ADVERTISEMENT
home / बिग बॉस
#BBM2 कंटेस्टंट आरोह वेलणकरची सामाजिक बांधिलकी

#BBM2 कंटेस्टंट आरोह वेलणकरची सामाजिक बांधिलकी

#BBM2 च्या दुसऱ्या पर्वातील फायनलिस्ट रेगे फेम अभिनेता आरोह वेलणकरने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी असलेल्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी त्याने 1 लाख रूपयांचा मदतनिधी दिला. मुख्यमत्र्यांच्या कार्यालयातर्फे आरोहच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत ट्विटही करण्यात आले आहे.

‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने याबाबत सांगितले की, “माझा सामाजिक कार्य करण्याकडे पूर्वीपासूनच कल असल्याने मी अशी मदत ऐरवीही करतच असतो. पण त्याविषयी बोलायला मला जास्त आवडत नाही. यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेच याविषयी ट्विट केलं आहे.”

त्याने पुढे सांगितलं की, “जेव्हा मी #biggboss च्या घरात होतो. तेव्हा महाराष्ट्रावर एवढे मोठं संकंट कोसळलं होतं. बाहेर आल्यावर मला या गोष्टीची जाणीव झाली. अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना आर्थिक बळाची आवश्यकता असते. आपणही त्यात खारीचा का होईना वाटा उचलावा, अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मदतनिधी दिला.

आरोह वेलणकर अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. ‘आय व्होट’ सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये त्याने या आधी सहभाग घेतला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो. आरोहने केलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ADVERTISEMENT

आरोहची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डने एंट्री झाली होती. तो काहीसा उशिरा या घरात आल्याने तो बिग बॉसच्या घरात कितपत टिकणार अशी शंका होती. पण आरोहन थोड्याच काळात प्रेक्षकांचं मन जिकंल आणि बिग बॉस मराठी सिझन 2 च्या फिनालेपर्यंत धडक मारली. आरोहने येथे चांगले मित्रमैत्रिणीही मिळवले आणि विविध टास्कमध्येही चांगली कामगिरी केली. आता आरोहच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल. अशी आशा करूया की, आरोहला आपल्याला लवकरच मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर पाहायला मिळेल. 

हेही वाचा –

#BBM2 ही दोस्ती तुटायची नाय….

#BBM2 : आरोह वेलणकरला फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

ADVERTISEMENT

#BBM2 मधून इलिमिनेट होऊनही माधवच ठरला ‘विजेता’

 

13 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT