ADVERTISEMENT
home / Natural Care
ताणतणाव झटपट दूर करतील या पाच आयुर्वेदिक ब्युटी ट्रिटमेंट

ताणतणाव झटपट दूर करतील या पाच आयुर्वेदिक ब्युटी ट्रिटमेंट

आयुर्वेद हा शब्द संस्कृत असून याचा मुळ अर्थ दैनंदिन जीवनशैली असा होतो.  सध्याच्या तणावात्मक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत तग धरून राहण्याच्या  आयुर्वेद शास्त्राचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.  कारण हे उपचार प्राचीन काळापासून केले जात आहेत आणि त्याचे परिणाम माणसाच्या जीवनशैलीवर नेहमीच सकारात्मक झालेले आहेत. आयुर्वेद म्हणजे फक्त आहार आणि औषधे नसुन या शास्त्राप्रमाणे आचरण केल्यास तुमच्या  शरीरासोबतच सौंदर्यामध्ये भर पडू शकते. यासाठीच जेव्हा तुम्ही खूप ताणात असाल अथवा तुम्हाला थकवा आला असेल तेव्हा हे ब्युटी ट्रिटमेंट ट्राय करा.

अभ्यंगस्नान करा –

आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला खूप महत्त्व आहे. यासाठी दिवाळीत अभ्यंगस्नान केले जाते. अभ्यंगस्नान म्हणजे एखाद्या आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या सुंगधित तेलाने सर्वांगाला मालिश करून मग स्नान करणे.  तुम्ही सकाळी उठल्यावर अथवा रात्री झोपण्यापूर्वी अशा प्रकारे अभ्यंगस्नान करून स्वतःच्या शरीर आणि सौंदर्याची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त दहा मिनिटे लागतील. पण त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारेल आणि पचनसंस्था सुरळीत होईल. ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी असे अभ्यंगस्नान अधुनमधुन करण्यास नक्कीच हरकत नाही. 

हेअर आणि हेड मसाज –

हेअर रूटिन नियमित फॉलो केल्यामुळेदेखील तुमचे डोके शांत आणि निवांत होऊ शकते. कोमट तेलाने केसांना केलेला मसाज अथवा एखाद्या घरगुती वस्तूंचा वापर करून घरच्या घरी हेअर स्पा केल्याने तुमचे केस तर मजबूत राहतीलच पण यासाठी डोक्याला मसाज केल्याने तुमच्या नसा रिलॅक्स होतील. तुम्ही यासाठी कोणतेही हेअर ऑईल. दही, कोरफड अशा घरातील वस्तू वापरू शकता. दहा मिनिटांच्या या मसाजमुळे तुम्हाला लगेच फ्रेश वाटू लागेल.

कडूलिंबाचा फेसपॅक लावणे –

बऱ्याचदा चेहऱ्यावर तणावामुळे पिंपल्स निर्माण होतात. ताणतणावाचा तुमच्या चेहऱ्यावर लगेच परिणाम दिसून येतो. यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करणं, आहाराबाबत दक्ष असणं आणि भरपूर पाणी पिणं या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही यावर उपाय करण्यासाठी कडूलिंबाचा फेसपॅकदेखील वापरू शकता. यासाठी घरच्या घरी काही कडूलिंबाची पाने वाटून घ्या आणि तुमच्या पिंपल्सवर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा निर्जंतूक होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

ADVERTISEMENT

Shutterstock

तूपाने त्वचेला मालिश करणे –

आयुर्वेदात तुपाला खूप महत्त्व आहे. आहारात योग्य प्रमाणात नियमित तुपाचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेची आणि शरीराची काळजी  घेऊ शकता. कारण तूप हे शरीरासाठी वंगणाप्रमाणे काम करतं. त्यामुळे आहारातून तूप पुर्णपणे वगळणं चुकीचं आहे. ऐवढंच नाही दिवसभरात एकदा थेंबभर तुपाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेच्या समस्या कमी होतात. आयुर्वेदानुसार नाकात थोडं शुद्ध तूप सोडल्यास तुम्हाला सर्दीचा त्रास कमी होतो. त्यामुळे जीवनशैलीत तुपाचा वापर फायदेशीर आहे हे विसरू नका.

ADVERTISEMENT

Shutterstock

ब्युटी स्लीप घेणे –

शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी सर्वात महत्त्वाची आहे पुरेशी झोप.आयुर्वेदात असं म्हटलं जातं की, लवकर निजे आणि लवकर उठे त्याला आरोग्य संपदा लाभे. त्ययामुळे जास्तीत जास्त शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमच्या ताणतणावाच्या  समस्या कमी होत्या. शांत झोप येण्यासाठी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा, रात्री झोपताना हळदीचे दूध प्या, झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टीं दूर ठेवा. शांत झोपेमुळे तुमचे सौंदर्यदेखील नक्कीच खुलून येईल. 

शांत झोपेसाठी आणि त्वचेची निगा राखण्यासाठी रात्री झोपताना त्वचेला क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईझ करायला विसरू नका. ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्ही फ्रेश दिसाल. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

नखांचे क्युटिकल काढून घरीच वाढवा नखांचे सौंदर्य

हळदीतील आयुर्वेदिक गुणधर्म सौंदर्य आणि आरोग्यासाठी आहेत फायदेशीर (Benefits Of Haldi In Marathi)

निरोगी जीवनशैलीचे रहस्य दडले आहे आयुर्वेदात

ADVERTISEMENT

Ayurvedic Beauty Tips in Hindi

02 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT