केस कोणत्याही महिलेचा दागिना आहे. जितके सुंदर केस तितकी ती महिला अधिक सुंदर दिसते असे म्हणतात. म्हणूनच की काय पूर्वीच्या काळी मुलींच्या केसांची खूप काळजी घेतली जाई. केसांना आठवड्यातून एकदा तेल लावणे, त्याला वाफ देणे, त्याची स्वच्छता राखणे अशा काही गोष्टी अगदी हमखास केल्या जात असतं. केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल आताच्या काळात असल्या तरी देखील जाड, चमकदार आणि न कळणारे केस हे आजही खूप जणांना आवडतात. केसांची काळजी घेणारे अनेक प्रॉडक्ट बाजारात मिळतात. पण असे असले तरी देखील केसांसाठी आजही आयुर्वेदिक पद्धती (Ayurvedic Hair Care Tips In Marathi) या नेहमीच कामी येतात. केसांची नुसती वरुन नाही तर आतून काळजी घेण्यासाठी आर्युवेदिक घटक हे फारच फायद्याचे ठरतात. केसांसाठी आर्युवेद हे एक वरदान आहे. जर तुम्ही केसांसाठी आयुर्वेदाशी निगडीत काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला सुंदर, जाड आणि चमकदार केस मिळण्यास मदत मिळेल. जाणून घेऊया केसांसाठी आयुर्वेदिक उपाय.
Ayurvedic Hair Care Tips In Marathi | केसांसाठी आयुर्वेदिक उपाय
केसांसाठी आयुर्वेदाचा वापर करताना काही ठराविक घटकांचा तुम्ही नक्कीच वापर करायला हवा. त्यामुळे तुमचे केस सुंदर होण्यास मदत मिळेल. केसांसाठी काही घटक हे कमालीचे काम करतात. या आयुर्वेदिक घटकापासून तुम्ही केसांसाठी आयुर्वेदिक तेल बनवू शकता. असा वापर केल्यामुळे तुमचे केस चांगले होण्यास तुम्हाला मदत मिळेल.
आवळा (Amla)
आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवळा हे फळ फारच फायद्याचे मानले जाते. व्हिटॅमिन C ने युक्त असलेल्या अशा फळामध्ये अनेक असे पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचा, केस चांगले राहण्यास मदत मिळते. केसांच्या वाढीसाठी आवळा हा एक उत्तम घटक आहे. आवळ्याचे सेवन करण्यासोबतच त्याचा बाहेरुन केलेला वापर केसांसाठी फायदेशीर ठरतो. अँटिऑक्सिडंट्समुळे प्रदूषणाचा त्रास केसांना होत नाही आणि केस अधिक मजबूत राहतात. केसांचे पांढरे होणे, केस गळणे, केसांचे कोंड्यापासून संरक्षण करण्यासाठी आवळा हा फारच उपयोगी ठरते. बाजारात आवळा शॅम्पू देखील मिळतात. त्यांचा वापरही खूप जण करतात.
असा करा वापर (How To Use) :
आवळा पावडर आणून तिचा उपयोग केसांसाठी केला जातो.आवळा पावडर भिजवून त्यामध्ये लिंबाचा रस, थोडेसे दही घालून एक दाटसर पॅक तयार करा. तो केसांना लावा. चांला वाळला की, मग तो एखाद्या माईल्ड शॅम्पूने धुवून टाका
जर तुमच्याकडे ताजे आवळे असतील तर तुम्ही त्याचा रस काढा. तो स्प्रे बॉटलमध्ये घालून केसांच्या मुळांना स्प्रे करा. त्यामुळे केसांना वाढ मिळण्यास मदत मिळते.
कडीपत्ता (Curry Leaves)
जेवणाचा स्वाद वाढवणारी कडीपत्त्याची पाने ही जेवणात चुरचुरीतपणा आणतात. फोडणीत टाकल्यानंतर खमंग असा वास येणारी कडीपत्त्याची पाने घरात सगळ्यांकडेच असतात. कडीपत्त्याचा जेवणासोबतच केसांसाठीही फायदा होतो. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमि E असते. जे केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी फारच फायदेशीर ठरते. केसांसाठी कडीपत्ता हे वरदान आहे. त्याचा उपयोग करुन सुंदर आणि जाड केस मिळू शकतात. कडीपत्त्याच्या वापरामुळे केस गळती थांबते, केसांचा रंग टिकून रहतो, कोंडा दूर होण्यास मदत होते. सौंदर्य, आरोग्य आणि केसांसाठी कडीपत्ता फारच फायदेशीर आहे.
असा करा वापर ( How To Use):
कडीपत्त्याची मूठभर पाने घेऊन ती नारळाच्या तेलात घाला. नारळाचे तेल चांगले उकळा. कडीपत्त्याचा अर्क त्यात उतरेपर्यंत आणि कडीपत्त्याची पाने काळी होईपर्यंत ती तेलात ठेवा. आता तयार तेल आठवड्यातून एकदा तरी केसांना लावा.
कडीपत्यापासून हेअर मास्क बनवता ही येतो. कडीपत्याची पाने मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये केसांच्या लांबीला अनुसरुन दही घाला. तयार हेअरपॅक केसांना साधारण 30 मिनिटे ठेवून केस स्वच्छ करा.
ब्राम्ही (Brahmi)
ब्राम्ही आयुर्वेदिक वनस्पती सगळ्यांनाच माहीत असेल. ब्राम्हीचा उपयोग अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. दलदलीच्या ठिकाणी वाढणारी ब्राम्हीची झाडे ही दिसायला थोडी वेगळी असतात. एखाद्या पानफुटी वनस्पतीप्रमाणे याचा आकार असतो. सौंदर्य आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ब्राम्ही ही फारच लाभदायक असते.ब्राम्हीमध्ये कॅल्शिअम, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी, सेलेनिअम आणि व्हिटॅमिन बी १, बी २ असते. यासाठीच अनेक हेअर प्रॉडक्टमध्ये ब्राम्हीचा वापर केला जातो.ब्राम्हीच्या तेलाच्या वापरामुळे केसगळती कमी करण्यासाठी, केसातील कोंडा कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी ब्राम्ही फारच फायदेशीर (Ayurvedic Hair Care Tips In Marathi) ठरते.
असा करा वापर ( How To Use) :
ब्राम्हीच्या पानांचा उपयोग करुन तुम्ही तेल बनवू शकता. ब्राम्हीची पाने घेऊन ती चांगली सुकवून घ्या किंवा त्याचा तसाच वापर केला तरी चालेल. नारळाचे तेल घेऊन त्यामध्ये ब्राम्हीची काही पाने घाला. पाने चांगली उकळून घ्या. तयार तेल केसावर लावा. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळेल.
ब्राम्हीची पाने वाटून ती केसांना मेंदीप्रमाणे लावा. केसांच्या मुळांना वाटलेली ब्राम्ही लावा. त्यामुळे कोंडा जाण्यास मदत मिळेल.
जास्वंदाचे फुल (Hibiscus Flower)
गणपतीचे सगळ्यात आवडते फुल म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. ते जास्वंदांचे फुल हे नुसते दिसायचा सुंदर किंवा तिला देवासाठीच मान नाही तर त्याचा उपयोग हा केसांसाठी देखील केला जातो. जास्वंदीचे फुल आणि पाला हे दोन्ही औषधी घटकांनी भरलेले असतात. जास्वंदाच्या फुलांचा वापर करुन शॅम्पू आणि तेल बनवले जातात. ज्याचा उपयोग करुन केसांसाठी अनेक फायदे मिळवता येतात. जास्वंदीच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन C असते जे केसांच्या वाढीसाठी फारच फायद्याचे ठरते. जास्वंदाच्या उपयोगाने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. केस गळती कमी होऊन केस सुंदर होण्यास मदत मिळते. जास्वंदीच्या फुलांमध्ये अँटी फंगल असे गुणधर्म असतात.जे स्काल्पमधील कोंडा काढून टाकण्यास मदत करते.
असा करा वापर (How To Use) :
जास्वंदीच्या फुलांचा वापर करायचा असेल तर ही फुलं घेऊन ती एका भांड्यात घ्या. त्यामध्ये नारळाचे किंवा बदामाचे तेल घ्या. जास्वंदाची फुले त्यामध्ये चांगली उकळा. आता तयार झालेले तेल केसांवा लावा.त्यामुळे केसांना वाढ मिळण्यास चालना मिळेल.
जास्वंदाची फुलं घेऊन त्याची पेस्ट करा. त्यामध्ये दही घाला. तयार पॅक केसांना लावून साधारण 20 ते 30 मिनिटे ठेवा. केस धुवून टाका. केस चांगले चमकदार दिसण्यास मदत मिळेल.
भृंगराज (Bhringraj)
केसांसाठी वरदान असलेला अशी एक औषधी वनस्पती म्हणजे भृंगराज. प्राचीन काळापासून केसांची निगा राखण्यासाठी आयुर्वेदात भृंगराज तेलाचा वापर केला जातो. भृंगराजमध्ये केसांसाठी अनेक पोषक घटक असतात. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भृंगराजची शेती केली जाते. वेगवेगळ्या नावाने हे ओळखले जातात. पण सर्वसामान्यपणे भृंगराज नावाने ही ओळखली जाते. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी नी युक्त असलेल्या घटकांमुळे केसांचे पोषण होण्यासाठी मदत मिळते. केसगळती, कोंडा, केसांची वाढ होण्यासाठी भृगंराज हे फारच फायद्याचे ठरते. म्हणून अनेक केसांच्या प्रॉडक्टमध्ये भृंगराजचा वापर केला जातो.
असा करा वापर ( How To Use) :
आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भृंगराजचे सेवनही केले जाते. पण केसांसाठी त्याचा उपयोग करताना भृंगराज तेलाचा उपयोग करु शकता. भृंगराज तेल थेट बाजारात मिळते. त्याचा थेट वापर केला तरी चालू शकेल. पण जर तुम्हाला भृंगराज तेल घरी बनवायचे असेल तर तुम्ही भृंगराजाची काही पाने घेऊन ती तेलात उकळवा. थंड करुन ते तेल केसांना लावा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
भृगंराज वनस्पतीची पावडर हल्ली अनेक ठिकाणी मिळते. ती पावडर घेऊन ती पाण्यात कालवून तुम्ही ती केसांना लावू शकता. असा मास्क केसांना सधारण 20 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून टाका. तुम्हाला केसांमध्ये नक्कीच फरक झालेला जाणवेल
मेथी दाणे (Methi Seeds)
आरोग्यासाठी फायदेशीर असे मेथी दाणे देखील केसांसाठी फारच फायद्याचे आहेत. त्याच्या सेवनामुळे आणि वापरामुळे केसांच्या वाढीला चालना मिळण्यास मदत मिळते. मेथी दाणे हे लोह आणि प्रथिनांनी युक्त असतात. केसांच्या वाढीसाठी हे दोन्ही घटक फारच फायद्याचे ठरतात. या शिवाय यामध्ये असलेले अँटीफंगल आणि अँटीइन्फ्लेमेटरी घटक असल्यामुळे केसांमधील घाण दूर करण्यास मदत मिळते. मेथी दाण्याचा उपयोग करुन केसांसाठी कसा फायदा मिळवायचा ते जाणून घेऊया.
असा करा वापर ( How To Use) :
मेथी भिजत घालून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये आवळा पावडर घालून हा पॅक तयार करा आणि तो केसांना लावा. हा पॅक केसांना लावल्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते.
लिंबू आणि मेथीचे देखील एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे. मेथी पेस्ट आणि लिंबाचा रस लावल्यामुळे केसांचा चमक मिळण्यास मदत मिळते. केसांची वाढही चांगली होते.
शिकेकाई (Shikakai)
केसांसाठी शिकेकाई हा नैसर्गिक शॅम्पू आहे. शिकेकाईच्या उपयोगामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळतो. शिकेकाईमध्ये अँटीसेप्टिक असे गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांना झालेली इजा म्हणजेच टाळूला आलेली सूज कमी करण्यास मदत करते. केसांमधील कोंडा कमी करण्यासही शिकेकाई फारच फायद्याची ठरते. शिकेकाई नावाचे फळ असते जे वाळवून त्याचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये याचा समावेश केला जातो.
असा करा वापर (How To Use) :
जर तुम्हाला केमिकलयुक्त शॅम्पू वापरल्यामुळे केसांच्या तक्रारी जाणवत असतील तर शॅम्पूला पर्याय म्हणून तुम्ही शिकेकाईचा वापर करुन केस धुवू शकता.
शिकेकाई, आवळा पावडर एकत्र करुन त्याची पेस्ट करा. ती केसांना लावून ठेवा आणि काही मिनिटांनी केस धुवून टाका.केसांना चमक मिळण्यास यामुळे मदत मिळेल.
जतमानसी (Jatmansi)
केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी जतमानसी हे फारच फायद्याचे असते. जतमानसी हे लहान झुडूप असून ही वनस्पती केसांसाठी फारच फायद्याची ठरते. हिमालयात मिळणारी ही वनस्पती असून त्याच्या वापरामुळे केस चांगले होण्यास मदत मिळते. जतमानसीला मस्करुट असे म्हणतात. ही एक जांभळ्या रंगाची फुलं असून त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. जतमानसी तेल आणि जतमानसी पावडर बाजारात मिळते. त्याच्या वापरामुळे त्वचा आणि केस चांगली होण्यास मदत मिळते.
असा करा वापर ( How To Use) :
जतमानसीचा उपयोग करताना या वनस्पतीतून तेल काढले जाते. या तेलाचा उपयोग करुन मसाज केल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
केसांनचे प्रदूषण आणि इतर कोणत्याही गोष्टीने नुकसान होत असेल तर याच्या वापरामुळे केस चांगले होण्यास मदत मिळते.
जतमानसी पावडर पाण्यात भिजवून तुम्ही तो पॅक केसांना लावा. केस धुवून टाका केस चांगले होण्यास मदत मिळेल.
नीलिनि (Neelini)
नीलिनी ही वनस्पती सगळ्यांनी ऐकली असेलच असे नाही. पण यालाच इंडिगो असे म्हणतात. नीलिनी नावाची वनस्पती मिळते जिला निळ्या रंगाची फुले येतात. याची पाने ही फारच फायद्याची असतात. इंडिगो हर्बच्या फायद्यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत मिळते. स्काल्प स्वच्छ करण्यासही नीलिनि मदत करते. याला मेंदीमध्ये घातल्यामुळे केसांना चांगला रंग येण्यास मदत मिळते.
असा करा वापर (How To Use) :
मेंदी पावडर आणि नीलिनि ही पावडर एकत्र करुन त्याचा वापर करुन तुम्ही केसांना लावू शकता. त्यामुळे केसांना चांगला रंग मिळण्यास मदत मिळेल.
नीलिनीचे तेल मिळते. ज्याचा वापर केल्यामुळे केस मुलायम होण्यास मदत मिळते. केसांसाठी नीलिनिचे तेल हे फारच फायद्याचे आहे.
नीलिनिची पानं उकळून ते तेल केसांना लावल्यामुळे केस चांगले होण्यास मदत मिळते.
हळद (Turmeric)
हळद ही वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरली जाते. हळदीमध्ये असे अनेक घटक असतात. जे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फारच फायद्याचे ठरतात. हळदीमध्ये असलेले कुर्कुमीन नावाचे घटक असते जे केसांसाठी फारच फायद्याचे ठरते. याशिवाय यामध्ये ट्युमेरॉन, अटलोंटन, असे घटक असतात. जे केसांसाठी फारच फायद्याचे ठरतात. केसांच्या वाढीसाठी ते मदत करतात. केसांसाठी हळदीचा उपयोग याआधी तुम्ही की केला नसेल पण त्याचा उपयोग केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
असा करा वापर (How To Use) :
केसांसाठी हळदीचा उपयोग करताना ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यामध्ये हळदी पावडर किंवा हळकुंड कुटून घालावे. असे तेल केसांना लावल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.साधारण अर्धा तास मसाज करुन तुम्ही केसांना मालिश करा.
हळद, दूध आणि मध असे मिश्रण एकत्र करुन ही पेस्ट केसांना लावा. केसांना ही पेस्ट लावून किंवाम 15 मिनिटांसाठी ठेवा. केसगळती थांबवण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. अशाच प्रकारे हळदीपासून हळदीचे फेसपॅक ही तयार करता येतात
Use Of Ayurvedic Hair Prodcuts In Marathi | आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचा वापर
आर्युवेदिक प्रॉडक्ट हे हल्ली बाजारात सहज उपलब्ध आहेत. यांचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे असते. या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर त्याचा वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला कळू शकेल.
- आयुर्वेदिक घटक हे खूप शुद्ध असल्यामुळे त्याचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. त्यामुळे त्याचा एकदा वापर केल्यानंतर तुम्हाला त्याचे विपरित परिणाम जाणवत असतील तर तुम्ही त्याचा वापर करायला हवा.
- जर तुम्हाला अशा गोष्टींची एलर्जी असेल तर तुम्ही त्याचा वापर करताना थोडी काळजी घ्यायला हवी. असे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा वापर थांबवा
- एखादे प्रॉडक्ट तुम्हाला 100 टक्के शुद्धतेची गॅरंटी देत असेल तर तुम्ही त्याचा वापर करताना थोडी सावधानता बाळगणे नेहमी चांगले
- आठवड्यातून एकदा किंवा तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही हमखास त्याचा वापर आठवड्यातून दोन ते तीनवेळा केला तरी चालू शकेल.
Tips About Ayurvedic Products | आयुर्वेदिक प्रॉडक्टबद्दल माहीत हव्यात या गोष्टी
हल्ली अगदी कोणत्याही स्वरुपात आपल्याला आयुर्वेदिक प्रॉडक्ट मिळू शकतात. केसांसाठी आर्युवदिक गोष्टींचा विचार करता तेल, शॅम्पू, हेअर पॅक अशा गोष्टी मिळतात. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असायला हवी
- अनेक हेअरपॅक हे कोणत्याही माहितीशिवाय मिळतात. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक घटकाचे फायदे तोटे माहीत नसतील तो पर्यंत तुम्ही त्याचा वापर करु नका.
- केसांसाठी कोणतेही आर्युवेदिक तेल वापरताना ते खूप वेळ केसांमध्ये ठेवू नये ते तुम्ही जास्तीत जास्त 2 तासांसाठी ठेवावे. त्यानंतर धुवावे
- मेथी हा घटक काही जणांना उष्ण पडू शकतो. त्यामुळे त्याचा वापर अति करणे या अधिक समस्या निर्माण करु शकते.
- एखादी हेअरट्रिटमेंट केल्यानंतर जर तुम्ही आर्युवेदिक घटकांचा वापर करत असाल तर त्यामुळे केस गळण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे तुम्ही केसांना एकावेळी एकाच घटकाचा वापर करणे नेहमी चांगले
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. आयुर्वेदिक घटक केसांच्या वाढीला चालना देतात का?
आयुर्वेदिक घटक हे केसांसाठी फारच नैसर्गिक असतात. त्यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही. केसांच्या समस्या कमी करुन केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते. त्यामुळे केसांसाठी आयुर्वेदिक घटक हे नक्कीच कमालीचे काम करतात.
2. कोणते घटक केसांना जाड करण्याचे काम करतात?
कडीपत्ता, मोरिंगा तेल, मेथी, ब्राम्ही, अश्वगंधा हे घटक केस जाड करण्यास मदत करतात. तुम्ही हे घटक तुमच्या केसांसाठी वापरले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
3. आहारात कोणते घटक असतील तर केस जाड होण्यास मदत मिळते?
मेथी आणि आवळ्याचे सेवन हे केसांसाठी फारच फायद्याचे असते. जर तुम्ही मेथीचे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होण्यास मदत मिळेल. त्यामुळे तुम्ही आहारात आवळा आणि मेथी याचे पाणी प्यावे असे केल्यामुळे तुमची केस गळती कमी होते. त्यामुळे केस जाड व्हायला मदत मिळते. याशिवाय तुम्ही कोरफडीचा रस प्यायला की, केसांची चमक वाढण्यास मदत मिळते.