ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बार्बी डॉल झाली 60 वर्षांची

बार्बी डॉल झाली 60 वर्षांची

लहान असो वा मोठं दुकानात बार्बी डॉल (Barbie Doll) बघितल्यावर सगळ्यांनाच तिचं आकर्षण वाटतं आणि चेहऱ्यावर स्मित हास्य उमटतं. मला आजही आठवतंय जेव्हा लहानपणी मला आईबाबांनी पहिल्यांदा बार्बी डॉल घेऊन दिली होती आणि वाढदिवसाला आलेल्या प्रत्येकाला मी कौतुकाने माझी बार्बी दाखवत होते. इतक्या वर्षानंतर आजही खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर बार्बीचे आकर्षक सेट्स बघितल्यावर ते हाताळायची इच्छा होतेच. तिचं रूप अजूनही तेवढंच देखणं आहे. आज आपल्या लाडक्या बार्बी डॉलचा 60 वा वाढदिवस आहे. 

बार्बीचा 60 वर्षांचा प्रवास

60 वर्षाच्या काळात बार्बी नवनवीन रूपात बच्चेकंपनी समोर अवतरली. तसंच तिच्या रूपावरून अनेक वाद ही झाले. पण आजही बार्बीच आकर्षण कायम आहे. कधी गोऱ्या रूपात, कधी काळ्या रूपात, कधी लांब केस तर कधी छोटे, अगदी अंतराळ यात्रीच्या अवतारात ही बार्बी डॉल बाजारात उपलब्ध आहे. या 60 वर्षांच्या काळात बार्बीच्या चेहऱ्यावरील चमक आजही तशीच आहे. खरंतर बार्बी आज विश्वासपूर्ण आणि कणखर मुलीचं प्रतिनिधीत्व करते.    

जगभर प्रसिद्ध आहे बार्बी

ADVERTISEMENT

भारतासह जगभरात बार्बी डॉलचा चाहतावर्ग आहे. आत्तापर्यंत 05 करोड 80 लाख एवढी बार्बी डॉल्सची 150 पेक्षा जास्त देशांमध्ये विक्री झाली आहे. 09 मार्च 1959 मध्ये अमेरिकन कंपनी मॅटलने बार्बी डॉल पहिल्यांदा बाजारात आणली. बाजारात बार्बी उपलब्ध होण्याआधीच बार्बी कंपनीच्या तब्बल 03 लाख डॉल्स विकल्या गेल्या होत्या.

बार्बी आणि वाद

बार्बीचा रंग आणि आकारमान यामुळे सतत तिच्यावर टीका होते. पण बदलत्या काळानुसार बार्बीने ही तिचं रूपडं बदलंल. 2016 पासून बार्बी आता 3 वेगवेगळ्या बॉडी टाईप, 7 वेगवेगळे स्कीन टोन्स, 22 डोळ्यांचे रंग आणि 24 हेअरस्टाईल्समध्ये उपलब्ध आहे.

असा झाला बार्बी डॉलचा जन्म

ADVERTISEMENT

अमेरिकन उद्योजक रुथ हॅंडलर या आपल्या पती इलियट हँडलर यांच्याबरोबर बाहुल्यांची घर बनवत असत. एकदा त्यांनी पाहिलं की, त्यांची मुलगी बार्बरा आपल्या मैत्रिणींसोबत पुठ्ठ्याच्या बाहुलीने खेळत्येय आणि फारच खुश आहे. ती आपल्या बाहुलीला कपडे घालत होती. तिचा मेकअप करत होती. हे पाहून त्यांनी मुलींची पसंती जाणून घेतली आणि असा झाला बार्बीचा जन्म. रूथ यांनी जपानला जाऊन अनेक खेळणी उत्पादकांची भेट घेतली आणि अनेक प्रयोग केले. अखेर त्यांनी आपल्या आवडत्या बार्बीला साकार केलं.

कल्पनाशक्तीचं प्रतीक बार्बी

1965 मध्ये अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाय ठेवण्याच्या चार वर्ष आधीच अंतराळवीराच्या रूपातील बार्बी बाजारात आली होती. 1969 मध्ये अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पाऊल ठेवलं. 1959 च्या काळात पहिल्यांदा बाजारात आलेली बार्बी डॉलचे कपडे आणि डिझाईन्स नेहमीच वर्तमान काळाच्या पुढचे असतात. 12 से 18 महीने बार्बीचं नवं रूप डिझाईन करण्याची प्रक्रिया चालते. नंतर बार्बीच्या प्रोटोटाईपसाठी उत्पादन केलं जातं. आतापर्यंत आलेलं बार्बी डॉलचं प्रत्येक रूप लोभसवाणं आहे. आज बाजारात बार्बीच्या घरापासून अनेक इतर रुपातील बार्बी उपलब्ध आहे, मग ती डॉक्टर बार्बी असो वा उद्योजिका बार्बी. बार्बीसाठी खास हेअरस्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट आणि फोटोग्राफर्सची टीम कार्यरत आहे.

सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे बार्बी

ADVERTISEMENT

ट्विटर बार्बीचे तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टावरही बार्बीचे 1 दक्षलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवरही अनेक बार्बी फॅन पेजेस आहेत.

 

 

03 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT