येत्या आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या निमित्ताने बरेच जण उपवास करतील. मनोभावे देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचं महत्त्व फार असल्याने याचं व्रत आवर्जून केलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आवर्जून देतो. पण या सगळ्यांमध्ये काही गोष्टींची काळजी घेणं ही महत्त्वाचं आहे. या महत्वपूर्ण गोष्टी तुमच्या व्रताशी निगडीत आहेत. ज्या खालील लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दिवसापासून सर्व मंगल कार्य होणं थांबतात. कारण पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत शयन अवस्थेत असतात. या सोबतच कार्तिकी एकादशी माहिती आणि कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा यांनाही फार महत्त्व आहे.
जाणून घ्या काय करावं देवशयनी एकादशीला
– देवशयनी एकादशीला तुळशीच्या पानांनी भगवान विष्णूंची पूजा करावी. पण देवशयनी एकादशीला तुळशीची पान तोडू नये. दशमी तिथीच्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवावी.
– देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू दक्षिणावृत्ती शंखाने स्नान करावे.
– देवशयनी एकादशीला पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य भगवान विष्णूंना नक्की दाखवावा. कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग फार प्रिय आहे.
– देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करा. असं केल्याने तुम्हाला सदैव धनलाभ होतो, असं म्हटलं जातं.
– देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळेही सर्व इच्छा पूर्ण होतात, असं म्हणतात.
– देवशयनी एकादशीला पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करावी. याशिवाय देवशयनी एकादशीची पूजा पूर्ण होत नाही.
– आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या एक दिवस आधी ब्रम्हचर्य पालन नक्की करावे.
– या दिवशी अन्नदान करणं खूप शुभ मानलं जातं. अन्नदान केल्याने तुमच्या घरी कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही, असं म्हणतात.
– देवशयनी एकादशीला रात्री जागरण करावे आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा.
जाणून देवशयनी एकादशीला काय करू नये
– देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला आपण हमखास उपवास करतोच. जर तुम्हीही हा उपवास केला असेल तर या दिवशी अजिबात चिडचीड करू नका.
– क्रोध टाळण्यासाठी शांत चित्ताने भगवान विष्णूची पूजा अर्चना करा.
– देवशयनी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीला मीठाचा वापर करू नका. जर तुम्ही असं केल्यास देवशयनी एकादशीच्या व्रताचा पूर्ण लाभ होत नाही, असं म्हणतात.
– देवशयनी एकादशीच्या पूजेला काळ्या किंवा निळ्या वस्त्रांचा वापर बिलकुल करू नये.
– या एकादशीला घरामध्ये कोणत्याही अपशब्दाचा वापर करू नये. यामुळे तुम्हाला आषाढीच्या व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही.
– देवशयनी एकादशीला पलंगावर झोपू नये. या दिवशी जमीनीवरच झोपावं. यामुळे तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळत.
– आषाढी एकादशी हा दिवस पवित्र मानला जातो. त्यामुळे या दिवशी खोटं बोलणं टाळा. खोटं बोलल्याने तुम्हाला एकादशीच्या उपवासाचं फळ मिळणार नाही.
मग तुम्हीही यंदा देवशयनी एकादशीला वर सांगितलेल्या गोष्टीचं पालन नक्की करा आणि आपल्या व्रताचं पूर्ण फळ नक्की मिळवा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.