प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपासून अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की आथिया लवकरच क्रिकेटर के एल राहुलसोबत लग्न करणार आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाच्या बातम्या अशाप्रकारे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आथिया किंवा राहुल या दोघांनीही याविषयी अधिकृत किंवा जाहीरपणे कोणतीही माहिती दिली नाही.आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज के एल राहुल यांच्या नात्याची चर्चा जोरात सुरू आहे. हे कपल जवळपास तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. याआधी अशी अटकळ होती की दोघे 3 महिन्यांत लग्न करू शकतात.हे कळल्यानंतर चाहते कमालीचे उत्साहित झाले आहेत. पण आथिया शेट्टी आणि केएल राहुल खरंच लवकरच लग्न करणार का यावर खुद्द आथिया शेट्टीने आता इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे.
आथियाने केली सोशल मीडियावर पोस्ट
आथिया शेट्टीने अलीकडेच तिच्या लग्नाच्या बातम्यांसंबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, के एल राहुल आणि आथिया लग्नाच्या तयारीत आहेत अशी सगळीकडेच चर्चा होती. पण आता या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करत आथिया शेट्टीने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. स्टोरी शेअर करताना तिने लिहिले की, “मला आशा आहे की येत्या 3 महिन्यांत जे लग्न होणार आहे मलाही त्या लग्नासाठी आमंत्रित केले जाईल.” त्याचवेळी आथिया शेट्टीचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनीही लग्नाच्या या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. लग्नाच्या तयारीबद्दल विचारले असता सुनील शेट्टीने सांगितले की “नाही, अद्याप काहीही नियोजन केलेले नाही.” मे महिन्याच्या सुरुवातीला आथियाचा भाऊ अभिनेता अहान शेट्टी यानेही लग्नाच्या अफवांबद्दल प्रतिक्रिया दिली होती. एका वेबसाईटशी बोलताना तो म्हणाला होता की, “लग्नाविषयी अजून तरी असे काहीही ठरले नाही. असा कोणताही समारंभ नाही, या सर्व अफवा आहेत. लग्न ठरलंच नसताना आम्ही तुम्हाला तारीख कशी सांगणार?”
गेल्या वर्षी आथिया व राहुल यांनी नात्याची अधिकृतरीत्या माहिती दिली होती
गेल्या वर्षी आथिया आणि राहुलने त्यांचे नाते अधिकृत केले होते. राहुलने आथियाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सोशल मीडियावर एक खास छायाचित्र पोस्ट केले होते. राहुलचा आथियाच्या कुटुंबीयांशीही जवळचे नाते आहे. तसेच हे दोघेही आथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या ‘तडप’ या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावण्यासाठी एकत्र आले होते. या दोघांनीही आपलं प्रेम सार्वजनिक ठिकाणी दाखवायला कधीच मागेपुढे पाहिले नाही.
लग्नाविषयी लावले जात होते तर्कवितर्क
मागील अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की अथिया शेट्टी आणि केएल राहुल 3 महिन्यांत लग्न करू शकतात. हे लग्न मुंबईतच होणार आहे. या जोडप्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारीही सुरू केली आहे. त्याचबरोबर अशा बातम्याही समोर येत होत्या की, दोघांनी मुंबईत घर घेतले आहे, जिथे ते लग्नानंतर राहणार आहेत. सध्या या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्याचवेळी, आथिया स्वतः लग्नाच्या तयारी ठरत असल्याचे बोलले जात होते. पण आथियाने नुकतीच केलेली पोस्ट पाहता, केएल राहुलसोबत 3 महिन्यांत लग्न होणे ही निव्वळ अफवा आहे.काही दिवसांपूर्वी के एल राहुल त्याच्या स्पोर्ट्स हर्नियावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जर्मनीहून देशात परतला होता. त्यावेळी राहुल आणि आथिया मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता.
आथिया शेट्टीने 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘मुबारकान’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांतही काम केले आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक