वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आयुष्यमान खुराना आता आणखी एका नव्या लुकमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘मुल्क’च्या यशानंंतर चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा एक नवी गोष्ट घेऊन येत आहे. या चित्रपटासाठीच आयुष्यमान आपला पोलिसाखाक्या दाखवताना दिसणार आहे. ‘आर्टिकल-१५’ असे या चित्रपटाचे नाव असून आयुष्यमानचा या चित्रपटातील फर्स्ट लुक सध्या व्हायरल झाला आहे. आयुष्यमानने हा फोटो त्याच्या फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
विद्युत जामवालच्या ‘जंगली’चा ट्रेलर आला
सिम्बा, सूर्यवंशीनंतर आवडेल का हा पोलीस?
बॉलीवूडमधील हिरोची संकल्पना आता बदलू लागली आहे. प्रेमासाठी लढणारा असा हिरो आता लोकांना आवडत नाही. तर अन्यायाविरोधात लढणारा, चुकीला माफी नाफी म्हणणारा आणि वाईटाचा विनाश करणारा असा हिरो लोकांना आवडतो. मग तो कोणता अधिकारी असो वा कॉमन मॅन त्याला टाळ्या पडल्या वाचून राहत नाही. अजय देगवणने साकारलेला पोलीस अधिकारी बाजीराव सिंघम इतका गाजला की, अजयला एक वेगळी ओळख त्या कॅरेक्टरने मिळवून दिली. त्यानंतर आलेला सिम्बाही खूपच जास्त गाजला. रणवीर सिंहने साकारलेला सिंबा… त्यामध्येच दाखवेला सूर्यवंशम अवतारातील अक्षय . त्यामुळे नागरिकांची सेवा करणारा पोलीस सध्या बॉलीवूडमध्ये राज करत आहे. आता आयुष्यमान खुरानाही पोलिसाची भूमिका साकारत आहे म्हटल्यावर उत्सुकता तर असणारच ना?
कॅन्सरनंतर सोनालीने केले फोटोशूट
आयुष्यमानच्या चेहऱ्यावर गंभीर भाव
आर्टिकल १५ असे या चित्रपटाटे नाव असून या चित्रपटासाठीचा हा आयुष्यमानचा लुक आहे. त्याने शेअर केलेल्या त्याच्या या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत आहेत. चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर धर्म,जात, जनजाती, लिंग आणि जन्मस्थान यामुळे लोकांमध्ये होणाऱ्या मतभेदावर आधारीत हा चित्रपट आहे. आयुष्यमान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून ईशा तलवार, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद अय्युब यांच्या देखील प्रमुख भूमिका चित्रपटात आहे.
आयुष्यमानचा करीअर ग्राफ चढताच
युष्यमान खुरानाने विकी डोनर या चित्रपटातून आपल्या करीअरची सुरुवात केली. त्याच्या दिसण्यामुळे त्याला चॉकलेट बॉयचीच भूमिका मिळेल असे वाटत असेल तरी त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत. अंदाधुंद, बरेली की बर्फी, बधाई हो हे त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालले. त्याची सगळ्यात जास्त प्रशंसा त्याच्या अंदाधुंद या चित्रपटासाठी झाली. त्याने साकारलेला अंध तरुण लोकांना आवडला कारण हा चित्रपट अंध तरुणाची गोष्ट नव्हती तर त्याला अनेक ट्विस्ट होते. विशेष म्हणजे शेवटपर्यंत हे ट्विस्ट कायम राहिले. चित्रपट संपल्यानंतर अरे पुढे काय झाले असे होते.आता हा नवा प्रयोग नवा रोल त्याच्यासाठी नक्कीच थोडा टफ असेल कारण लुकसोबतच पोलिसीखाक्या दाखवणे, तो लोकांना पटणे हे कठीण असते. आता त्याची तयारी चित्रपटाचा ट्रेलर आल्यावर कळेलच पण त्याला करीअरची आणखी एक पायरी चढायला हा नवा रोल मदत करेल हे मात्र नक्की!
(सौजन्य- Instagram)