हिवाळ्याला सुरूवात झाली की त्वचेतील कोरडेपणा अचानक वाढू लागतो. अशावेळी तुमच्या त्वचेला गरज असते चांगल्या मॉइस्चराईझरची. ज्यामुळे तुमची त्वचेचे खोलवर पोषण होईल आणि त्वचेवरील सनटॅन, पिंपल्स,डाग, जुनाट व्रण, सुरुकुत्या कमी होण्यास मदत होईल. एवढंच नाही तर त्वचेचं योग्य पोषण झालं की त्वचा कायम मऊ आणि टवटवीत दिसते. पण यासाठी बाजारातील महागडे मॉईस्चराईझर वापरण्याची गरज नाही. घरात असलेले चिकू वापरूनही तुम्ही तुमची त्वचा मॉईस्चराईझर करू शकता. चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉफ्सरस आणि लोह असतं जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पण यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि सी भरपूर असतं. तुमच्या केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी या व्हिटॅमिन्सची शरीराला खूप गरज असते. जर तुम्ही चिकू नियमित खात असाल तर यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि मऊ राहण्यास मदत होते. कारण चिकूमध्ये अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तुमच्या त्वचेचे आणि केसांचे योग् संरक्षण राखलं जातं. चिकू नियमित खाण्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांचे आरोग्य राखलं जातंच. पण चिकूचा वापर तुम्ही त्वचेवर आणि केसांवर निरनिराळ्या पद्धतीने करू शकता.
चेहरा चमकदार करण्यासाठी चिकूचा फेसपॅक
साहित्य –
- अर्धी वाटी चिकूचा गर
- एक चमचा दूध
- एक चमचा बेसण
कसा तयार कराल फेसपॅक –
- सर्व साहित्य एकत्र करा आणि त्याची एक छान पेस्ट तयार करा
- ही पेस्ट तुमचा चेहरा आणि मानेवर एकसमान लावा
- सुकल्यावर वीस मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा
- तुमच्या त्वचेवर एक छान नैसर्गिक चमक दिसू लागेल
सुरकुत्या कमी करण्यासाठी चिकूचा फेसपॅक
कोरड्या त्वचेमुळे अथवा त्वचेला सैलपणा आल्यामुळे त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या तुम्ही चिकूने कमी करू शकता.
साहित्य –
- अर्धी वाटी चिकूचा गर
- एक चमचा चंदन पावडर
कसा तयार कराल फेसपॅक –
सर्व साहित्य एकत्र करा आणि त्यापासून एक फेसपॅक तयार करा. चंदन पावडरमुळे तुमची सैल पडलेली त्वचा ओढली जाईल आणि चिकूमुळे त्वचा टवटवीत दिसू लागेल. फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका
गळणाऱ्या केसांसाठी हेअर मास्क
चिकूमुळे तुमच्या फक्त त्वचेवर चांगला परिणाम होतो असं नाही तर तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. जर तुमचे केस अतिप्रमाणात गळत असतील तर हा हेअर मास्क केसांवर लावा
साहित्य –
- चिकूच्या बियांचे तेल
- चिकूच्या बियांची पावडर
- काळी मिरी
कसा तयार कराल हेअर मास्क –
चिकूच्या बियांची पावडर आणि काळीमिरी चिकूच्या बियांपासून काढलेल्या तेलामध्ये टाका. साहित्य गॅसवर थोडं गरम करा. गाळून एका काचेच्या बाटलीत अथवा डबीत भरून ठेवा. थंड झाल्यावर कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना हा मास्क लावा. केस गरम पाण्यात टॉवेल घट्ट पिळून तो अर्धा तास केसांवर बांधून ठेवा. त्यानंतर केसांना शॅम्पू न लावता फक्त पाण्याने केस धुवून टाका.
रात्री केसांना नारळाचे तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब
घरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Anti Aging Face Packs In Marathi)
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे चारोळी, असा करा वापर