ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अक्षय आणि रणवीरनंतर बेअर ग्रिल्स करणार आता ‘या’ बॉलीवूड सेलिब्रेटीसोबत अॅडव्हेंचर ट्रिप

अक्षय आणि रणवीरनंतर बेअर ग्रिल्स करणार आता ‘या’ बॉलीवूड सेलिब्रेटीसोबत अॅडव्हेंचर ट्रिप

बेअर ग्रिल्स (Bear Grylls) ने त्याच्या जीवनात अनेक रोमांचक आणि खतरनाक अॅडव्हेंचर केलेले आहेत. भारतीयांसाठी त्याच्या मनात एक खास स्थान आहे. म्हणूनच त्याने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, बॉलीवू़ अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, विकी कौशल, साऊथ अभिनेता रजनीकांत सोबत अॅडव्हेंचर ट्रिप केल्या आहेत. नुकतंच दीपिकासाठी एक दुर्मिळ फुल मिळवण्यासाठी रणवीर सिंहसोबत त्याने एक थरारक जंगल सफारी केली होती. आता त्याला एका बॉलीवूड अभिनेत्रीसोबत जंगलातील थरार अनुभवायचा आहे. 

कोणत्या अभिनेत्रीसोबत अॅडव्हेंचर अनुभवायचं आहे बेअर ग्रिल्सला

बेअर ग्रिल्सने नुकतीच एका भारतीय अभिनेत्रीसोबत वाइल्ड अॅडव्हेंचरवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला खरंतर अनेक भारतीयांसोबत असा थरारक अनुभव घ्यायचा आहे. मात्र सध्या त्याला बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनससह अॅडव्हेंचरवर जाण्याची इच्छा आहे. त्याच्या मते प्रियंकासह रोमांचक ट्रिपवर जाण्यात खरी मौज असेल. यापूर्वी त्याने प्रियंकाचा पती निक जोनससोबत जंगल सफारी केली आहे. दोघंही खूप चांगली माणसं आहेत. त्यामुळे आता प्रियंकाची जंगल सफारी पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं बेअरला वाटत आहे. 

भारतीयांसोबत बेअर ग्रिल्सचा खास अनुभव

एका मुलाखतीत बेअरने त्याचा भारतीयांसोबत असलेला अनुभव शेअर केला आहे. त्याच्या मते भारतातील या आयकॉन्ससोबत काम करताना त्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्या मते आजवर त्याने ज्या सर्व भारतीयांसोबत अॅडव्हेंचर ट्रिप केल्या त्यांच्या इच्छाशक्ती आणि मेहनतीला सलाम. कारण त्यामुळेच त्याच्या खांद्याला खांदा लावून सर्व आव्हाने दूर करत त्यांनी या सफर पूर्ण केल्या आहेत. लवकरच तो प्रियंका चोप्रा जोनससह अशा एखाद्या रोमांचक सफरीवर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहते ही सफर पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
31 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT
good points logo

good points text