धूप दाखवणे (Giving Incense) कापूर जाळणे याला एक प्राचीन परंपरा आहे. घरात पूजाअर्चा करताना, सकाळी आणि संध्याकाळी धूप दाखवण्याची पद्धत आहे. धूप दाखवल्यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते अशी मान्यता आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील कोणताच पूजाविधी धूप दाखवण्याशिवाय केला जात नाही. एवढंच नाही तर यासाठीच सकाळी घरी पूजा करताना आणि संध्याकाळी दिवेलागणीलाही घरात धूप दाखवला जातो. कारण या काळात घरातील इडापिडा बाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येते असं समजलं जातं. यासाठीच जाणून घ्या महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती | Mahashivratri Information In Marathi आणि Mahashivratri Wishes In Marathi 2022 | महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खास शुभेच्छा
घरात का दाखवावा धूप
हिंदू धर्मात पूजाविधी करण्यासाठी, दररोज घरातील पूजेसाठी धूप दाखवणं गरजेचं असल्यामुळे बाजारात धूप सहज मिळतो. धूप विविध गोष्टींपासून बनवला जातो. त्यामुळे आजकाल पूजाविधींचे साहित्य मिळणाऱ्या कोणत्याही दुकानात कापूर, गुग्गुळ, लोबान अशा प्रकारचे धूप विकत मिळतात. या धुपात नैसर्गिक घटकांचा जसं की, शेण, गुळ, चंदन, तूप, वापर करण्यात येतो. ज्यामुळे धूप पेटून त्यामधून सुंगध निर्माण होतो. धूप जाळण्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवाय धूपातील निर्जंतूक करणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे वातावरणातील जीवजंतू नष्ट होतात. ज्यामुळे घरात निरोगी वातावरण निर्माण होते. घरात धूप दाखवल्यामुळे मनाला शांती मिळते आणि मनातील चिंता-काळजी दूर होण्यास मदत मिळते. असं म्हणतात की दररोज घरात धूप दाखवल्यामुळे पितृदोष, वास्तूदोष, ग्रहदोष, देवदोष कमी होतात. धूपदीप नियमित केल्यामुळे घरात भांडणे होत नाहीत असंही मानलं जात. सहाजिकच घरातील मंडळींना उत्तम आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य मिळण्यासाठी घरात नियमित धूप दाखवणे फायदेशीर ठरते. यासोबतच जाणून घ्या कापूरचे फायदे मराठीमध्ये (Health Benefits Of Camphor)
धूप कसा दाखवावा
धूप दाखवण्याचे अनेक फायदे असले तरी पुराणात धूप दाखवण्याची एक विशिष्ट पद्धत सांगण्यात आलेली आहे. चांगले फायदे मिळण्यासाठी त्यानुसारच धूप घरात दाखवावा. धूप थेट न जाळता त्यामध्ये विविध घटक मिसळून मग तो जाळण्याची पद्धत आहे. जसं की लाकडाचे तुकडे, सुकलेली करंवटी, सुकवलेल्या शेणाऱ्या गोवऱ्या अशा गोष्टींचा वापर करावा. या शिवाय नेहमी गुग्गुळ, कापूर, गूळ, तूप अशा गोष्टींपासून बनलेलाच धूप वापरावा. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारचा धूप खरेदी करण्यापूर्वी तो कशापासून बनवला आहे हे जरूर तपासावे. धूपाचे योग्य परिणाम मिळवेत यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी धूप दाखवावा. जर ते शक्य नसेल तर महिन्यातून येणारी पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी, अंगारकी, शिवरात्री अशा काही विशिष्ट दिवशी आवर्जून धूप घरात दाखवावा. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी असं दोन्ही वेळ घरात धूप दाखवणं गरजेचं आहे. कारण सकाळी-संध्याकाळी दिलेला धूप हा देवता प्रसन्न करण्यासाठी असतो तर संध्याकाळी दाखवलेला धूप हा पुर्वजांची कृपादृष्टी राहावी यासाठी असतो असं मानलं जातं. यासाठी धूप दाखवण्यापूर्वी घर स्वच्छ करावं. अंघोळ करून घरात दिवा लावावा आणि मगच धूप दाखवावा. त्याचप्रमाणे अगरबत्ती अथवा धूप सर्वात आधी ईशान्येला दाखवावा त्यानंतर संपूर्ण घरात धूप दाखवावा. शक्य असल्यास अशा वेळी कोणतेही संगीत घरात लावू नये. तसंच घरातील लोकांनी जास्तीत जास्त शांतता राखवी असंही सांगितलं जातं.
सूचना – घरात धूप दाखवण्याचे अनेक फायदे आहेत मात्र धूप दाखण्याची ही पद्धत प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे करावी. यातील काय योग्य आणि काय अयोग्य हे आपल्या सारासार बुद्धीचा वापर करून ठरवावं. मात्र सकाळ आणि संध्याकाळ घरात धूप मात्र अवश्य दाखवावा कारण त्याचे तुमच्या मानसिक आरोग्यावर चांगले फायदे होतात.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक