‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ अंड खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते हे आपण सगळेच जाणतो. प्रोटीन्सचा भंडार असलेल्या अंड्यामुळे शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. म्हणून अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी अंड खावे असे सांगितले जाते. अंड्याच्या सेवनामुळे शरीर सुदृढ होते हे अगदी खरे आहे पण या शिवाय अंड्यामुळे काही त्रासही होऊ शकतात. अंड्याच्या सेवनाचे फायदे आणि काही तोटे आपल्या लक्षात आले तर वजन कमी करणाऱ्यांना त्याचे योग्य पद्धतीने सेवन करणे नेमके कळू शकेल. जाणून घेऊया अंड्याच्या सेवनामुळे होणारे फायदे आणि तोटे
रोज दोन अंडी खाण्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच अंड्याचे सेवन कराल सुरु
अंड्याच्या सेवनामुळे होतात हे फायदे
- अंड हे शरीराला प्रोटीन्स देण्याचे काम करते. जर तुम्हाला दूध किंवा दुधाचे पदार्थ आवडत नसतील तर तुम्ही अगदी हमखास अंड्याचे पदार्थ करुन खायला हवेत. अंड्याची पोळी, अंडा बुर्जी, अंडा पाव, अंड्याची आमटी असे काही पदार्थ तुम्ही तुमच्या कोणत्याही वेळच्या आहारामध्ये करु शकता.
- वजन कमी करायचा विचार करत असाल तर अंड्याचा पांढरा बलक हा फारच फायदेशीर असतो. अंडी खाल्ल्यामुळे पोट भरते आणि इतर काहीही खाण्याची फारशी इच्छा होत नाही. जर वजन कमी करणे हा तुमचा हेतू असेल तर तुम्ही अंड्याचा पांढरा बलक रोज किंवा दिवसाआड खाण्यास काहीच हरकत नाही.
- केस आणि त्वचेसाठी ओमेगा 3 नावाचा घटक हा फारच महत्वाचा असतो. अंडयामध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा 3 असते. जे तुमची त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले करण्यास मदत करते. जर तुम्ही अंड्याचे योग्य प्रमाणात सेवन केलेत तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये आणि त्वचेत हा फरक नक्की जाणवेल.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे हे अनेकांसाठी फारच गरजेचे झाले आहे. अंड्यामध्ये आवश्यक असलेले घटक तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही ह्रदयरोगापासून दूर राहता.
- डोळ्यांच्या आरोग्यासाठीही अंडी चांगली असतात. अंडी खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. दृष्टी ही जास्त काळासाठी चांगली राहते.
वजन कमी करण्याठी पनीरपेक्षा तोफू का आहे चांगले
अंड्याच्या सेवनामुळे होऊ शकतात हे त्रास
- अंड हे थोडे उष्ण असते. अंड्याचा पिवळा बलक तुम्ही खात असाल तर पोटांच्या तक्रारी अंडी खाल्यानंतर जाणवू शकतात. जर शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल आणि अंड्याचे सेवन केले तर बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो.
- पोटात गॅसेस तयार होण्यासाठीही अंड जबाबदार असते. अंड हे पचायला थोडे जड असते. जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर तुम्हाला वास असलेले गॅस जाण्याची शक्यता जास्त असते.
- गॅसेसचा त्रास अधिक वाढला तर तुम्हाला अपचनाचा त्रास अर्थात करपट ढेकर होण्याचा त्रासही अंड्याच्या सेवनामुळे होऊ शकतो. त्यामुळे अंड खाताना पचवण्याची क्षमताही जास्त हवी.
- अंड्याचा बलक जर खात असाल तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे अंड्याचा बलक खाणे टाळा.
आता अंड खाताना काही गोष्टींचा विचार नक्की करा.
प्रोटीनचं सेवन आपल्यासाठी का आवश्यक आहे आणि त्याचे स्त्रोत (Benefits Of Protein In Marathi)