ADVERTISEMENT
home / Acne
प्रेगन्सी स्ट्रेच मार्क्सपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यापर्यंत उपयुक्त आहे बायो ऑईल

प्रेगन्सी स्ट्रेच मार्क्सपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यापर्यंत उपयुक्त आहे बायो ऑईल

बायो ऑईल (Bio Oil) ची जाहिरात तुम्ही अनेक ठिकाणी पाहिली असेल. मात्र बायो आईल बद्दल जास्त माहीत नसल्यामुळे तुम्ही ते वापरण्याचा विचार अनेकवेळा पुढे ढकलता. यासाठीच आम्ही तुम्हाला बायो आईल विषयी सर्व माहिती देत आहोत. बायो ऑलचे अनेक फायदे आहेत. बायो ऑईलच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरचा एखादा जुना डाग कमी करू शकता. प्रेगन्सीनंतर होणारे स्ट्रेच मार्क्स असोत अथवा चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा बायो ऑईल तुमच्यासाठी अगदी वरदान ठरू शकतं.

बायो ऑईल (What Is Bio Oil)

bio oil

बायो ऑईलचे अनेक चांगले फायदे आहेत. कारण ते कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी परफेक्ट आहे. जर तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर बायो ऑईलमुळे ते सहज कमी होऊ शकतात. स्ट्रेच मार्क्स करण्यापासून ते चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी तुम्ही बायो ऑईल वापरू शकता. बायो ऑईल एक ऑल राऊंडर स्किन केअर प्रॉडक्ट आहे.कारण एकच उत्पादन तुम्ही अनेक गोष्टींवर उपाय करण्यासाठी वापरू शकता.  बायो ऑईल कंपनीच्या मते ती कोणत्याही जखमेचा व्रण आणि स्ट्रेच मार्क्स कमी करणारी जगातील एकमेव नामांकित ब्रॅंड आहे.

बायो ऑईलची किंमत 395 रू. आहे. तुम्ही ऑनलाईन अथवा एखाद्या मेडिकल शॉपमधून ते खरेदी करू शकता.

बायो ऑईल वापरणे सुरक्षित आहे का?  (Is Bio Oil Safe To Use?)

बायो ऑईलमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि तेल मिसळलेली असतात. यामध्ये लवेंडर ऑईल, रोजमेरी ऑईल, कॅमोमाईल ऑईल मिक्स केलेलं असतं. शिवाय बायो ऑईलमधील व्हिटॅमिन्स ए आणि व्हिटॅमिन ई च्या पोषक तत्त्वामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होऊ शकतं. बायो ऑईलमधील या पोषक घटकांमुळे कोणतीही अॅलर्जी होत नाही. त्यामुळे तुम्ही बायो ऑईल अगदी कोणतीही शंका न घेता वापरू शकता. बायो आईल प्रॉडक्टची उत्पादन करण्याआधी टेस्ट केली जाते. एवढंच नाहीतर यातील तेलाचे नमुने पाच वर्ष आधीपासून देखरेखीखाली ठेवले जातात.

ADVERTISEMENT

बायो ऑईलचे  फायदे (Benefits Of Bio Oil)

bio oil 1

जर तुम्ही यापूर्वी बायो ऑईलचा वापर कधीच केला नसेल तर यापुढे बायो ऑईल वापरण्याचा विचार जरूर करा. पण त्यापूर्वी बायो ऑईलचे हे फायदे  जरूर जाणून घ्या.

Also Read Beauty Benefits of Bio Oil in Hindi

जखमांचे व्रण कमी होतात

बायो ऑईलमुळे तुमच्या शरीरावरील जखमांचे डाग कमी होऊ शकतात. मात्र बायो ऑईल वापरण्यापूर्वी एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की जखमांचे डाग पूर्णपणे कमी करणारे कोणतेच  सौंदर्य उत्पादन अजून पर्यंत तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे बायो ऑईलमुळेदेखील तुमचे डाग कमी होतात ते पूर्णपणे निघून जात नाहीत. कारण कापलेल्या अथवा खरचटेल्या जखमांचे डाग हे कायमस्वरूपी तुमच्या त्वचेवर तसेच राहतात. मात्र बायो ऑईलच्या वापरामुळे ते कमी अथवा फिकट दिसू लागतात. शिवाय बायो ऑईलचा वापर तेव्हाच करा जेव्हा तुमच्या जखमा बऱ्या झालेल्या असतील. ओल्या जखमेवर कधीच बायो ऑईल लावू नका. जखमा बऱ्या झाल्यावर त्वचेवर जे काळे डाग पडतात ते कमी करण्यासाठी तुम्ही बायो ऑईलचा वापर करू शकता.

चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे बायो ऑईल

bio oil 2

अनेकजणींच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की बायो ऑईल चेहऱ्यावर लावू शकतो का? तर याचे उत्तर नक्कीच होय आहे. हिवाळ्यात अथवा तुम्ही जर थंड प्रदेशात राहत असाल तर तुम्ही नियमित बायो ऑईलचा वापर करू शकता. शिवाय बऱ्याचदा साबण आणि पाण्याच्या अती वापरामुळेदेखील तुमची त्वचा कोरडी होते. अशा वेळी बायो आईलचा नियमित वापर केल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. तुम्ही चेहऱ्याप्रमाणेच संपूर्ण शरीरावरच्या त्वचेवर बायो ऑईल लावू शकता. कारण बायो ऑईलमुळे तुमची त्वचा चमकदार आणि तुकतुकीत दिसू लागते. बायो ऑईलमुळे तुम्हाला सनबर्नचा त्रास देखील होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात घराबाहेर पडताना त्वचेवर बायो ऑईल लावल्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो.

ADVERTISEMENT

सुरकुत्या कमी होतोत

चेहऱ्यावर सुरूकत्या पडणं हे वाढत्या वयाचं लक्षण आहे. मात्क आजकाल कमी वयात देखील त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. प्रदूषण आणि कामाच्या ताणामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचा त्रास अनेकजणींनी सहन केला असेल. मात्र आता बायो ऑईलमुळे तुम्ही चेहऱ्यावरच्या सुरूकुत्या कमी करू शकता. बायो ऑईलमधील कोलेजन आणि इलास्टिन हे घटक सुरूकुत्या कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. नियमित बायो ऑईलचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील एजिंगच्या या खुणा कमी होतात आणि तुम्हाला मऊ आणि चमकदार त्वचा मिळते. तुमच्या त्वचेचा पोत बायो ऑईलच्या वापरामुळे सुधारू लागतो. त्यामुळे एजिंगवर इतर महागडे उपचार करण्यापेक्षा दररोज बायो ऑईल वापरण्यास सुरूवात करा.

स्ट्रेच मार्क्स कमी होतात

bio oil 3

सर्वात आधी आपण स्ट्रेच मार्स्क नेमके कशामुळे होऊ शकतात हे समजून घेऊया. जेव्हा तुमची त्वचा खेचली जाते तेव्हा त्या भागावरील कोलेजन कमजोर होतं. ज्यामुळे तुमच्या शरीरातील त्वचेच्या निर्मिती चक्रात बिघाड होतो. सहाजिकच या बदलामुळे तुमच्या त्वचेवर खेचल्यासारखे व्रण दिसू लागतात. सुरूवातीला हे व्रण लाल  अथवा गुलाबी रंगाचे असतात मात्र काही काळाने ते पांढरट आणि काळपट दिसू लागतात. यांनाच स्ट्रेच मार्क्स असे म्हणतात. बऱ्याचदा डिलिव्हरीनंतर अथवा वजन कमी-जास्त झाल्यामुळे पोट, कंबर, छाती. दंड, मांड्या आणि बिकनीभागात हे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. काही वेळा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, अनुवंशिकता यामुळेदेखील स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. शिवाय स्ट्रेच मार्क्सच्या खुणा पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत. कारण त्या आयुष्यभर तशाच राहतात. मात्र बायो ऑईलच्या मदतीने तुम्ही त्या कमी करू शकता. स्ट्रेच मार्क्स कमी करण्याबाबत बायो ऑईलच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये चांगले परिणामांसह स्ट्रेच मार्क्स कमी झालेले आढळून आलेले आहे. यासाठीच स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही निशंकपणे बायो ऑईल वापरू शकता.

बायो ऑईल केसांसाठी उपयुक्त

बऱ्याचदा केसांच्या आतील त्वचा कोरडी पडल्यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. मात्र केसांमध्ये बायो ऑईलने मसाज केल्यास तुमच्या केसांमधील कोरडेपणा कमी होऊ शकतो. शिवाय यामुळे केसांचे योग्य पोषण झाल्यामुळे तुमचे केस गळणे कमी होते. नियमित केसांना बायो ऑईल लावल्यामुळे केसांना फाटे फुटत नाहीत. जर  तुमच्या केसांना चांगले पोषण मिळाले तरच तुमचे केस मजबूत आणि लांब दिसतात. केसांच्या पोषणासाठी त्यांना दररोज बायो ऑईल जरूर लावा.

बायो ऑईलचा वापर कसा करावा? (How To Use Bio Oil?)

बायो ऑईलचा वापर करणं अगदी सोपं आहे. तुम्ही दिवसांतून दोन वेळा बायो ऑईल वापरू शकता. चांगल्या परिणामांसाठी कमीत कमी तीन महिने बायो ऑईल वापरा. यासाठी थोडंसं बायो ऑईल एका भांड्यात काढून घ्या आणि ज्या भागावर ते लावायचे आहे तिथे सर्क्युलर मोशनमध्ये तेल लावून मसाज करा. तेल लावण्यासाठी नेहमी तुमच्या हाताच्या बोटांचा वापर करा. ज्यामुळे बायो ऑईल तुमच्या त्वचेमध्ये चांगल्या पद्धतीने मुरेल. स्ट्रेच मार्क्स कमी प्रमाणात व्हावेत यासाठी गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीपासून बायो ऑईलचा वापर सुरू करा. प्रेगन्सीमध्ये साधारणपणे पोट, कंबर, छाती, मांड्या आणि हातावर स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता असते. यासाठी या भागांवर आधीपासूनच बायो ऑईल वापरण्यास सुरूवात करा.

ADVERTISEMENT

बायो ऑईलचे इतर फायदे – (Another Uses Of Bio Oil)

bio oil 4

मॉश्चराईझर

तुम्ही त्वचेच्या पोषणासाठी तुम्ही बायो ऑईल मॉश्चराईझर म्हणून वापरू शकता. यासाठी दररोज अंघोळ केल्यावर चेहऱ्यावर बायो ऑईलचे काही थेंब लावून मसाज करा. बायो ऑईल लावल्यावर तुम्हाला चिकटपणा जाणवत नाही. म्हणूनच तुम्ही ते मॉश्चराईझर प्रमाणे वापरू शकता. शिवाय ते त्वचेमध्ये पटकन मुरतं ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम दिसते.

मेकअप रिमूव्हर

बायो ऑईल तुम्ही चेहऱ्यावरचा मेकअप काढण्यासाठीदेखील वापरू शकता. यासाठी कापसावर बायो ऑईल घ्या सर्क्युलर मोशनमध्ये ते चेहऱ्यावर लावत मेकअप स्वच्छ करा. तुम्ही मेकअप निघाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ करू शकता.

लिप बाम

बायो ऑईल तुम्ही तुमच्या ओठाच्या सुरक्षेसाठीदेखील वापरू शकता. बायो ऑईलमुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम होतात. यासाठी नियमित दोन वेळा तुमच्या ओठांवर बायो ऑईल लावा.

बायो ऑईलचे दुष्परिणाम (Side Effects of Bio Oil)

bio oil 5

प्रत्येक गोष्टींचे जसे फायदे असतात तसेच काही दुष्परिणामदेखील असतात. काही लोकांना बायो ऑईल वापरल्यामुळे एलर्जी अथवा त्वचा समस्यांचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे जर बायो ऑईलमधील काही घटकांची तुम्हाला अॅलर्जी असेल तर याचा वापर करताना सावध रहा. त्वचेवर या तेलाची टेस्ट घेऊन मगच त्याचा वापर करा.

ADVERTISEMENT

अती संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांनी बायो ऑईलचा वापर करू नका. कारण यामुळे कदाचित तुमच्या अंगावर लाल चट्टे, पुरळ, खाज अथवा जळजळ होऊ शकते. शिवाय बायो ऑईल वापरल्यामुळे तुम्हाला कोणतीही अॅलर्जी झाली तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र जर तुमची त्वचा अती संवेदनशील नसेल तर तुम्ही बायो ऑईलचा वापर अगदी निशंकपणे करू शकता.

निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’

बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे Health And Beauty Benefits of Olive Oil In Marathi

कमी वेळात चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा बदामाचं तेल (Benefits Of Almond Oil In Marathi)

ADVERTISEMENT

Skin Care During Pregnancy In Marathi

10 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT