अर्जुन रामपाल तो स्टार आहे ज्याने त्याच्या करिअरला मॉडेलच्या रूपात फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरूवात केली आणि मग चित्रपटांमध्ये एंट्री केली. पण बॉलीवूडमध्ये त्याला सुरूवातीलाच यश मिळालं नाही. अर्जुनला त्याच्या चित्रपटांसाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. मग मात्र त्याने स्वःताचं स्थान बनवलं.
भूमिकांपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत
26 नोव्हेंबर, 1972 ला वाढदिवस असलेला अर्जुन रामपाल हा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतो. मग तो त्याच्या घटस्फोट असो वा ग्रॅबिएलासोबतचं अफेअर असो वा ग्रॅबिएलाशी लग्ना होण्याआधीच झालेला मुलगा असो. नजर टाकूया त्याच्या सतत चर्चेत असलेल्या आयुष्यामधील काही गोष्टींवर…
21 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट
अर्जुनने 1998 साली मिस इंडिया आणि सुपर मॉडल मेहर जेसियाशी लग्न केलं. असं म्हटलं जातं की, जेव्हा त्या काळी अर्जुन रामपाल एक स्ट्रगलर होता तेव्हा मेहर जेसिया एक सुपर मॉडेल होती. अर्जुनने त्या काळी तिचे पोस्टर्स स्वतःच्या खोली लावले होते व म्हणायचा की, बायको असावी तर अशी. अर्जुनचं हे म्हणणं खरं ठरलं. जिचे पोस्टर्स खोलीत लावले होते. त्याच मॉडेल म्हणजे मेहर जेसियाशी अर्जुनचं लग्न झालं. दोघांचंही मॅरीड लाईफ तब्बल 21 व्यवस्थित चाललं. पण नशीबाच्या मनात दुसरंच काहीतरी होतं.
21 च्या वैवाहिक जीवनानंतर आता अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया ऑफिशियली वेगळे झाले आहेत. त्यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनीही परस्पर समंतीने फॅमिली कोर्टमध्ये स्पेशल मॅरेज एक्टनुसार घटस्फोट घेतला. या दोघांनी म्हणजेच अर्जुन आणि मेहरने 30 एप्रिल 2019 ला घटस्फोटाचा अर्ज केला आणि 6 महिन्यानंतर त्यांना घटस्फोट मिळाला. अर्जुनच्या दोन्ही मुली आता त्यांची आई मेहरसोबत राहतात.
अर्जुन आणि मेहरमधील वादाच्या बातम्या 2011 पासून येत होत्या. 2018 मध्ये त्यांनी वेगळं होणार असल्याची घोषणा केली होती. ज्यानंतर अर्जुन भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेला होता. या रिलेशनशिपनंतर अर्जुन त्याच्या पर्सनल लाईफ अजून एक पाऊल पुढे गेला. अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लग्न होणार असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. पण दोघांच्या लग्नाबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती मात्र समोर आली नाही.
गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत चांगलं बाँडीग
अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या लव्ह स्टोरीबाबत बोलायचं झाल्यास त्या दोघांची भेट 2009 मध्ये आईपीएलच्या आफ्टर पार्टीमध्ये झाली होती. काही वर्षानंतर या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. ही जोडी चर्चेत आली ती ग्रॅबिएलाच्या लग्नाआधीचं प्रेग्नंट राहिल्याने. काही दिवसांपूर्वीच अर्जुनच्या गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने त्यांच्या मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव अरिक असं ठेवण्यात आलं आहे. पण या दोघांचं अजूनही लग्न मात्र झालेलं नाही. अर्जुन त्याच्या मुलासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतो.
अर्जुनचं बॉलीवूड करिअर
बॉलिवूडमध्ये अर्जुनला पहिले दोन-तीन चित्रपट तर मिळाले पण ते बॉक्सऑफिसवर चालले नाहीत. अर्जुनने त्याच्या फिल्मी करियरला 2001 साली सुरूवात केली. त्याचा पहिलाच चित्रपट मल्टीस्टारर प्यार इश्क और मोहब्बत हा होता. यानंतर अर्जुनचा दिवानापन चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला पण तो बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर ऐश्वर्या रायसोबत आलेला दिल का रिश्ता ही अपयशी ठरला. मग मात्र नकारात्मक भूमिकेत ‘ओम शांती ओम’मध्ये झळकलेल्या अर्जुनला प्रेक्षकांचा कौल मिळाला. मुख्य भूमिकांमध्ये अपयश मिळाल्यावर त्याने सपोर्टिंग भूमिका करायला सुरूवात केली. ज्यामध्ये त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मग तो डॉन असो वा रॉक ऑन चित्रपट.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.