ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
beauty tips in marathi

साध्या आणि सोप्या ब्युटी टिप्स मराठी | Simple & Easy Beauty Tips In Marathi

सुंदर दिसणे हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. सुंदर दिसण्यासाठी मुळात सुंदर असावं लागतं असं जर कोणी म्हणत असेल तर ते साफ खोटं आहे. तुम्ही अगदी कोणत्याही वयात सुंदर दिसू शकता. फक्त तुम्हाला स्वत: साठी वेळ काढणे गरजेचे असते. थोडासा वेळ काढून ब्युटी टिप्स मराठी Beauty Tips In Marathi जर फॉलो केल्या तर सुंदर दिसायला मदत मिळू शकते. अशाच काही सोप्या ब्युटी टिप्स आज आम्ही शेअर करत आहोत. यात तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता? तो कसा जाणून घ्यायचा? त्वचेची नियमित काळजी कशी घ्यायची हे जाणून घेण्यास मदत करेल. या शिवाय आपण अन्य काही ट्रिटमेंट जी तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी मदत करेल ते देखील जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया Beauty Tips in Marathi

तुमचा त्वचेचा प्रकार कसा जाणून घ्यावा | How To Know Your Skin Type In Marathi

तुमचा त्वचेचा प्रकार कसा जाणून घ्यावा | How To Know Your Skin Type In Marathi
How To Know Your Skin Type

प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. तुमची त्वचा कोणत्या प्रकारातील आहे. हे जाणून घेतले तर त्याची काळजी कशी घ्यायची हे समजणे फारच सोपे जाते.

कोरडी त्वचा

 कोरडी त्वचा ही कधीही चमकत नाही. चेहऱ्यावर असलेले वेगवेगळे पॉईंट्स चमकत नसतील तर अशी त्वचा कोरड्या प्रकारातील आहे. कोरडी त्वचा हायड्रेट ठेवणे फार गरजेचे असते. अशी त्वचा हायड्रेट किंवा मॉश्चराईज नसेल तर त्वचा फाटण्याची शक्यता असते. अशा त्वचेला पिंपल्सची समस्या नसली तरी देखील थंडीत चेहरा फुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हायड्रेशन हे या त्वचेसाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहे.

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा ही अगदी कुठूनही सहज ओळखता येते. त्वचा तेलकट असेल तर अशी त्वचा कपाळ, नाक, गाल, हनुवटी यांच्यावर चमकते. अशी त्वचा असणाऱ्यांच्या त्वचेखाली सीबमचे प्रमाण वाढलेले असते. अशी त्वचा असणाऱ्यांना त्वचेवर पिंपल्सचा त्रास जास्त होऊ शकतो. या त्वचेसाठी पिंपल्स हा त्रास असू शकतो. तेलकट त्वचा ओळखता येत नसेल तर सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरातून खूप काम करुन परतल्यानंतर त्वचेवरुन एक टिश्यू फिरवा. जर तो ओला झाला तर समजा तुमची त्वचा तेलकट प्रकारातील आहे.

ADVERTISEMENT

मिश्र त्वचा

 कोरडी आणि तेलकट त्वचा या दोघांचे गुणधर्म असलेली अशी मिश्र त्वचा अनेकांची असते. वातावरणानुसार तुमची त्वचा कोरडी आणि तेलकट होत असेल तर अशी त्वचा ही मिश्र त्वचेत मोडते. या त्वचेला दोन्ही त्वचेनुसार काळजी घ्यावी लागते. बॅलन्स राखणे हे या त्वचेसाठी गरजेचे असते. कधी माॉश्चराईज करायचे आणि कधी त्वचा कोरडी असायला हवी हे माहीत असायला हवे.

संवेदनशील त्वचा

त्वचेचा हा वेगळा असा काही प्रकार नाही. पण काही जणांच्या त्वचेला काहीही केले तरी पटक त्रास होतो अशांना काहीही सूट होत नाही असे होते. अशी त्वचा ही संवेदनशील त्वचेमध्ये मोडते. अशा त्वचेला खूपच जास्त काळजी घ्यावी लागते. कोणतीही गोष्ट चेहऱ्याला लावताना ती त्रास तर देणार नाही ना? याची काळजी घ्यावी लागते तुम्हालाही अगदी सहज कोणत्याही गोष्टीचा पटकन त्रास होत असेल तर तुम्ही त्वचेची काळजी घ्यायला हवी. 

चिरतरुण त्वचेसाठी ब्युटी टिप्स मराठी | Beauty Tips In Marathi For Youthful Skin

चिरतरुण त्वचेसाठी ब्युटी टिप्स मराठी | Beauty Tips In Marathi For Youthful Skin
Beauty Tips In Marathi For Youthful Skin

 त्चचेचा प्रकार कोणता हे जाणून घेतल्यानंतर त्वचेची काळजी Beauty Tips For Face At Home In Marathi घरातल्या घरात कशी घ्यायची हे जाणून घ्यायला हवी. तरच तुमची त्वचा जास्तीत जास्त काळासाठी चांगली राहण्यास मदत मिळते.
 

चेहऱ्याची स्वच्छता (Skin Cleaning)

चेहऱ्याची स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची असते. मेकअप केला असेल अथवा नसेल पण तुमच्या त्वचेची स्वच्छता दिवसातून किमान दोनदा तरी करायलाच हवी. जर त्वचेची स्वच्छता नियमितपणे केली तर पोअर्सच्या आत अडकलेली घाण निघण्यास मदत मिळते. पोअर्स स्वच्छ असतील तर त्वचा श्वास घेऊ शकते. त्वचा जास्तीत जास्त काळ चांगली राहते. त्यामुळे दिवसातून दोनदा तरी त्वचा स्वच्छ करा. सगळ्यात आधी मेकअप काढून मग योग्य असा फेसवॉश वापरा. डबल क्लिन्झ पद्धत करुनही तुम्हाला त्वचेची काळजी घेता येते.

ADVERTISEMENT

पाणी पिणे (Water Intake)

उत्तम आरोग्यासाठी पाणी हे कधीही चांगले. शरीराला आवश्यक असलेले पाणी तुम्ही प्याल तर अनेक आजारांपासून तुम्ही लांब राहता. उत्तम त्वचा हवी असेल तर तुम्ही पाणी भरपूर प्या. भरपूर पाणी पिण्याचा अर्थ सतत पित राहा असे नाही तर तासातासाने तुम्ही एक एक ग्लास पाणी प्यायले तरी देखील चालू शकते. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. पाण्यामुळे पोट साफ होते. पोअर्स स्वच्छ राहतात. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक लाली येते.

चांगली झोप (Beauty Sleep)

 झोप ही सगळ्यांसाठी महत्वाची असते. आवश्यक असलेली झोप मिळाली तर तरतरीत वाटते.शरीराचा थकवा गेलेला असेल तर तो चेहऱ्यावर दिसत नाही. झोप पूर्ण झाली की, डोळे, ओठ हे चांगले दिसतात. अनेकदा अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळीवर्तुळे येणे असे काही त्रास होतात. हा त्रास होऊ द्यायला नसेल तुम्ही वेळेवर झोपा. त्यामुळे त्वचा चिरतरुण राहण्यास मदत मिळते.

फेस मास्क (Face Mask )

त्वचेची स्वच्छता जितकी गरजेची आहे. तितकीच त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. फेस मास्क हे त्वचेसाठी गरजेचे असतात. त्वचेला हवे असलेले घटक फेस मास्कमधून मिळतात. त्वचा अधिक चांगली करण्यासाठी, त्वचेला थंडावा देण्याचे काम फेस मास्क करते. कोणतेही ऑर्गेनिक फेस मास्क चेहऱ्याला एकदा तरी लावा. त्यामुळे त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. 

एक्सफोलिएट (Exfoliate)

त्वचेची काळजी घेण्यामध्ये एक्सफोलिएट देखील येते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी त्वचा स्क्रब करणे गरजेचे असते. बाजारात असे एक्सफोलिएटर मिळतात ते तुम्ही नक्की वापरायला हवे. स्क्रब हे त्वचेच्या पोअर्समध्ये अडकवलेली घाण काढून त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा एक्सफोलिएट आठवड्यात एकदा तरी करा. त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते.

ADVERTISEMENT

सनस्क्रिनचा करा वापर (Use Of Sunscreen)

सनस्क्रिन हे त्वचेसाठी मस्ट असते. तुम्ही अगदी घरी जरी असलात तरी देखील तुम्ही मॉश्चरायझरनंतर सनस्क्रिन लावायलाच हवे. सनस्क्रिनमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक संरक्षण कव्हर तयार होते. त्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. उन्हात जाण्याआधी सनस्क्रिन लावायलाच हवे. त्यामुळे त्वचा चांगली राहते. हल्ली त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रिन मिळतात. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सनस्क्रिन निवडायला हवे. 

मेकअप करा रिमुव्ह (Makeup removal)

मेकअप तुम्हाला सुंदर करतो. घरच्या घरी मेकअप करुन सुंदर दिसायला सगळ्यांना आवडते. हा मेकअप तुमच्या त्वचेवरुन उतरवणेही तितकेच गरजेचे असते. मेकअप केल्यानंतर तो काढणेही गरजेचे आहे. कारण मेकअप हा त्वचेच्या पोअर्सच्या आत जाऊन बसतो. तो काढला नाही तर त्यामधील घटक त्वचेवर पिंपल्स आणण्यास कारणीभूत ठरु शकतो.  त्यामुळे मेकअप काढायला कधीही विसरु नका.

 वाफ घ्या ( Steam)

चेहऱ्यावर असलेल्या बारीक बारीक छिद्रांमध्ये अडकलेली घाण काढून टाकायची असेल तर तुम्ही महिन्यातून दोन वेळा वाफ घ्यायला हवी. वाफ घेतल्यामुळे पोअर्स ओपन होतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते. हल्ली वाफ घेतल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये तुम्ही पुदीना किंवा ग्रीन टी असे घालू शकता. त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते.

 केमिकल टाळा (Avoid Chemicals )

हल्ली अनेक मेकअप प्रॉडक्टसमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. अशा केमिकल्समुळे त्वचा खराब होते.शक्य असेल तितके ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरा. त्यामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते. केमिकल्स कसे ओळखायचे हे कळत नसेल तर त्वचेसाठी अनावश्यक असलेले घटक असतील तर त्याचा वापर करु नका.

ADVERTISEMENT

केमिकल पील्स ( Chemical Peels)

केमिकल आणि केमिकल पील्स यामध्ये बराच फरक आहे. त्वचेसाठी काही केमिकल हे आवश्यक असतात. यामध्ये सॅलिसिलिल पील, ग्लायरोलिक पीलचा समावेश असतो. हे पील्स त्वचेवरील अनावश्यक लेअर काढून टाकतात. आणि त्वचा सुंदर करतात.

सोप्या घरगुती उपायांनी मिळवा सुंदर त्वचा | Beauty Tips For Face At Home In Marathi

सोप्या घरगुती उपायांनी मिळवा सुंदर त्वचा | Beauty Tips For Face At Home In Marathi
Beauty Tips For Face At Home In Marathi

घरच्या घरी त्वचेची काळजी घ्यायची असेल तर काही सोप्या गोष्टी करुनही तुम्ही सुंदर आणि नितळ त्वचा मिळवू शकता. 

  1. त्वचेसाठी आहार हा देखील तितकाच मत्वाचा असतो. चांगला आहार असेल तर त्वचा आतून स्वच्छ आणि चांगली होते. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश करा. फळे, भाज्या,अंडी, चिकन याचा समावेश करा. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. 
  2. दिवसातून एकदा शक्यतो झोपताना चेहऱ्याचा मसाज करा. कोणतेही मॉश्चरायझर घेऊन तुम्ही चेहऱ्याला लावा आणि गोलाकार आकारात मसाज करा.त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. 
  3. कोलॅजन हे त्वचेसाठी खूप गरजेचे असते. हल्ली बाजारात कोलॅजन असलेल्या पावडर मिळतात. ते देखील तुम्ही रोजच्या रोज घ्या. त्यामुळे त्वचा आतून चांगली होते. 
  4. कितीही स्किनकेअर प्रॉडक्ट असून काहीही उपयोग नाही. तुम्ही आंघोळीनंतर जर योग्य रुटीन फॉलो केले तरच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. 
  5.  चेहऱ्याला व्हिटॅमिन C चा योग्य साठा मिळाला की, त्वचा अधिक सुंदर राहते. व्हिटॅमिन सी युक्त प्रॉडक्ट, पदार्थ, फळे यांचा समावेश करा. त्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चिरतरुण राहण्यास मदत होईल. 

FAQs – Simple & Easy Beauty Tips In Marathi

प्रश्न:  स्किन हेल्दी ठेवायची असेल तर काय करायला हवे?
उत्तर : स्किन हेल्दी ठेवायची असेल तर त्वचेशी निगडीत सगळ्या गोष्टी तुम्ही नियमित करायला हव्यात. याशिवाय तुम्ही चांगला आहार घ्यायला हवा. त्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्यास मदत मिळेल. त्वचेची ही चमक अधिक काळ टिकून राहते.

प्रश्न: कोरियन स्किन मिळवण्यासाठी काय करायला हवे?
उत्तर:  कोरियन स्किन ही सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये आहे. कोरियन त्वचा ही खूपच नितळ आणि काचेसारखी असते. ही त्वचा मिळवण्यासाठी डबल क्लिन्झ पद्धत वापरतात. त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते.याशिवाय फेस मसाज, फेस क्लिन्झिंग ही त्वचा अधिक सुंदर राहते.

ADVERTISEMENT

प्रश्न: स्क्रबचा वापर करताना
उत्तर : स्क्रब करताना तुम्ही कधीही जास्त जोरात स्क्रब करु नका. कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होऊ शकते. त्वचेसाठी रोज स्क्रबचा वापर करणे चांगले नाही. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा स्क्रब करा. जास्त खरखरीत असलेला स्क्रब अजिबात वापरु नका. त्यामुळे त्वचा डॅमेज होऊ शकते. 

Beauty Tips For Face At Home In Marathi ची योग्य माहिती आज तुम्हाला मिळाली असेल तर Beauty Tips In Marathi फॉलो करा या शिवाय Home Made Beauty Tips In Marathi करायला विसरु नका. Beauty Tips In Marathi For Glowing Skin तुम्हाला देईल सुंदर त्वचा 



02 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT