ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अर्जून कपूरने शेअर केला मंगळसूत्राचा फोटो, मलायकासाठी केलं का खरेदी

अर्जून कपूरने शेअर केला मंगळसूत्राचा फोटो, मलायकासाठी केलं का खरेदी

अभिनेता अर्जून कपूर आणि मलायका अरोरा याचं प्रेम प्रकरण बी टाऊन साठी नवीन नाही. अर्जून आणि मलायका खुलेआम त्यांच्या प्रेमाची कबूली देत आहेत. बऱ्याचदा ती दोघं एकत्र वेकेशनवर जातात, डिनर डेटवर जातात. मलायका 47 वर्षांची असून ती तिच्यापेक्षा जवळजवळ 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. त्यांच्याकडे  पाहून प्रेमाला वयाचं बंधन याची खात्री पटते. त्याचं एकमेकांवरील प्रेम पाहून आता तर चाहत्यांनाही या दोघांच्या लग्नाची घाई झालेली आहे. त्यातच अर्जुन ने नुकताच मंगळसूत्र हातात घेतलेला फोटा शेअर केला आहे. ज्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. 

अर्जून आणि मलायकाचं ठरलं का लग्न

अर्जूनने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात चक्क मंगळसूत्र दिसत आहे. या फोटोमध्ये अर्जून या मंगळसूत्राकडे खूप प्रेमाने पाहताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना अर्जून मलायकासोबत लग्नाची खरेदी करत आहे असं वाटू शकतं. मात्र तसं नाही आहे कारण त्याने या फोटोसोबत एक महत्त्वाचा मेसेज शेअर केला आहे. अर्जूनचा हा फोटो त्याच्या ‘की अॅंड का’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याने तो शेअर केला आहे. या फोटोत त्याने त्याची सहकलाकार करिना कपूरलादेखील टॅग केलं आहे.

या फोटोसोबत अर्जूनचं काय आहे ‘पर्सनल कनेक्शन’

अर्जूनसाठी हा फोटो खूप खास आहे. कारण त्याने या फोटोसोबत एक भावनिक मेसेजदेखील शेअर केला आहे. त्याने शेअर केलं आहे की, ” हा की अॅंड काच्या आठवणींचा एक छोटासा हिस्सा आहे. मी या चित्रपटातील सेटला  आणि ऑनस्क्रिन कीला खूपच मिस करत आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खास होता कारण तो मी माझ्या आईसाठी निवडला होता. बेबो आणि बाल्की सरांसोबत काम केल्यानंतर माझ्यासाठी ही गोष्ट आणखीनच खाजगी झाली आहे… मला वाटतं या चित्रपटाचा सीक्वल येण्याची गरज आहे ” पुढे करिनाला टॅग करून तुला काय वाटतं असंही त्याने तिला विचारलं आहे. 

‘की अॅंड का’ला झाली पाच वर्षे पूर्ण

करिना कपूर आणि अर्जून कपूरच्या ‘की अॅंड का’ने बॉक्सऑफिवर खूप धमाल केली होती. या चित्रपटाची कमाईदेखील चांगली झाली होती. अर्जून आणि करिनाची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली. ज्यामुळे या चित्रपटाचा सीक्वल पाहण्यास चाहतेदेखील नक्कीच उत्सुक असतील. अर्जून कपूर सध्या रकुल परीतसोबत सरदार का ग्रॅंडसन या डिजिटल चित्रपटात झळकणार आहे. यासोबतच त्याच्या  भूतपोलिस या चित्रपटाकडूनही चाहत्यांना आशा आहेत. या वर्षी अर्जून एक व्हिलेन रिर्टन नावाच्या चित्रपटातूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अर्जूनने शेअर केलेला हा फोटो जरी ‘की अॅंड का’च्या आठवणीचा असला तरी यातून त्याने त्याच्या लग्नाचे संकेत चाहत्यांना देण्यास नक्कीच सुरूवात केलेली आहे. त्यामुळे या वर्षी नवीन चित्रपटाच्या लिस्टसोबत अर्जूनच्या लग्नाची चर्चादेखील नक्कीच रंगणार यात शंका नाही

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात

अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’चं आग्रामध्ये शूटिंग झालं पूर्ण, शेअर केले मजेशीर किस्से

ADVERTISEMENT

कियारा आडवाणीने का नाकारला मुराद खेतानी चा ‘अपूर्वा’

01 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT