अनेक वर्षे घराची तीच ती अरेंजमेंट बघून आपल्यालाच कंटाळा येतो. अशा वेळी जेव्हा आपल्याला थोडा चेंज हवा असतो तेव्हा आपण घराची अरेंजमेंट बदलायचा विचार करतो. थोडं नवं इंटेरियर करायचं, काही नवे शोपिसेस आणायचे, काही जुन्या जीर्ण गोष्टी टाकून द्यायच्या, घरातल्या वस्तूंची जागा बदलायची असा विचार करतो. घर सजवण्यासाठी आपण थोड्या लेटेस्ट डिझाईनच्या, तर काही पारंपरिक वस्तूंची निवड करतो. पण जर तुम्हाला तुमचं घर कमीत कमी आणि शोभिवंत पद्धतीने सजवायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही बांबूचा वापर अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने करू शकता. बांबूच्या वस्तू किंवा बांबूचा वापर करून इंटेरिअर डिझाईनिंग करू शकता. बांबूचा वापर तुमच्या घरात अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. चला तर बघूया बांबूचा वापर करून आपण घराला कशा पद्धतीने नवा लूक देऊ शकतो.
बांबूचा वापर करून करा भिंतींची सुंदर सजावट
तुम्हाला तुमच्या घराची सजावट अगदी अनोख्या पद्धतीने करायची असेल, तर तुम्ही बांबूचा वापर करून भिंती सजवू शकता. तुम्ही बांबूचा वापर करून एखादे सुंदर डिझाईनचे वॉल पॅनल बनवू शकता. ज्यामुळे तुमच्या भिंतीला खूप सुंदर टेक्सचर मिळेल. हॉल किंवा लिव्हिंग रूममध्ये बांबूची वॉल बनवून तुम्ही घराला एक स्टेटमेंट लुक देऊ शकता. लिव्हिंग रूम सजवण्यासाठी ही एक चांगली कल्पना आहे.
रुम डिव्हायडर म्हणून वापरा
घरामध्ये बांबू वापरण्याचा हा देखील एक उत्तम मार्ग आहे. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराची खोली असेल, जिचे तुम्हाला दोन भाग करायचे असतील तर तर बांबूच्या मदतीने तुम्ही रूम डिव्हायडर बनवू शकता. यामुळे मोठ्या खोलीचा चांगला वापर करता येतो त्याच वेळी, ते दिसायलाही खूप सुंदर दिसते.
गार्डन एरिया सजवा
जर तुमच्या घराच्या बाहेर बागेची जागा किंवा अंगणात बसायला छान जागा असेल तर तुम्ही तिथे बांबूचे फर्निचर ठेवू शकता. आसन व्यवस्थेमध्ये बांबूचा वापर करून तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीला एक अनोखा टच देऊ शकता.
बेडरूमला मेकओव्हर द्या
बांबूचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या घरातील कोणत्याही भागात चांगले दिसते. बांबूच्या मदतीने तुम्ही तुमच्या बेडरूमची सुंदर सजावट करू शकता. उदाहरणार्थ, बांबूचे दिवे, लॅम्पशेड्स, साइड टेबल आणि कॉफी टेबल वापरून बेडरुमला एक सुंदर लूक देऊ शकता. यामुळे तुमची बेडरूम खूप क्लासी दिसेल. तसेच बांबूच्या फर्निचरला पूरक म्हणून तुम्ही भिंतींना लाईट शेड आणि पांढऱ्या रंगाचे बेडशीट वापरू शकता.
बांबूच्या मदतीने फ्रेम बनवा
आपण घरात डेकोरेशनसाठी भिंतीवर विविध प्रकारची चित्रे आणि कलाकृती लावतो. यासाठी फ्रेमचाही वापर केला जातो, पण त्याला एक वेगळा ट्विस्ट द्यायचा असेल तर बांबूच्या फ्रेम लावा. या फ्रेम्स अतिशय शोभिवंत दिसतात.
डायनिंग एरियाची सजावट करा
बांबूचा उपयोग करून जर तुम्हाला तुमचा डायनिंग एरिया सजवायचा असेल, तर तुम्ही बांबूचे डायनिंग टेबल आणि खुर्च्या घेऊ शकता. यामुळे तुमचे घर नैसर्गिकरित्या सुंदर दिसेल.
बांबूचा झुला
अंगणात किंवा हॉल मध्ये किंवा बाल्कनीत छान रिलॅक्स करायचे असेल तर अनेकांना त्याठिकाणी लाकडी झुला बांधायला व त्यात बसून कॉफी प्यायला, पाऊस बघायला व गाणी ऐकायला आवडते. लाकडी झुल्याऐवजी तुम्ही तुमच्या बाल्कनीत बांबूचा झुला लावू शकता. हा झुला थोड्याश्या जागेतही मावतो आणि खूप छान दिसतो.
अशा प्रकारे तुम्ही बांबूचा वापर करून घराला नवा लूक देऊ शकता.
Photo Credit- shutterstock, istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक