अभिनेत्री काजोलला चित्रपटसृष्टीत जवळजवळ तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आजवरच्या कारर्किदीत काजोलने निरनिराळ्या भूमिका चित्रपटांमध्ये साकारल्या आहेत. तिच्या नावावर आज अनेक हिट चित्रपटांची लिस्ट आहे.लवकरच ती ओटीटीवर एका नव्या कोऱ्या वेबसिरिजमध्ये झळकणार आहे. मात्र असं असलं तरी एक हिट वेबसिरिज मात्र तिच्या हातून निसटली आहे. कारण सुष्मिता आधी काजोलला आर्या वेबसिरिज ऑफर झाली होती. मात्र तिने ती नाकारल्यामुळे तिच्या हातून एक चांगली भूमिका निघून गेली.
का रिजेक्ट केली काजोलने आर्या
काजोलला सर्वात आधी आर्या वेबसिरिज ऑफर झाली होती. तिला या वेबसिरिजची स्क्रिप्टदेखील आवडली होती. मात्र ती त्यावेळी तिच्या काही वैयक्तिक कामामध्ये व्यस्त होती. त्यामुळे ती या वेबसिरिजसाठी वेळ देऊ शकली नाही. वास्तविक काजोलने त्याच काळात त्रिभंगामध्ये काम केलं होतं. त्यामुळे हे कारण चाहत्यांना काही रूचलेलं दिसत नाही आहे. मात्र आता काजोलने जेव्हा आर्याचं यश पाहिलं तेव्हा तिला ही वेबसिरिज सोडल्याचं नक्कीच वाईट वाटत आहे. ज्यामुळे तिच्या हातून एक चांगली संधी नक्कीच निसटल्याचं दिसत आहे. जर काजोलने आर्या साकारली असती तर कदाचित आणखी एक चांगली भूमिका काजोलच्या नावावर झाली असती. सुष्मितानेही आर्यामध्ये जीव ओतून काम केलं आहे. पण काजोलच्या चाहत्यांना आर्यामध्ये काजोलला पाहायला नक्कीच आवडलं असतं.
चित्रपटसृष्टीत काजोलची तीस वर्षे पूर्ण
काजोलने नुकतीच इंडस्ट्रीमध्ये तीस वर्षे पूर्ण केली आहेत. यासाठी तिने आजवर साकारलेल्या सर्व भूमिका, चित्रपट, दिग्दर्शक आणि सह कलाकारांचे आभार व्यक्त केले आहेत. तिने तीस वर्षांचा टप्पा कधी पार केला हे तिला स्वतःलाच समजलं नाही असं तिचं म्हणणं आहे. काजोलने चित्रपटसृष्टीत एक खूप मोठा टप्पा पार केला आहे. आई, मावशी याच इंडस्ट्रीमधील असल्या तरी तिने स्वतःच्या मेहनतीवर तिचं स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केलं आहे. लग्नानंतर अजयप्रमाणे तिने भरपूर भूमिका साकारल्या नसल्या तरी ज्या भूमिका साकारल्या त्यामध्ये स्वतःची छाप निर्माण केली. काजोलच्या चाहत्यांना या पुढेही निरनिराळ्या भूमिकांमध्ये काजोलला पाहण्याची इच्छा आहे. त्यामुळे तिच्या पुढील कारकिर्दीसाठी त्यांच्या शुभेच्छा तिच्यापाठी कायम असतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक