ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
आथिया शेट्टी आणि केएल राहुल घालवत आहेत इंग्लंडमध्ये एकत्र वेळ

आथिया शेट्टी आणि केएल राहुल घालवत आहेत इंग्लंडमध्ये एकत्र वेळ

आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) या दोघांनाही कधीच आपलं स्वीकारलं नाही आणि नाकारलंही नाही. दोघेही नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. एकमेकांना नेहमीच कमेंट्सही देत असतात. पण आता दोघेही इंग्लंडमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. कारण दोघांनीही एकाच वेळी आपल्या कॉमन मैत्रिणीसह फोटो पोस्ट केले आहेत. आथिया आणि राहुल एकत्र फोटोमध्ये नसले तरीही ठिकाण एकच दिसत असल्याने आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आथिया आणि राहुल दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्यांच्या नात्याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झालेली पाहायला मिळाली आहे. इतकंच नाही तर केएल राहुलच्या फोटोवर बऱ्याचदा सुनील शेट्टी आणि आहान शेट्टीच्याही कमेंट्स पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत असा अंदाज नेहमीच बांधला जातो. आता पुन्हा व्हायरल झालेल्या फोटोमुळे दोघेही इंग्लंडमध्ये एकत्र असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 

बाई, बुब्स आणि ब्रा वर झाली हेमांगी कवी व्यक्त, ‘लोक काय म्हणतील’चं ओझं किती वहायचं

राहुल सध्या इंग्लंडमध्ये

राहुल सध्या इंग्लंडमध्ये

Instagram

ADVERTISEMENT

राहुल सध्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडमध्ये होता. तर आथियादेखील तिचा भाऊ आहान शेट्टी (Aahan Shetty) सह इंग्लंडमध्येच आहे. दोघांनीही आपल्या एका कॉमन मैत्रिणीसह फोटो शेअर केल्याामुळे हे दोघेही एकत्र वेळ घालवत असल्याचा अंदाज आता बांधला जात आहे. या दोघांची जोडी अनेकांना आवडते. त्यामुळे लवकरच या दोघांनीही लग्न करावे असंही म्हटलं जात आहे. आथियाने दोन ते तीन वर्षांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र तिला हवं तसं यश मिळालेले नाही. पण तिच्या फॅशनबाबत मात्र नेहमीच चर्चा होते. तसंच आथियाचे फिटनेसही कमालीचे आहे. आथिया नेहमीच आपल्या फॅशन आणि फिटनेसचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते आणि तिच्या फॅशनचे कमालीचे चाहते आहेत. तिला अनेक फॉलोअर्सही आहेत. दरम्यान तिचे नाव गेले अनेक वर्ष केएल राहुलसोबत जोडले जात आहे. त्यामुळे आता ही जोडी कधी लग्नबंधनात बांधली जाणार आहे याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

रणबीर कपूर आलियाला सोडून देईल.. केआरकेच्या भविष्यवाणीवर संतापले प्रेक्षक

सोनाली फॅबियानीसह घेतला दोघांनीही फोटो

सोनाली फॅबियानीसह घेतला दोघांनीही फोटो

Instagram

ADVERTISEMENT

आथिया आणि राहुलने एकाच वेळी आपली मैत्रीण सोनाली फॅबियानीसह फोटो शेअर केला आणि पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तर काही दिवसांपूर्वीच दोघांनीही एका ब्रँडसाठीही शूट केले होते. त्यामुळे हे दोघे नात्यात असून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. दोघांनाही कधीच ही गोष्ट स्वीकारली नाही अथवा नाकारलीदेखील नाही. तसंच कधीही एकमेकांबाबत कुठेही काहीही चर्चा केलेली नाही. पण सतत एकमेकांना कमेंट्स देणे आणि एकमेकांबरोबर फोटो पोस्ट करत असल्याामुळे त्यांच्या चाहत्यांना हे दोघेही नात्यात असल्याबाबत पूर्ण विश्वास आहे. दरम्यान केएल राहुल नुकताच एका ऑपरेशनमधून बरा झाला आहे. तर आथिया सध्या कोणत्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे याची मात्र तिच्या चाहत्यांनादेखील माहिती नाही. मात्र अनेक ब्रँड्ससाठी आथिया काम करताना दिसून येते आणि त्याशिवाय आपल्या सोशल मीडियावरही ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. 

शाहिदमुळे बदललं करिअर आणि सैफमुळे बदललं आयुष्य, करिना कपूरचा खुलासा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT