सध्या फेसबुक,युट्युब, इन्स्टाग्राम काहीही उघडा तुम्हाला सध्या एकच व्हिडिओ दिसेल तो म्हणजे राणू मंडलचा… आता ही राणू मंडल तुम्हाला माहीत नाही असे अजिबात सांगू नका. कारण ती सध्या भारतातलं सेन्सेशन आहे. राणू मंडलचा रेल्वे स्टेशन ते बॉलीवूडची प्ले बॅक सिंगर असा प्रवास आपण ऐकला आणि पाहिला आहे. पण राणू मंडलच्या आवाजाची तारीफ या आधीही एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने केली आहे. स्वत: राणू मंडलनेच याचा खुलासा केला आहे.
बिग बींच्या फॅशन स्टेटमेंटमागील मराठमोळा चेहरा
कोण आहे तो अभिनेता?
रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या या राणू मंडलचा आवाज या आधीही एका बॉलीवूड अभिनेत्याने ऐकलेला आहे. हा अभिनेता आणखी कोणी नसून दिवंगत अभिनेते फिरोज खान आहेत. फिरोज खान यांनी राणूचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या आवाजाची तारीफ केली होती. आता प्रश्न असा असेल फिरोज खान राणूचा आवाज ऐकायला नेमके गेले कुठे? राणू मंडल हिचा नवरा फिरोज खानकडे कामाला होता. त्याला मदत करण्यासाठी ती कधी कधी फिरोज खान यांच्या घरी जायची. त्यावेळी ती गाणं गुणगुणायची. तिचे ते गुणगुणणे फिरोज खान यांनी ऐकले होते आणि त्यांनी त्यावेळी तिच्या आवाजाची प्रशंसा केली होती. पण त्यावेळी तिला गाण्याची इतकी मोठी संधी मिळेल असे मात्र कधीच वाटले नव्हते.
णूची सोशल मीडियावर तारीफ
राणू सध्या सोशल मीडियावर एकदम हिट आहे. हिमेश रेशमियाच्या harry harder heer चित्रपटात ‘तेरी मेरी कहानी’ या गाण्याला राणू मंडलचा आवाज आहे. हे गाणं सध्या गुगलवर सगळ्यात जास्त सर्च केले जात आहे. या गाण्याचे व्हिडिओ आणि त्याच्या ऑडिओ क्लीप व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राणू मंडलला प्रसिद्ध मिळत आहे. आता तिला या पुढे कोणत्या चित्रपटात गाण्याची संधी मिळते ते पाहावे लागेल.
वरूण धवन नोव्हेंबरमध्ये करणार डेस्टिनेशन वेडिंग
बॉलीवूडकडून मदतीचा हात
घरातल्यांनी टाकल्यामुळेच रेल्वेस्टेशनवर गाण्याची वेळ राणू मंडलवर आली होती. गाणं तिच्या आवडीची गोष्ट असल्यामुळे ती कधीच मागे पुढे पाहायची नाही. तासनतास रेल्वे स्थानकावर गात बसायची.तिने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवऱ्यासोबत काम करत असताना ती गाण्याचे काम करत होती. पण घरातल्यांनी विरोध केल्यामुळे तिने ते काम बंद केले. राणू आधी गात असताना राणी बॉबी या नावाने ओळखली जायची. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला हिमेश रेशमियाने आपल्या गाण्यामध्ये संधी दिली. तिची परिस्थिती पाहता तिला लगेचच सलमान खानने घरसुद्धा घेऊन दिले.
म्हणून राणू मंडल झाली स्टार
पश्चिम बंगालच्या राणाघाट येथे राहणारी राणू मंडल पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गाणं गाते. नवऱ्याच्या निधनानंतर तिला तिच्या गावी परतावे लागले. त्यामुळे तिने मुंबई सोडून थेट राणाघाट गाठले. मुलीनेही सांभाळण्यास नकार दिल्यामुळे तिला भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. एका प्रवाशाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ हिमेश रेशमियाने पाहिला आणि तिला त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी त्याने दिली. आता राणू मंडलच्या आवाजाची तारीफ सोशल मीडियावर इतकी होत आहे की तिला गाण्याच्या अनेक ऑफर्स येत आहेत.
अभिनयासोबत दिग्दर्शनात हात आजमावलेल्या बॉलीवूड अभिनेत्री