दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty)च्या नात्याबाबत अनेक दिवसांपासून अफवा येत आहेत. सूत्रानुसार, दोघही त्यांच्या एकत्र आलेल्या सुपहिट बाहुबली चित्रपटापासून एकमेकांना डेट करत आहेत.
प्रभास आणि अनुष्काच्या लग्नाबाबत खुलासा
सध्या प्रभास त्याच्या आगामी साहो (Saaho) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने एका तामिळ वेबसाईटला दिलेल्या इंटरव्हयू दिला. या इंटरव्ह्यूदरम्यान लग्नाबाबत विचारलं असता त्याने सांगितलं की, लग्न होईल तेव्हा होईल.
प्रभास आणि अनुष्काच्या रिलेशनवरून या दोघांना अनेकदा मीडियाने प्रश्न विचारले आहेत. पण दोघांकडूनही याबाबत कोणतंच शिक्कामोर्तब अजून आलेलं नाही. या नुकत्याच झालेल्या इंटरव्ह्यूमध्येही लग्नाबाबत प्रभास म्हणाला की, जेव्हा असं व्हायचं असेल तेव्हा होईल. तो असं म्हणाला की, माझं लव्ह मॅरेज कसं होईल. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो या अफवांबद्दल म्हणाला होती की, मी आणि अनुष्का खूप चांगले मित्र आहोत. या दोन वर्षात कोणी ना कोणी आम्हाला एकत्र पाहिलं असेलच. हाच प्रश्न मला करण जोहरच्या शोमध्येही विचारण्यात आला होता. त्यावेळी दिग्दर्शक राजमौली आणि अभिनेता राणा दुगुबत्तीने या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्यांनीही हेच सांगितलं होतं की, माझ्या अनुष्कामध्ये असं काहीही नाही. आता हे काही मी त्यांना शिकवलं नव्हतं.
साहोबाबत उत्सुकता
प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो हा चित्रपट 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात श्रद्धासोबतच बॉलीवूडमधील नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरूण विजय आणि मुरली शर्मासुद्धा यात दिसणार आहेत. साहो हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असून या चित्रपटात अनेक स्टंट्स करताना प्रभास आणि श्रद्धा हे दोघंही दिसणार आहेत. हा चित्रपट टॉलीवूडचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं म्हणण्यात येतंय. बाहुबली सिनेमापासूनच या चित्रपटाचं प्रमोशन सुरू करण्यात आलं होतं.
साहोनंतर प्रभास होणार बॅड बॉय
साहो चित्रपटानंतर प्रभास बॅड बॉय या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ग्रँड इव्हेंट नुकताच हैदराबादमधल्या रामोजी फिल्म सिटीत पार पडला. या चित्रपटातील एक गाणंही लाँच करण्यात आलं. ज्यामध्ये प्रभाससोबत जॅकलीन फर्नांडीस थिरकताना दिसणार आहे. तसंच तिने या चित्रपटात प्रभाससोबत एक्शन सीन्सही केले आहेत.