बेबी ऑईलचा वापर आपण सर्वांनी कधी ना कधीतरी केला असणारच. हे एक असे उत्पादन आहे जे केवळ लहान मुलांच्या स्किन केअरसाठीच नाही तर मोठ्यांच्या त्वचेसाठीही अत्यंत चांगले ठरू शकते. बेबी ऑईल आपल्या सर्वांच्या त्वचेसाठी नक्कीच चांगले ठरते. सर्वात जास्त फायदा होतो तो म्हणजे कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी. तुमच्याकडे बेबी ऑईल असेल तर त्याचा वापर नक्की कसा करावा यासाठी हा लेख तुम्ही नक्की वाचायला हवा. स्किन केअर रूटीनसाठी अनेक गोष्टींचा वापर करण्यात येतो. थंडीत अनेक जणांची त्वचा कोरडी होण्याची समस्या होते. त्यामुळे थंडीच्या हंगामात तुम्हालाही त्वचा कोरडी होण्याचा त्रास असेल तर, तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी बेबी ऑईलचा वापर नक्की करून घेऊ शकता. बेबी ऑईलचा वापर नक्की कसा करावा याबाबत अधिक माहिती तुम्ही करून घ्या.
DIY फेशियल ऑईल (Facial Oil)
बेबी ऑईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी फेशियल ऑईलदेखील बनवू शकता. हे कसे तयार करायचे हे आपण आधी पाहूया.
साहित्य –
- 3 चमचा बेबी ऑईल
- 1 लहान चमचा नारळाचे तेल
- 4-5 स्ट्रँड्स केशर
- चिमूटभर हळद पावडर (तुमच्या स्किनला जर सुटेबल असेल तर)
नोट – हळद पावडरच्या जागी तुम्ही विटामिन ई कॅप्सुल अथवा संत्र्यांची पावडर असेल तर तीदेखील तुम्हाला वापरता येऊ शकते
हे फेशियल ऑईल तुमच्या चेहऱ्यासाठीदेखील चांगले ठरते. तुम्ही तुमच्या सुविधेप्रमाणे याचा कस्टमाईज करून वापर करू शकता. तसंच हे अधिक काळासाठी तुम्हाला साठवूनही ठेवता येते.
मेकअप रिमूव्हर म्हणून करा बेबी ऑईलचा वापर
सहसा गडद मेकअप काढण्यासाठी रिमूव्हरचा जास्त वापर करावा लागतो आणि सर्व उत्पादन कंपन्यांचे रिमूव्हल प्रत्येक स्किन टोनसाठी योग्य ठरते असे नाही. मात्र बेबी ऑईलचा मेकअप रिमूव्हरसाठी तुम्ही वापर करू शकता. बेबी ऑईलने कोणताही गडद मेकअप लवकर निघण्यासाठी मदत होते आणि त्याशिवाय तुमची त्वचाही अधिक चांगली राहाते. सर्वात चांगली गोष्ट अशी की, बेबी ऑईलने मेकअप काढल्यास, तुमची त्वचा अजिबातच कोरडी होत नाही.
- तुम्ही बेबी ऑईलचे थोडे थेंब हातावर घ्या आणि सर्वात पहिले आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करून घ्या
- त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुवा
- तुम्ही बेबी ऑईल कोरड्या टिश्यूनेदेखील टिपून घेऊ शकता
- यामुळे लिपस्टिक आणि काजळाचे राहिलेले डागही निघून जातात
- हे लावल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर फेसवॉश लावा
हे दोन्ही उपाय तुम्हाला थंडीत त्वचा अधिक हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उत्तम राखण्यासाठी नक्कीच मदत करतील. अन्य कोणत्याही उत्पादनापेक्षा बेबी ऑईलचा त्वचेसाठी वापर हा अत्यंत चांगला ठरतो. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम त्वचेवर होत नाही आणि तुम्हाला तुमची त्वचा अधिक नैसर्गिक राखण्यासाठीही मदत मिळते. थंडीमध्ये त्वचा कोरडी होणे हे अत्यंत कॉमन आहे आणि त्यासाठी तुम्ही वेळीच काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. तुमची त्वचा संवेदनशील असल्यासदेखील तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो.