ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
ayushmann khurrana

आयुषमान खुराणाने जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा

रविवार 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिनानिमित्त, आयुषमान खुराणाने त्याच्या जुन्या रेडिओ जॉकी असतानाच्या आठवणींना उजाळा देत जागतिक रेडिओ दिन साजरा केला. हिंदी चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराणा हा भारतातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक समजला जातो. गाणे असो वा अभिनय, डान्स असो की कॉमेडी आयुष्यमान खुराणा हा एक ऑलराउंडर कलाकार आहे. म्हणूनच देशभरात तसेच सोशल मीडियावरही त्याचे खूप  चाहते आहेत. जो प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करतो आणि ते पात्र जिवंत करतो. म्हणूनच लोकांना तो आवडतो. आयुषमानच्या चित्रपटांचे विषयही अगदी आगळेवेगळे असतात. तो सहसा सामाजिक विषयांवर चित्रपट बनवतो ज्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. 

अधिक वाचा – 25 फेब्रुवारीपासून घडणार ‘पाँडीचेरी’ची सैर

सुरुवात रेडिओपासून केली

आज चित्रपटसृष्टीत एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुषमानने त्याच्या करियरची सुरुवात मात्र रेडिओपासून केली आहे हे बऱ्याच लोकांना ठाऊक आहे. रविवारी, जागतिक रेडिओ दिनानिमित्त त्याने रेडिओ जॉकी असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. रेडिओवरील  त्याच्या  ब्रेकफास्ट शोसाठी दिल्लीच्या बिलबोर्डवर पहिल्यांदा दिसल्याची आठवण जागवताना आयुषमानने शेअर केले की, “वयाच्या 22 व्या वर्षी, मी बहुधा देशातील सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक होतो ज्याने असा ब्रेकफास्ट शो होस्ट केला. कारण सामान्यतः या स्लॉटचे शोज अतिशय अनुभवी रेडिओ जॉकीद्वारे होस्ट केले जातात. पण मला मात्र या कामाचा अजिबात अनुभव नव्हता तरीही मला ब्रेकफास्ट शो करण्याची संधी मिळाली.

 रेडिओ जॉकी म्हणून काम करण्याचा मला आधी काहीही अनुभव नव्हता. ते माझे पहिलेच काम होते पण तरीही त्यांनी मला ब्रेकफास्ट शो दिला आणि त्यावेळी माझ्या शोची जोरदार जाहिरात केली होती. मी दिल्लीत होर्डिंग्जवर झळकलो होतो. हे सगळे माझ्यासाठी खूप नवीन होते.” 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – व्हॅलेंटाईन्स डेला असं व्यक्त करा प्रेम, जोडीदारासोबत पाहा या वेबसिरिज

करियरच्या सुरुवातीच्या दिवसांची कदर करणे महत्वाचे

जागतिक रेडिओ दिवसाचे औचित्य साधून आयुषमानने इंस्टाग्रामवर त्याचा एक जुना फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो पुढे लिहितो की, “मला वाटते की प्रत्येकाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या पॉईंटची कदर करणे खूप महत्वाचे आहे कारण तिथपासून आपण आपल्या करियरची, एका नव्या कामाची सुरुवात केलेली असते. रेडिओ इंडस्ट्रीमध्ये खूप टॅलेंटेड माणसे आहेत, खूप प्रतिभावंत आणि क्रिएटिव्ह व्यक्ती आहेत. त्यापैकी काहींना भेटण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले. रेडिओमध्ये काम करतानाच माझी जडणघडण झाली. माझ्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला गेला. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद, मान ना मान, मैं तेरा आयुषमान #WorldRadioDay.”

आयुषमान हा असा एक अभिनेता आहे ज्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. तो आवर्जून सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. चाहत्यांच्या कमेंटना एकतर लाईक करून किंवा त्यांच्या पोस्टवर टिप्पणी देऊन किंवा ट्विट रीशेअर करून त्यांना उत्तर देतो. आयुषमाननी  पूर्वीही‘आऊट ऑफ द बॉक्स’ कठीण विषय निवडून इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

2019 साली आलेल्या त्याच्या ‘आर्टिकल 15’ या क्राइम-थ्रिलर चित्रपटात त्याने जातीय भेदभावाचा मुद्दा मांडला होता. आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि आयुषमान ‘अनेक’ हा चित्रपट आणणार आहेत. हा एक सामाजिक-राजकीय विषयावर भाष्य करणारा थ्रिलर चित्रपट असेल. अनुभव सिन्हा यांनीच ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता हे दोघे ‘अनेक’ च्या निमिताने पुन्हा एकत्र आले आहेत. हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – 29 एप्रिलपासून सर्वत्र घुमणार ‘चंद्रमुखी’च्या घुंगरांचे बोल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

13 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT