अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या उलट सुलट वागण्यावरुन चर्चेत असते. कोणत्याही नव्या मुद्द्यावरुन देशात सनसनी न्यूज तयार करावी तर ती कंगनासारखी. अगदी राजकारणपासून समाजकारणापर्यंत सगळ्या विषयांमध्ये ती आपली मतं नोंदवते. त्यामुळे साहजिकच वाद निर्माण होतात. पण इतरांसाठी अडचणी तयार करणारी कंगनाच अडचणीत आल्याची माहिती आता समोर येत आहे. कंगना रणौत चोर आहे असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. कंगनावर हा गंभीर आरोप एका लेखकाने लावला असून नेमक्या कोणत्या कारणासाठी कंगनावर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे हे जाणून घेऊया.
वरूण धवनच्या लग्नाची लगबग सुरू, या ठिकाणी रंगणार लग्नसोहळा
चित्रपटाच्या घोषणनेंतर लावला आरोप
कंगना रणौतने लीड भूमिका साकारलेला तिचाच चित्रपट ‘मणिकर्णिका’ झाशीच्या राणीच्या शौर्यावर आधारीत होता. या चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका अर्थात लक्ष्मीबाईंची भूमिका ही कंगना रणौतने साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळ हा चित्रपट चांगला चालला. आता एका नव्या वॉरिअरला घेऊन तिने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यासाठीच कंगना रणौतने पुन्हा एकदा ‘मणिकर्णिका : द रिटर्न्स ऑफ दिद्दा’ अशा पुढच्या भागाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाची घोषणा करताच लेखक आशिष कौल यांनी मुलाखत देत ही स्क्रिप्ट कंगनाने चोरी केल्याचा आरोप केला आहे. लेखक आशिष कौल यांचे हे लिखाण असून आशीषच्या परवानगीशिवाय तिने हे पाऊल उचलल्याचे आशिष यांनी म्हटले आहे.
आशिष कौल यांनी केला दावा
कंगना ही हक्कासाठी लढते आणि त्याविरोधात आवाज उठवते ही चांगली गोष्ट आहे. पण माझ्यासोबत तिने अन्याय केला आहे. आशिष असे म्हणत आहे या मागेही एक कारण आहे. कारण आशिषने लॉकडाऊन दरम्यान एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे नाव आहे ‘दिद्दा:द वॉरिअर क्वीन ऑफ काश्मीर’ असे आहे. या पुस्कात पुंछची राजकुमारी अर्थात दिद्दा हिच्या पराक्रमाच्या गाथा लिहिण्यात आल्या आहेत. हे पुस्तक या चित्रपटाची घोषणा होण्याआधीच प्रकाशित करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान आशिष यांनी हे पुस्तक लिहिले आहे.हे पुस्तक मूळ इंग्रजीमध्ये असून त्याचे हिंदी अनुकरण केलेली एक कॉपी आशिष कौल यांनी कंगनाला तिच्या मेलमध्ये पाठवली होती. आशिषच्या म्हणण्यानुसार कंगनाने त्यावेळी त्या मेलला कोणताही रिप्लाय दिला नाही. पण तिने अचानक माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय चित्रपटाची घोषणा केल्यामुळे मला धक्का बसला आहे. कंगनाने चित्रपटासाठी माझ्या पुस्तकाचा मला न विचारता उपयोग करणे हे चोरी करण्यासारखेच आहे.
अनुप जलोटांनी धारण केला सत्य साईबाबाचा लुक, दिसणार बायोपिकमध्ये
कंगनाकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
आशिष यांना या पुस्तकाच्या गोष्टीतून एक चित्रपट नक्कीच करता येईल अशी अपेक्षा होती. या हेतूनेच त्यांनी कंगनाला हे पुस्तक मेलमधून पाठवले होते. पण यासोबतच त्यांनी रिलायन्ससोबत या चित्रपटासाठी चर्चा केली होती. रिलायन्स हा चित्रपट करण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील आशिषने सांगितले. रिलायन्ससोबत मीटिंगही झाल्या असताना आणि कंगनाने कोणताही रिप्लाय दिलेला नसताना तिने अचानक या पुस्तकाचा वापर करुन चित्रपटाची घोषणा करणे चुकीचे आहे. असे आशिष यांनी सांगितले आहे.
सध्या तरी कंगनाकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण अशा पद्धतीने वाड्.मय चौर्य करणे हे मुळीच चांगले नाही. आता याचा फटक कंगनाला बसणार की नाही, हा चित्रपट ती करेल की नाही हे लवकरच कळेल.
#BiggBoss14: सोनाली फोगाट खरंच अलीच्या प्रेमात की नाटक, सोशल मीडियावर ट्रोल