhiche Appe Recipe In Marathi

Instagram

खरं तर दुधी खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पण दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडत नाही. मग अशावेळी दुधीचे आप्पे खमंग आणि चविष्ट बनवून तुम्ही अगदी मुलांनाही खायला देऊ शकता. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1 कप साल काढून दूधीचे तुकडे
  • 1 कप रवा
  • 1/2 कप दही
  • 5 मिरच्या
  • कोथिंबीर
  • 1 चमचा आले
  • मीठ चवीनुसार
  • 1 इनो पॅकेट

तडका देण्यासाठी

  • मोहरी
  • 1 चमचा चणाडाळ,
  • 1 चमचा उडीद डाळ, कडीपत्ता
  • 1 चमचा हिंग
  • 1/4 कप पाणी
  • 1 चमचा तीळ
  • तेल

बनविण्याची पद्धत 

  • मिक्सरमध्ये दुधी,रवा,दही,आलं,मिरची, कोथिंबीर,मीठ घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्या
    फोडणीपात्रात फोडणीचे साहित्य घालून ही खमंग फोडणी तयार मिश्रणात घालून मिक्स करून घ्या. मिश्रण फार घट्ट वाटले तरच त्यात थोडेसे पाणी घाला.
  • फोडणी ओतल्यावर मिश्रण छान मिक्स करून घ्या. इनो घालून चमचाभर पाणी घालून मिक्स करून घ्या.
  • आप्पे पात्रात तेल घालून त्यात थोडे तीळ घालून तडूतडू द्या‌. नंतर तयार मिश्रण घालून दोन्ही बाजूने आप्पे छान भाजून घ्या. आप्पे खाण्यासाठी तयार 

रागी आप्पे (Ragi Appe Recipe In Marathi)

Ragi Appe Recipe In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

हल्ली बरेच जणांना हेल्दी खाणे जास्त आवडते. रागीचे अनेक पदार्थ करण्यात येतात. रागीचे आप्पेदेखील तुम्ही करू शकता. त्यासाठी नक्की काय करावे लागते त्याची रेसिपी जाणून घेऊ 

साहित्य 

  • 60 ग्रॅम नाचणीचे (रागी) पीठ अर्धा मेजरींग कप
  • 2 टेबलस्पून बारीक रवा
  • 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • 3 टेबलस्पून फेटलेले दही (१/४ कप)
  • 1 लहान कांदा
  • 1 चमचा कांदा पात
  • दीड चमचा कोबी बारीक चिरलेली
  • 1 लहान टॉमेटो
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
  • दीड चमचा स्वीट कॉर्न
  • दीड चमचा आलं मिरची पेस्ट
  • 1 टीस्पून जिरेे
  • 1 टेबलस्पून तीळ
  • मीठ चवीनुसार

बनविण्याची पद्धत 

  • पहिल्यांदा एका भांड्यात रागी पीठ, बारीक रवा, तांदळाचे पीठ, मीठ हे सर्व मिक्स करुन घ्या. मग त्यात फेटलेले दही मिक्स करा आणि थोडे पाणी घालून इडलीच्या बॅटर सारखे बॅटर बनववा आणि  चांगले फेटून घ्या. हे फेटलेले बॅटर रात्रभर झाकून ठेवा किंवा लगेच करावयाचे असल्यास त्यात पाव पॅकेट इनो किंवा पाव टी स्पून सोडा घालावा.
  • आता फर्मेंट झालेल्या बॅटरमध्ये सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून आलं मिरची पेस्ट, मीठ, तीळ हे सर्व घालून मिक्स करुन घ्या
  • गॅस वर आप्पे पात्र ठेवून त्यात थोडसं तेल घालून मग त्यात वरील मिश्रण घाला आणि दोन मिनिटे वाफवून नंतर दोन्ही बाजूने शेकून घ्या. चांगले खरपूस भाजू द्या. तुमचे रागीचे आप्पे तयार आहे. नारळाच्या चटणीसह अथवा सॉससह खायला द्या. 

साबुदाण्याचे आप्पे (Sabudana Appe Recipe In Marathi)

Sabudana Appe Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Instagram

उपवासाचे आप्पे आपण पाहिलेच. पण तुम्ही उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी करत असाल तर साबुदाण्याचे आप्पे हादेखील चांगला पर्याय आहे. इतकंच नाही तर आप्पेपात्रात बटाटेवडेही छान तयार होतात.

साहित्य 

  • भिजलेला साबुदाणा 
  • उकडलेला बटाटा
  • हिरव्या मिरच्या 
  • चवीनुसार मीठ 
  • शेंगदाणे कूट
  • जिरे 
  • शेंगदाणे 
  • आल्याचे तुकडे
  • वरीचे पीठ 
  • आलं – मिरची पेस्ट 
  • साखर 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • रात्रभर साबुदाणे भिजत ठेवा. बटाटा उकडून मॅश करून घ्या
  • एका भांड्यात भिजलेला साबुदाणा काढून घेणे. त्यात वरीचे पीठ, जिरे, चिरलेली कोथिंबीर (हवी असल्यास), मॅश केलेला बटाटा, शेंगदाणे कूट, मीठ, साखर, आलं मिरची पेस्ट हे सर्व मिक्स करून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्या.
  • हाताने व्यवस्थित मळून त्याचा गोळा करून घ्या
  • आप्पेपात्रात तेल घाला. त्यात साबुदाण्याचे बनवलेले गोळे घाला. मस्तपैकी दोन्ही बाजूने खरपूस भाजा. साबुदाण्याचे आप्पे तयार आहेत. 
  • दुसऱ्या बाजूला शेंगदाणे, मिरची, आलं, मीठ, कोथिंबीर, साखर घालून मिक्सरमधून जाडसर चटणी वाटून घ्या आणि आप्पे यासह खायला द्या 

रवा कॉर्न आप्पे (Rava Corn Appe Recipe In Marathi)

Rava Corn Appe Recipe In Marathi

Instagram

रव्याचे आप्पे तर आपण कसे बनवायचे जाणून घेतले आहेच. पण मुलांना यामध्ये विविधता देण्यासाठी आपण त्यात कॉर्न अर्थात मक्याच्या दाण्यांचाही समावेश करून घेऊ शकतो. रव्याच्या अनेक रेसिपी आपण बनवत असतो. रव्याचे पदार्थ बनवत असाल तर रव्याचे आप्पेही तुम्ही बनवू शकता. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • पाऊण वाटी जाडसर रवा 
  • पाऊण ते एक वाटी आंबट ताक (नसेल तर आंबट दही)
  • उकडलेले मक्याचे दाणे (मॅश करून)
  • चवीपुरते मीठ 
  • जिरे 
  • 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे 
  • कढीपत्ता पाने 
  • कापलेला एक कांदा 
  • आलं – लसूण पेस्ट 1 चमचा 
  • खाण्याचा सोडा चिमूटभर 
  • तेल 

बनविण्याची पद्धत 

  • रवा आणि ताक रात्रभर भिजवून ठेवावे. सकाळी त्यात जिरे, मिरची, कढीपत्ता, आले – लसूण पेस्ट, कांदा, मीठ सर्व मिक्स करावे. यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे मॅश करून अथवा तुम्हाला अख्खे हवे असतील तर त्याप्रमाणे मिक्स करा त्यात खाण्याचा सोडादेखील मिक्स करून घ्यावा 
  • अगदी पातळ आणि अगदी जाड असेल ठेऊ नये. नंतर हे मिश्रण आप्पेपात्रात तेल सोडून त्यात घालावे 
  • वरून झाकण ठेवा आणि 4-5 मिनिट्स खरपूस भाजून घ्या. 
  • काट्याने पलटून दुसऱ्या बाजूला भाजा
  • नारळाच्या चटणीसह गरमागरम खा

मिक्स व्हेज आप्पे (Mix Veg Appe Recipe In Marathi)

Mix Veg Appe Recipe In Marathi

Instagram

घरात बरेचदा काही जण भाजी खात नाही. मग अशावेळी सर्व भाज्या पोटात जायला हव्या असतील तर मिक्स व्हेज आप्पे हा खूपच चांगला पर्याय आहे. मिक्स व्हेज आप्पे रेसिपी मराठीत

ADVERTISEMENT

साहित्य

  • 2 चमचे बारीक रवा
  • 2 चमचे तांदळाचे पीठ
  • 3 टेबलस्पून फेटलेले दही (१/४ कप)
  • 1 लहान कांदा
  • 1 चमचा कांदा पात
  • दीड चमचा कोबी बारीक चिरलेली
  • दीड चमचा सिमला मिरची
  • 1 लहान टॉमेटो
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
  • दीड चमचा स्वीट कॉर्न
  • दीड चमचा आलं मिरची पेस्ट
  • 1 टीस्पून जिरेे
  • 1 टेबलस्पून तीळ
  • मीठ चवीनुसार

बनविण्याची पद्धत 

  • पहिल्यांदा एका भांड्यात बारीक रवा, तांदळाचे पीठ, मीठ हे सर्व मिक्स करुन घ्या. मग त्यात फेटलेले दही मिक्स करा आणि थोडे पाणी घालून इडलीच्या बॅटर सारखे बॅटर बनववा आणि  चांगले फेटून घ्या. हे फेटलेले बॅटर रात्रभर झाकून ठेवा किंवा लगेच करावयाचे असल्यास त्यात पाव पॅकेट इनो किंवा पाव टी स्पून सोडा घालावा.
  • आता फर्मेंट झालेल्या बॅटरमध्ये सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून आलं मिरची पेस्ट, मीठ हे सर्व घालून मिक्स करुन घ्या
  • गॅस वर आप्पे पात्र ठेवून त्यात थोडसं तेल घालून मग त्यात वरील मिश्रण घाला आणि दोन मिनिटे वाफवून नंतर दोन्ही बाजूने शेकून घ्या. चांगले खरपूस भाजू द्या. तुमचे रागीचे आप्पे तयार आहे. नारळाच्या चटणीसह अथवा सॉससह खायला द्या. 

डोसा बॅटर आप्पे (Dosa Batter Appe Recipe In Marathi)

Dosa Batter Appe Recipe In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

डोसा आपण घरी करतोच. पण याच डोसा बॅटरचे तुम्ही आप्पेही तयार करू शकता. कधी कधी डोसा खायचा कंटाळा येतो. मग या बॅटरचे चविष्ट आप्पे बनवा आणि खा. 

साहित्य 

  • 1 वाटी उडीद डाळ
  • 3 वाट्या उकडीचा, किंवा साधा तांदूळ किंवा इडलीचा रवा असल्यास अडीच वाटी
  • पाव वाटी जाडे पोहे
  • चवीनुसार मीठ
  • तेल

बनविण्याची पद्धत 

  • सकाळी उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला. रात्री दोन्ही मिक्सरमध्ये वाटून एकत्र करुन एका पातेल्यात ठेऊन द्या. रात्री उडीद डाळ वाटल्यावर त्यात रवा मिक्स करुन थोडे पाणी घालायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी हे मिश्रण वर आले असेल. या मिश्रणात अर्धा वाटी पोहे भिजवून मिक्सरमधून वाटून घ्या. पीठ डोशाच्या पिठाप्रमाणेच पातळ ठेवा. त्यात मीठ घाला आणि चांगले ठवळून घ्या.
  • आप्पेपात्र गॅसवर चांगले तापवा व त्यात तेल घालून (जर नॉनस्टीक भाडे असेल तर दोन थेंबही तेल चालते, बिडाच्या भांड्याला थोडे जास्त तेल लागते) 1-1 चमचा आप्पेपात्राच्या वाट्यात मिश्रण टाकून 4-5 मिनिट्स मध्यम आचेवर शिजू द्या
  • काट्याच्या मदतीने परतून घ्या आणि खरपूस भाजा. डोसा बॅटरचे आप्पे तयार

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
12 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT