ADVERTISEMENT
home / मनोरंजन
40 वर्षांनंतर परतणार ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीत

40 वर्षांनंतर परतणार ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीत

सिने आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या सिनेमाव्दारे मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहे. पद्मश्री अरूंधती नाग यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी ‘22 जून 1897’ या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत, ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमातून त्या मराठीत परत दिसणार आहेत. ही निश्चितच त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे.

अरूंधती नाग यांच्या भूमिकेविषयी सांगताना दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “चित्रपटाचे कथानक आकारत असताना, ‘लक्ष्मी टिपणीस’ या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुध्दिमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची उब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एन्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती यांनाही भूमिका ऑफर केली.” 

मोहित पुढे म्हणाले की, “मी अरूंधती नाग यांना गेली 15-20 वर्ष ओळखतो. त्या जेवढ्या बहुआयामी आणि प्रतिभावान कलाकार आहेत, तेवढ्याच नम्रही आहेत. आपल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा कलाकृतीत समरसून व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्या जरी मराठीत 40 वर्षांनी परतत असल्या तरीही, त्यांचे मराठीवर प्रभूत्व आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमाच्या भाषेवर त्यांचे प्रेम आहे.”

ADVERTISEMENT

मराठीतल्या आपल्या पुनरागमनाबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अरूंधती नागही खूप उत्सुक आहेत. त्या मराठी सिनेसृष्टीत परण्याविषयी म्हणाल्या की, “40 वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगलोरला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे.”

अरूंधती नाग यांना मोहितच्या कलाकृती आवडतात. त्यामुळे त्यांनाही मोहितच्या या सिनेमाचा भाग होणं आवडलं. मोहितसोबतच ललित प्रभाकरचीही त्यांनी प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की, “ चित्रपटाचं कथानक आणि व्यक्तिरेखेविषयीची माहिती मला पाठवण्यात आली होती. पण सेटवर पोहोचल्यावर ती भूमिका जिवंत करताना खरी गंमत आली. ललित प्रभाकरसोबत संहितेचे वाचन केलं. ललित त्याच्या भूमिकेत चांगलाच उतरला होता. एका प्रतिभावान दिग्दर्शकासोबत काम करायला आणि एक अद्भूत सशक्त महिलेला साकारायला मिळाल्यावर अभिनेत्री म्हणून काही विशेष अवघड करावं लागलं नाही.”

अरूंधती नाग यांच्या दर्जेदार अभिनयाची प्रशंसा करताना मोहित टाकळकर सांगतात की, “ त्या जरी ज्येष्ठ अभिनेत्री असल्या तरीही आपल्या प्रगाढ अनुभवाचं ओझं घेऊन त्या सेटवर येत नाहीत. त्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाचा आदर करतात आणि मग त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिरेखेवर काम करतात.”

ADVERTISEMENT

अरूंधती नाग यांच्यासोबतचा अनुभव सांगताना निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “अरूंधती नाग यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळणं, हा आमचा गौरवच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेली विनम्रता आणि आपुलकी यामुळे त्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तिला पटकन आपलंस करून घेतात. त्यामुळेच तर त्या एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्री असूनही त्यांच्याशी पटकन ऋणानुबंध जुळून आला. अरूंधतीजी एवढ्या नैसर्गिक अभिनत्री आहेत की, त्या प्रत्येक शॉटमध्ये परफॉर्म करताना तुम्ही त्यांच्या अभिनयाने मोहित होऊन जाता.”

लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील. हा सिनेमा 5 जून 2020 ला रिलीज होणार आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

ADVERTISEMENT
12 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT