ADVERTISEMENT
home / मनोरंजन
श्रद्धांजली मेसेज

सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट चटका लावून जाणारी, सेलिब्सनी वाहिली श्रद्धांजली

सिद्धार्थ शुक्ला ज्याला अगदी काहीच दिवसांपूर्वी सेटवर पाहिले होते. शहनाज गील आणि तो एका कार्यक्रमाच्या प्रमोशनदरम्यान आला होता. काल म्हणजेच गुरुवारी अचानक त्याच्या मृत्यूची बातमी समोर येणे हे सगळ्यांसाठीच फारच धक्कादायक होते. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या तीव्र झक्यामुळे त्याचे निधन झाले. त्याचे हे कारण आणि त्याची अकाली झालेली एक्झिट अनेकांना चटका लावून गेली. त्याचे जाणे हे अजूनही खूप जणांना पटलेले नाही म्हणूनच की काय खूप जणांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीमध्ये त्यांना लागलेला धक्का दिसून येत आहे.

हमारी अधुरी कहानी’ #sidnaaz च्या चाहत्यांना दुःख अनावर

Bigg Boss 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन

अनेकांनी दिली भेट

सिद्धार्थच्या फॅन फॉलोविंग चांगलाच मोठा आहे. बिग बॉस 13 चा सीझन जिंकून त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यामुळेच त्याला अनेकांनी श्रद्धांजली वाहत झालेला त्रास व्यक्त केला आहे. 

ADVERTISEMENT

खूप लवकर गेलास. तुझी आठवण येईल. कुुटुंबाला बळ मिळो.रेस्ट इन पीस (RIP)

  • सलमान खान 

कधीतरी आयुष्य खूपच गुंतागुंतीचे होऊन जाते. पण आज याची जाणीव झाली झाली की आपल्यापेक्षाही काही तरी मोठी शक्ती या जगात आहे. आज माझ्या शब्दांना काहीही अर्थ लागत नाही.  हे टाईप करताना माझे ह्रदय पिळवटून निघत आहे. रेस्ट इन पीस #सिद्धार्थ शुक्ला

ओम शांती 

  • रश्मी देसाई 

चेहरा जो नेहमी हसताना दिसला. खुश  पाहिले. पण आज तुला असे पाहिले आणि मन तुटले. मजबूत राहा 

  • अली गोनी 

शब्द नाहीत! सिद्धार्थ तू खूप लवकर गेलास. वाईट केलंस

ADVERTISEMENT
  • राहुल वैद्य 

मी तुला स्वर्गात भेटायला येईन भावा. रेस्ट इन पीस सिद्धार्थ शुक्ला 

-असीम सझिम

मी तुला स्वर्गात भेटायला येईन भावा. रेस्ट इन पीस सिद्धार्थ शुक्ला 

-असीम सझिम

ADVERTISEMENT

तुला प्रेक्षक म्हणून टीव्हीवर पाहणे ते सिद्धार्थला मित्र म्हणून जाणून घेतले.  धन्यवाद colors tv  आणि bigg boss ज्याने आमची भेट घडवून आणली. तुझ्यासोेबत राहताना लहान मुलाचा खोडकरपणा,  काळजीवाहू, प्रेमळ आणि तितक्याच जिद्दी माणसाची ओळख झाली.चुका झाल्यानंतर त्या चुका मान्य करुन माफी मागणे असा हा हँडसम हंक. तुझ्यासोबत अजून वेळ घालवायची इच्छा होती. अपेक्षा आहे की तू वर जाऊनही  तू असा हसत राहा. 

-गौहर खान 

अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

जलेबी बेबी’ लुकमुळे मल्लिका शेरावत झाली ट्रोल

ADVERTISEMENT
03 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT