#BBM2 च्या घरातील हा विकेंड फारच हॅपनिंग होता. कारण एकीकडे घरात झाली वाईल्ड कार्ड एंट्री तर दुसरीकडे झाली घरातील एका मेंबरची विदाई. त्यामुळे घरातली समीकरण येत्या आठवड्यात पुन्हा बदलणार आहेत. तुम्ही बाहेर गेल्यामुळे किंवा एखाद्या फंक्शनमुळे विकेंड बिग बॉस मिस केलं असेल तर नो प्रोब्लेम वाचा काय काय झालं विकेंडला बिग बॉसच्या घरात.
बिग बॉस मराठीच्या घरात आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो
या विकेंडला बिग बॉस मराठीच्या घरात नवीन वाईल्ड कार्ड एंट्री झाली. ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने बिग बॉसच्या घरात हिरो स्टाईल डॅशिंग एंट्री घेतली. आता वाघाची एंट्री झाल्यावर हा खेळ अजून रंगतदार होणार यात शंका नाही. प्रविण तरडे लिखीत आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ सिनेमातून आरोहचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर तो ‘घंटा’ या सिनेमातही तो दिसला होता. आरोह सध्या रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकातल्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे आणि आता बिग बॉस मराठी या रिएलिटी शोव्दारे आरोहचे टेलीव्हिजनवर पदार्पण झालं आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात जाताना आरोह वेलणकर म्हणाला की, “मला बिग बॉस हा शो खूप आवडतो. त्यामुळे जेव्हा बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी आली तेव्हा मी लगेच ती स्वीकारली. आम्ही कलाकार म्हणून जेव्हा काम करतो. तेव्हा माणूस म्हणून कसे आहोत, हे चाहत्यांना माहीत नसतं. बिग बॉस हा एकुलता एक शो आहे, ज्यामुळे माणूस म्हणून आम्ही कसे आहोत, हे 24 तास कॅमे-यासमोर राहून प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं. कारण इथे जसं दिसतं तसंच असतं.”
आरोहच्या एंट्रीने घरातले झाले सरप्राईज
आरोह वेलणकरच्या धमाकेदार एंट्रीने बिग बॉसने घरच्यांना सरप्राईज दिलं. आरोहच्या येण्याने बिग बॉस मराठीमध्ये आता घरात नवीन समीकरण नक्कीच तयार होतील. नेहा शितोळे, माधव देवचके आणि शिवानी सुर्वे या आरोहच्या मित्रांनी तर त्याचे आनंदाने स्वागत केलेच. पण आरोहला पहिल्यांदाच भेटलेल्या वैशाली म्हाडे आणि अभिजीत केळकर यांच्या बोलण्यावरूनही त्यांना आरोह आवडला असल्याचंच दिसून आलं.
वैशालीची एक्झीट आणि तिच्या मुलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
विकेंडचा डावमध्ये बिग बॉस मराठीच्या घरातून वैशाली म्हाडेची धक्कादायक एक्झीट झाली. वैशालीने अगदी हसतहसत घरातून एक्झीट घेतली. तसंच तिने सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणंही म्हटलं. गेले काही दिवस महागायिका वैशाली म्हाडे तिच्या मुलीच्या आठवणीने व्याकूळ होती. कारण तिच्या मुलीचा आस्थाचा 19 जुलैला वाढदिवस होता. यंदा पहिल्यांदाच वैशाली आपल्या मुलीच्या वाढदिवसाला तिच्यासोबत नव्हती आणि ही खंत वैशालीने बिगबॉसच्या घरात जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच व्यक्त केली होती. 19 जुलैला वैशालीने सर्व घरच्यांसोबत मिळून आपल्याला मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वैशाली म्हाडेच्यासोबत किशोरी शहाणे-विज, शिव ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, माधव देवचके, शिवानी सुर्वे, हिना पांचाळ, रूपाली भोसले यांनीही बर्थ-डे साँग गाऊन आस्थाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे मुलीची भेट होणार या गोष्टीमुळे वैशाली आनंदातच घरातून बाहेर पडली.
घरात आता दिसणार नवीन समीकरणं
वैशालीच्या एक्झीट आणि आरोहच्या एंट्रीमुळे एकीकडे नेहा, शिवानी आणि माधवचा ग्रुप स्ट्राँग झाला आहे तर अभिजीत आणि शिवच्या ग्रुपचं नुकसान झालंय. घरातून बाहेर पडतानाही वैशालीने शिवला अभिजीतच्या सोबत राहण्याचा सल्ला दिला. आता पाहूया शिव आणि अभिजीतचा ग्रुप कायम राहणार का? की, शिव आणि वीणाचा एकत्रित गेम सुरू राहणार. आरोहच्या एंट्रीनंतर नेहा आणि माधव घरात नवीन काय घडवणार?
हेही वाचा –
#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक
‘या’ कारणामुळे उतरन फेम रश्मी देसाईचा बिग बॉस 13 मध्ये भाग घेण्यास नकार