‘बधाई हो’ चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. त्यामधील दादीची भूमिका साकारणाऱ्या सुरेखा सिक्रीला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला असून या वर्षभरात त्यांना दुसऱ्यांदा हा त्रास झाला आहे. जुहूमधील क्रिटीकेअर रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांना मोठ्या रूग्णालयात दाखल करता येऊ शकत नाही असे त्यांची सेवा करत असणाऱ्या नर्सने सांगितले आहे. त्यामुळे आता फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या जवळच्या लोकांनी मदत करावी असंही तिने आवाहन केले आहे. तसंच सध्या काही निधी गोळा केला आहे आणि सध्या त्यांच्या उपचाराकरिता सुरेखाजीच्या फिक्स्ड डिपॉझिटमधील काही पैसे घेण्यात आले असून उपचाराकरिता अधिक पैसे लागणार असल्याचंही नर्सने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
अंकिताने सुशांतचे स्वप्न पूर्ण करायला केली सुरूवात, साथ देण्याची केली विनंती
सुरेखा सिक्रीने जिंकले आहे तीन राष्ट्रीय पुरस्कार
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या अभिनेत्रीलादेखील अशा आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत आहे. याआधीदेखील 2018 मध्ये सुरेखाजींना पॅरालिक स्ट्रोक आला होता. त्यावेळीदेखील त्यांना प्रचंड त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना काम मिळणं बंद झालं होतं. मागच्या वेळी सिंटाने सुरेखा सिक्री यांना आर्थिक मदत देण्याबाबत विचारले असता त्यांनी नकार दिला होता. सुरेखा सिक्री अत्यंत स्वाभिमानी असून आपल्याकडे असणाऱ्या पैशातून त्यांनी उपचार करून घेतले होते. पण आता त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत जाणून अनेकांना धक्का बसला असल्याचे वरीष्ठ अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी सांगितले. दरम्यान सिंटाचे संजय भाटिया यांनी जेव्हा 50 हजार रूपयांची मदत त्यांना देण्याचे सांगितले तेव्हा त्यांनी कळवते असे सांगूनही पुन्हा कळवले नाही असंही संजय भाटिया यानी सांगितलं.
संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात पार्थ समथान साकारणार मुख्य भूमिका
अनुप सोनी संपर्कात
बालिका वधू मालिकेत सुरेखा सिक्री यांनी काम केले होते आणि तेव्हापासून त्यांच्याजवळचा असणारा अनुप सोनी अजूनही त्यांच्या संपर्कात असून दोन आठवड्यांपूर्वीच त्यांच्याशी बोलणं झाल्याचं त्याने सांगितलं आहे. लॉकडाऊन काळात सतत त्यांच्या संपर्कात असून त्यांची काळजी घेत असल्याचंही त्याने सांगितलं. इतकंच नाही तर बालिका वधूची टीम त्यांची काळजी घेत असून सुरेखाजींना पुन्हा काम करायचं असल्याचंही त्याने सांगितले. सुरेखाजींच्या मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत. मैदान चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मादेखील सुरेखा सिक्रीच्या संपर्कात असून त्यांना काहीही कमी पडू देणार नाही असं त्याने सांगितले आहे. सुरेखा सिक्री या अप्रतिम अभिनेत्री असून 25 अभिनेत्यांच्या ताकदीच्या आहेत असंही अनेक जणांचं मत आहे. तसंच बधाई हो मधील त्यांची सहकलाकार असणाऱ्या नीना गुप्ता यांनी सुरेखा सिक्री या फायटर असून पुन्हा एकदा बऱ्या होऊन लवकरच काम करायला लागतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर निर्माता जे. डी. मजेठिया यांनी सांगितले की, सुरेखाजी बऱ्या झाल्यानंतर कधीही मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल. अशी अभिनेत्री मिळणं हे भाग्य आहे. सध्या टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक जण सुरेखाजींची तब्बेत सुधारावी यासाठी प्रार्थना करत असून त्यांना मदत करायला पुढे सरसावले आहेत.
टायगर सिंगर होतो तेव्हा.. या गाण्यातून पदार्पण
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा