ADVERTISEMENT
home / आरोग्य
asthma-risk-higher-for-diabetics-doctor-warns-in-marathi

मधुमेहींना दम्याचा धोका अधिक : डॉक्टरांनी दिला इशारा

मधुमेह (Diabetes) असलेल्या बहुसंख्य लोकांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होऊ शकते ज्यामुळे दीर्घकालीन फुफ्फुसाचे कार्य मंदावते. मधुमेह आणि दमा असल्‍याने एखाद्याच्‍या जीवनाची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यासाठी त्वरीत उपचार घेणे आणि जीवनशैलीतील काही बदल जसे की संतुलित आहाराच् सेवन, दररोज व्यायाम करणे, इष्टतम वजन राखणे आणि शिफारस केलेल्या मर्यादेत रक्तातील साखरेची पातळी राखणे तसेच  तणावमुक्त राहणे आवश्यक आहे. भारत देश हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो. मधुमेहाचा परिणाम केवळ तुमच्या हृदयावर, मूत्रपिंडांवर आणि मज्जातंतूंवर होत नाही तर तुमच्या फुफ्फुसावर आणि श्वासोच्छवासाच्या पद्धतींवरही विपरीत परिणाम होतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता मंदावते. त्यामुळे सीओपीडी (COPD) (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज), न्यूमोनिया आणि क्षयरोग यासारख्या समस्या उद्भवू शकतात फुफ्फुसाची आणखी एक सामान्य स्थिती जी मधुमेहामुळे दिसून येते ती म्हणजे दमा.

तज्ज्ञांकडून अधिक माहिती 

डॉ स्वप्नील कुलकर्णी, चेस्ट फिजिशियन, लोकमान्य हॉस्पिटल सांगतात की, टाईप 1 किंवा टाईप 2 मधुमेह असल्‍याने दमा असण्‍याची शक्यता नक्कीच वाढू शकते. कारण मधुमेहामुळे संपूर्ण शरीरात जळजळ होते. मधुमेह असणे म्हणजे सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन सारख्या दाहक संयुगेचे प्रमाण जास्त असते. विविध अभ्यासकांनी पुष्टी केली आहे की मधुमेह एखाद्याच्या फुफ्फुसाचे कार्य कमी करू शकते ज्यामुळे रुग्णाला नंतरच्या आयुष्यात दम्याचा धोका आढळून येऊ शकतो. रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीमुळे फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम होतो. शिवाय, लठ्ठ लोकांना अनेकदा मधुमेह असतो आणि त्यांना दम्याचाही त्रास होऊ शकतो. जे लोक मधुमेह आणि दमा व्यवस्थापनात अयशस्वी ठरतात अशा रुग्णांवर आपत्कालीन परिसथिती उद्भवू शकते. अनेकदा अशा परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते.

भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक

“भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहींना दमा होण्याचा धोका जास्त असतो. मधुमेह हा आजार फुफ्फुसाच्या कार्यावर दुष्परिणाम करतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता न आल्याने रुग्णाला अस्थमा होण्याची शक्यता असते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य मर्यादेत न ठेवता त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे दम्याचा त्रास कमी होण्यास आणि या दोन्ही परिस्थितींमुळे ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये दम्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. ज्यांना मधुमेह आहे त्यांना त्यांची फुफ्फुसे किती व्यवस्थित काम करत आहेत यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFTs) घेणे आवश्यक आहे. या चाचण्यांमुळे फुफ्फुसाचा आजार ओळखण्यात मदत होऊ शकते आणि त्यानंतर तज्ञ तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवू शकतात,” डॉ. प्रेरणा अग्रवाल, व्यवस्थापक तांत्रिक ऑपरेशन, अपोलो डायग्नोस्टिक्स पुणे यांनी आम्हाला सांगितले. 

जर तुम्हाला एकाच वेळी मधुमेह आणि दमा असेल तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या पोषक घटकांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा लागेल, जंक फुड, प्रक्रिया केलेले, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ टाळावे ज्यामुळे रक्तातील साखरेची असामान्य पातळी वाढू शकते आणि तुमचा दमा वाढू शकतो. तणावामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि दमा होऊ शकतो, म्हणून योग किंवा ध्यान करून आणि दररोज व्यायाम करून करण्याचा सल्ला डॉक्टर कुलकर्णी यांनी दिला.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT